सांगली | इस्लामपूर रोडवर आष्टा लायनर्स प्रा. लि. समोर ओमनी कार, एस.टी. बस व मोटारसायकल असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तिघे युवक रोहित रघुनाथ पाटील, अमर रघुनाथ पाटील व संस्कार अनिल पवार सर्व हे जखमी झाले आहेत. अपघात स्थळी आष्टा पोलीस तात्काळ दाखल झाले.
एस. टी. बस क्रमांक ही इस्लामपूरहून सांगलीकडे चालली होती. या दरम्यान ओमनी कार ही एस टी बसच्य आडवी आली. बस ओमनीला धडकून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या मोटारसायकलला समोरून धडकली यात मोटारसायकलवरील तीन युवक जखमी झाले. सदर घटनेचे फुटेज सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान बघ्यानी सदर ठिकाणी गर्दी केली होती. जखमींना सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
ओमनी कारची बसला धडक pic.twitter.com/Mgk2CjwmTW
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) January 3, 2022
एस टी चालकाने ओमनी चालक महेश मानसिंग आटूगडे याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे व तक्रारीत म्हंटले आहे की ओमनी चालक आटूगडे याने ओमनीचा वेग अचानक कमी करीत गाडी डावीकडे घेतली व पुन्हा वेग वाढवीत गाडी उजवीकडे वळवली. त्यामुळे बसची कंडक्टर सायडची बाजू ओमनीला धडकली. व बस समोरून येणाऱ्या मोटारसायकल ला धडकली. तिन्ही वाहनाचे मिळून सुमारे 70 हजाराचे नुकसान झाले आहे.