हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकवेळ कोणाचीही मदत घेईन पण एक दिवस नक्कीच मी या देशाचा पंतप्रधान होईन अशी सिंहगर्जना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. ते कोल्हापूर येथे बोलत होते.
मी कुणाचा गुलाम म्हणून फिरत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ध्येय दिल्ली आहे. त्यामुळे कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान जरुर होईन,’ असं विधान महादेव जानकर यांनी केलं.
काँग्रेस- राष्ट्रवादीचा रस्ता डांबरीकरणाचा आहे, तर भाजपचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. मी मात्र पाणंदीने पुढे चाललो आहे. माझाही सूर्य कधी तरी उगवेल अशी देखील आशा त्यांनी व्यक्त केली.
कोण आहेत महादेव जानकर
महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष असून 2014 साली ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि महादेव जानकर यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये महादेव जानकर यांचा 69 हजार मतांनी पराभव झाला. जानकर यांनी चार लोकसभा निवडणुका लढवल्या असून प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण जानकर पराभूत होऊनही चर्चेत राहिले.