जुन्नरमध्ये एसटी बस आणि इको कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे येथील नगर कल्याण महागमार्गावर एसटी बस आणि इको कार यांच्यात धडक होऊन भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात (accident) एकाचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात (accident) झाला आहे. एसटी बस आणि इको कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात (accident) दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात इको कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे तर एसटी बस अपघातानंतर थेट शिवारात घुसल्याचे दिसत आहे.

नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प
नगर-कल्याण महामार्गावर जु्न्नर तालुक्यात एसटी बसचा अपघात (accident) झाला. एसटी बस आणि इको कार यांच्यात समोरसमोरच भीषण धडक झाली. जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील शिवारात एसटी बस घुसली होती. तर रस्त्यावरच इको कारचा चक्काचूर झाला होता. या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. या अपघातानंतर बसमधील प्रवासी मोठ्या प्रमाणात घाबरले होते. गुलशन शकील चौगुले असं या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 48 वर्षीय महिलेचं नाव आहे. या अपघातानंतर (accident) अहमदनगर-कल्याण महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.

चौघेजण गंभीर जखमी
या अपघातामध्ये चार जण थोडक्यात बचावले असले, तरी ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामध्ये (accident) नेमकी चूक कोणाची एसटी बसचालकाची कि इको कार चालकाची हे मात्र अजून समजू शकलेले नाही. मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इको कार आणि एसटी बस यांच्यात धडक झाल्यानंतर एसटी बस थेट शिवारात घुसली होती.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Comment