भाजपच्या ४१ वा स्थापना दिनात सोशल डिस्टनसिंगचा बोजवारा

शहरातील उस्मानपुरा परिसरातील जिल्हा कार्यालयात साजरा

औरंगाबाद | भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस शहरातील उस्मानपुरा परिसरातील जिल्हा कार्यालयात साजरा करण्यात आला. मात्र यावेळी सोशल डिस्टनसिंगचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे स्पष्ट दिसून आले. भारतीय जनता पक्षाचा आज ४१ वा स्थापना दिन होता. याच निमित्ताने भाजपा कार्यालयाच्या समोर पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला.

१९५१ साली डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी ‘भारतीय जन संघा’ची स्थापना केली होती. १९७७ साली इतर अनेक पक्षांसोबत हाच पक्ष ‘जनता पक्ष’ म्हणून समोर आला. १९८० साली जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने आपल्या सदस्यांना पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे ‘दुहेरी सदस्य’ होण्यास बंदी घातली होती. यानंतर जनसंघाच्या काही सदस्यांनी पक्ष सोडून नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली.  ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. पक्षाचा ४१ वा स्थापना दिवस आज भाजपाच्या शहर कार्यालयात साजरा करण्यात आला.

पक्षाचा स्थापना दिन साजरा करताना जिल्ह्यात कलम १४४ व ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यासाठी मनाई आदेश लागू असताना, वाढती कोरोना रुग्णाची संख्या वाढत असताना या उत्साही कार्यकर्त्यांना याचे भान नसल्याचे दिसून आले. एरव्ही प्रशासन आणि राज्य सरकार वाढती रुग्ण संख्येस रोखण्यासाठी अपयशी ठरले, असल्याचे आरोप भाजपा कडून करण्यात येतो. आजच्या पक्ष स्थापनेच्या कार्यक्रमाला मात्र गर्दी जमवून प्रशासनाच्या सूचना आणि आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like