मुंबई | शिवसेना-भाजपची युती झाली खरी, पण ही युती काही अटींवर आधारीत आहे.शिवसेना-भाजप युती होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजप समोर ५ अटी टाकल्या होत्या.या अटी मान्य केल्यावरच शिवसेना युती करण्यास तयार झाली आहे. राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याची अट शिवसेनेने भाजप समोर ठेवली आहे. असे न केल्यास युती तुटेल असे शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.
२००१ पासून पाडापाडीचे कटकारस्थान चालू आहे ते बंद करायचे असल्यास आणि युतीत पावित्र्य राखण्यासाठी या अटी महत्वाच्या आहेत.म्हणून युती होण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यावर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ अशी अट ठेवली होती, ही अट मान्य झाल्यावरच युती करण्यात आली आहे अशी माहिती रामदास कदंम यांनी दिली.
मुख्यमंत्रीपदाची ही अट मान्य नसेल तर आम्ही उद्धव ठाकरेंना सांगून ही युती तोडू असेही रामदास कदम म्हणाले.युती मार्फत उद्धव ठाकरेंनी नानार प्रकल्प कोकणातून हद्दपार केला आणि कोकणाला वाचविले, त्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.भाजपसमोरील पहिली अट कोकणातून नानार प्रकल्प काढणे हीच होती.
शिवसेना-भाजप ची युती या अटींवर टिकते की, गेल्यावेळी प्रमाणे निवडणुकीनंतर तुटते हे निवडणूक झाल्यावरच कळेल.
इतर महत्वाचे –
‘पैसे भरा नाहीतर तुरुंगात जा’ सर्वोच्च न्यायालयाचा अनिल अंबांनी यांना दणका