ओमिक्रॉनचा महाराष्ट्रात शिरकाव; ‘या’ जिल्ह्यात सापडला पहिला रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटक, आणि गुजरात नंतर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला असून कल्याण डोंबिवली मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानंदिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी आढळून आला आहे.

हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला. त्याला इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.” अशी माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आलीय.

यापूर्वी कर्नाटक मध्ये 2 आणि गुजरात मध्ये 1 अशा 3 रूग्णांना ओमीक्रोन ची लागण झाली आहे. त्यातच आता महाराष्ट्रात देखील ओमीक्रोन चा शिरकाव झाल्याने चिंतेत भर पडली आहे.