औरंगाबाद – औरंगाबादेतील नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी लंडनहून मुंबईत दाखल झालेला येणार आहे. कुटुंबातील 21 वर्षीय मुलगी रविवारी ओमिक्रोन बाधित आढळली मुंबईत अहवाल निगेटिव्ह आल्याने आई-वडील आणि बहिण असे तिघेही औरंगाबादेत दाखल झाले. मात्र, तेथे तपासणीअंती ओमायक्रॉन बाधित मुलीचे 50 वर्षीय वडील बाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यांना ओमायक्रोनची बाधा झाली का, याचे निदान होण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला स्वॅब नमुना पाठवण्यात येणार आहे.
शहरातील एका नागरिकास मुंबई विमानतळावरील तपासणीतून ओमिक्रोनची बाधा झाल्याचे रविवारी समोर आले. शहरातील नातेवाईकाच्या लग्नासाठी लंडनचे कुटुंब 14 डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर उतरले. तेथे त्यांनी औरंगाबाद चा पत्ता दिला. तपासणीनंतर 21 वर्षीय मुलगी कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. तर अन्य तिघेही निगेटिव असल्याचे निदान झाले. बाधित मुलीचे वडील सात दिवस मुंबईतच क्वारंटाईन झाले तर आई आणि बहीण औरंगाबादेत येऊन एका हॉटेलमध्ये थांबले. रविवारी ते शहरात दाखल झाले होते. त्यांनी औरंगाबादेत खासगी लॅबमध्ये स्वतःची तपासणी केली त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही माहिती मिळताच पालिकेने सोमवारी सकाळी त्यांचा पुन्हा स्वॅब घेऊन घाटी तपासणीसाठी पाठवला. सायंकाळी हा अहवालही पॉझिटिव आला. त्यामुळे ओमीक्रॉन बाधित मुलीच्या वडिलांना तसेच आई व बहिणीला उपचारासाठी मेल्ट्रोन मध्ये दाखल करण्यात आले आहे.
ओमिक्रोन बाधित मुलीचे आई-वडील आणि बहीण औरंगाबादच्या एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन होते. या हॉटेलमधील 21 कर्मचाऱ्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. तसेच मुलगी कोरूना बाधित आढळल्याने शहरात दाखल झाल्यानंतरही जागरूक राहून आई आणि बहिणीने लग्नसमारंभात जाणे टाळले. वडिलांनीही शहरात आल्यानंतर नातेवाईकांपासून दूर राहणेच पसंत केले.