अंबरनाथमध्ये भर दिवसा गोळीबार, CCTV फुटेज आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अंबरनाथ : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात काल दुपारी दोन गटात मोठा राडा झाला. त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी होती. यावेळी आरोपींनी हाणामारी केली तसेच गोळीबारसुद्धा (Firing) केला. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय घडले नेमके ?
अंबरनाथच्या छत्रपती शिवाजीनगर परिसरात आज काही हल्लेखोरांनी गोळीबार (Firing) केला. या गोळीबारात (Firing) तुषार गुंजाळ नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गोळीबार केल्यानंतर झालेल्या झटापटीत पिस्तूलचे मॅगझीन, जिवंत काडतूस रस्त्यावर पडले होते. दुपारच्या सुमारास तुषार आणि गणेश हे दोघे भाऊ शिवाजीनगर शाखेसमोरील मुख्य रस्त्याच्या शेजारी बोलत उभे होते. यावेळी कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी दोघांच्या दिशेने गोळीबार (Firing) केला. हल्लेखोर इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी गोळीबार (Firing) केल्यानंतर हत्यारांनी सचिन आणि तुषारवर वार देखील केले. यानंतर हल्लेखोर कारमध्ये बसून पसार झाले.

यानंतर या हल्यात जखमी झालेल्या तुषार आणि गणेश यांना अंबरनाथच्या खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान तुषारचा मृत्यू झाला. या गोळीबाराची (Firing) माहिती मिळताच अंबरनाथ शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा केला. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे. सीसीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्या आरोपींचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?