कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंकज हॉटेल जवळ बोलेरो-टेंम्पो-दुचाकी अशा झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. याबाबतची फिर्याद टेंम्पोचालक सुशिलकुमार संतोष गायकवाड (रा. शेणोली, ता. कराड) यांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी बेलोरो चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघातात विशाल निवृत्ती यादव (रा. विमानतळ, मुंढे, ता. कराड) असे ठार झालेल्याचे नाव आहे. गणेश सुरेश वेल्हाळ (रा. काशिळ, ता.जि. सातारा) असे गुन्हा नोंद झालेल्या बोलेरो चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी गायकवाड हे सोमवारी सकाळी मुंढे येथून टेंम्पोमधून सेंट्रीगचे साहित्य घेऊन शेणोलीला निघाले होते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंकज हॉटेलजवळ आले असता, त्यांच्या टेंम्पोला पाठीमागून कशानेतरी धडक दिल्याने त्यांचा टेंम्पो पलटी झाला. त्यांनी टेंम्पोमधून बाहेर येऊन पाहिले असता, बेलाेरे जीपने त्यांच्या टेंम्पोला व पाठीमागे असलेल्या दुचाकीस्वाराला धडक दिली होती.
त्यावेळी जमलेल्या लोकांनी गंभीर जखमी झालेल्या युवकास उपचारासाठी रूग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू असताना जखमीचा मृत्यू झाला. याप्रकरणी टेंम्पोचालक याने शहर पोलिसात फिर्याद दिली असून बेलोरो चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group