संपत्तीच्या वादातून मारहाण करून एकाचे केले अपहरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | वैजापूर शहरातील फुलेवाडी रस्त्यावर सहा जणांनी मिळून एकाला जबर मारहाण करत अपहरण केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. संपत्तीच्या वादातून मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. याबाबत सहा जणांविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय बाबूलाल पहाडे, सुमित विजय पहाडे, राजविजय पहाडे व अन्य तिघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन रिखबचंद (55) जैन हे शहरातील फुलेवाडी रोड लगत त्यांच्या वडिलोपार्जित घरात वास्तव्यास आहेत. 15 मे रोजी त्यांच्या भावाचे निधन झाले. त्यानंतरच्या काळात पवन यांची बहीण मंजुषा व तिचा पती विजय पहाडी यांचा जैन कुटुंबियांचा संपत्ती वाटणीवरून वाद सुरू होता.

यावरून दोन तारखेला सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विजय बाबूलाल पहाडी व त्यांची मुले सुमित पहाडी राजू पहाडी तिघे हे फुलेवाडी रोड येथे पवन यांच्या घरी आले यावेळी त्यांनी पवन यांना बेदम मारहाण केली. व पवन यांना पांढऱ्या रंगाची तवेरा (क्र. एमएच 20 – बीवाय 6805) मध्ये बळजबरीने बसून घटनास्थळावरून पसार झाले. पवन यांच्या पत्नीने दिलेल्या नदीवरून पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment