हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश निवडणूक भाजपसाठी म्हणावी तेवढी सोप्पी राहिली नाही. आज सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मंत्र्याने राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला. उत्तरप्रदेशचे आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. धर्मसिंह सैनी यांनी राजीनामा दिला आहे. योगी सरकारसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी सरकारमधील ३ मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती
ज्या अपक्षेनं दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार युवक आणि लहान-सहान व्यापारी व छोटे उद्योजक यांनी राज्यात एकत्रितपणे भाजपचे सरकार बनिण्याचं काम केलं. मात्र, या सर्वांची आणि त्यांच्या लोकप्रतिनीधींची सातत्याने उपेक्षा होत आहे, त्यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं सैनी यांनी म्हटलं आहे.
UP Minister Dharam Singh Saini resigns pic.twitter.com/Ey7fxThUtN
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 13, 2022
दरम्यान यापूर्वी उत्तर प्रदेशचे पर्यावरणमंत्री दारासिंह चौहान यांनी गुरुवारी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला. राज्यातील दलित, वंचित आणि मागासवर्ग, शेतकरी आणि बेरोजगारी संदर्भातील सरकारने उपेक्षा केली आहे. तसेच, मागास आणि ओबीसी प्रवर्गाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं दिसून आलेय. त्यामुळे, मी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देतोय, असे दारासिंह यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे
ओबीसी समुदायामधील स्वामी प्रसाद मौर्य आणि दारासिंग चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी भाजपचा राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे. याशिवाय अन्य चार आमदारांनी देखील भाजप सोडली आहे. भाजप सोडणाऱ्या नेत्यांनी दलित, मागास, ओबीसी समाजावर अन्याय आणि भेदभाव केल्याचा आरोप योगी आदित्यनाथ सरकारवर केला आहे.