व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर ट्रक उलटून भीषण अपघात, एकाचा मृत्यू

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-पुणे जुन्या महामार्गार एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये पोएंजे गावाजळ टँकर उलटल्यामुळे हा अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातात (accident) एकाचा मृत्यू झाला आहे तर या टँकरखाली अनेकजण अडकले आहेत. टँकर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या अपघाताची (accident) माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाकडून आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून या टँकरखाली अनेकजण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथक आणि पोलिसांकडून या अपघातातील (accident) लोकांचे बचावकार्य सुरु आहे.

नवीन मुंबई-पुणे एक्सप्रेसप्रमाणे आता मुंबई-पुणे जुना एक्सप्रेसवेवर देखील मोठ्या प्रमाणात अपघात (accident) होत आहेत. मागील गेल्या काही महिन्यांपासून होणाऱ्या सततच्या अपघातावरून (accident) हे दिसून येत आहे.

हे पण वाचा :
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक
जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
SSC CGL अंतर्गत 20,000 जागांसाठी बंपर भरती
‘या’ multibagger stock ने फक्त 25,000 रुपयांद्वारे गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये