हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. यावरून आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला केला आहे. “महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणाऱ्या भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक असते,” असे सावंत यांनी म्हणत आहे.
मराठा आरक्षणावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर आरोप झाल्याने त्याबाबत उत्तर देण्यासाठी आज पुणे येथे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सावंत म्हणाले, ” मराठा आरक्षणाच्या विरोधात जी याचिका दाखल करण्यात आली ती सेव्ह मेरीट या नावाच्या संघटनेकडून दाखल करण्यात आलेली होती. या संघटनेचा मागोवा घेतल्यानंतर असे लक्षात आले कि, या संघटनेचे नागपूर कनेक्शन आहे. विशेष म्हणजे हे पदाधिकारी भाजपचेच आहेत. ज्या मराठा आरक्षणाबाबत भाजपकडून बोललं जातंय त्या भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक असते.
मराठा आरक्षणावर पुणे येथील पत्रकार परिषद-
मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्यांचे नागपूर कनेक्शन उघड
भाजपाचा पदाधिकारी अग्रेसर. फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले पाहिजेhttps://t.co/2kyJeaeA3D— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 14, 2021
यावेळी सावंत यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ” मराठा आरक्षणाबाबत मोर्चा काढणार असल्याचा इशारा देणारे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला आहे. त्यांच्याकडूनच मराठा समाजाची दिशाभूल केली जात असून ते या समाजातील लिखाण फसवण्याचे काम करीत आहे.”
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in