कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
भारतीय फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग आणि लाकूडकाम उद्योगाला ’मेक इन इंडिया’ व्हिजनसह या क्षेत्रामधील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून भारताला स्थापित करणे हे उद्दीष्ट आहे. भारतातील सर्वात मोठ्या फर्निचर क्षेत्रातील सर्वात मोठ प्रदर्शन असलेल्या इंडियावुडच्या 11 व्या आवृत्तीचे आयोजन न्युरेमबर्ग मेसे करीत असून, 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2020 या कालावधीत बेंगळुरूमधील बेंगळुरू आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात हे आयोजन करण्यात येणार आहे. फर्निचर उत्पादन इंडस्ट्रीसाठी लागणारी यंत्रसामग्री, कच्चे साहित्य, पॅनेल्स, हार्डवेअर, आणि फिटिंग्जचे प्रदर्शन मांडण्या्त येणार आहे.
या पाच दिवसीय मेगा शोमध्ये सुतारकाम, कौशल्य, इनोव्हेशन, ऑटोमेशन आणि डिजीटलायझेशनवर भर देण्यात येणार आहे. भारतीय फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग आणि लाकूडकाम उद्योगाला ’मेक इन इंडिया’ व्हिजनसह या क्षेत्रामधील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून भारताला स्थापित करणे हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच या क्षेत्रा मध्ये भारताला टॉप मैन्युफैक्चरिंग डेस्टिनेशन म्हणून स्थापित करायचे आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, नाशिक, नागपूर, वसई, कोल्हापूर आणि महाराष्ट्र भागातील 80 हून अधिक प्रदर्शक यात सहभागी होतील, शोमध्ये सामील झाल्यानंतर या सर्व व्यवसायाची चैकशी वाढण्याची अपेक्षा आहे. एशियन प्री लेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, टेक्नोव्हास वुड कोटिंग, स्पेसवूड फर्निशर्स प्रायव्हेट लिमिटेड, वरुण इम्पेक्स, रुदाणी इंटरप्रिट्स यासारख्या काही कंपन्या या मेगा शोचा भाग असतील.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.