औरंगाबादेत ओमायक्रॉनचा एक तर मराठवाड्यात 8 नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाड्यात ओमायक्रॉनचा विळखा वाढत असून काल दिवसभरात 8 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक 5 रुग्ण हे उस्मानाबाद जिल्ह्यातील असून, औरंगाबाद, जालना, लातूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. औरंगाबादमधील रुग्ण हा 24 वर्षीय तरुण असून तो काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतून परतला होता. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

मराठवाड्यात आतापर्यंत उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नांदेड या चार जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले होते. यामध्ये रविवारी जालन्याचीही भर पडली, तर औरंगाबादमध्ये आतापर्यंत 2 ‌ रुग्णांचे निदान झाले होते हे दोन्ही रुग्ण उपचार घेऊन ओमायक्रोन मुक्त झाले आहेत परंतु औरंगाबाद मध्ये काल आणखी एका रुग्णाची वाढ झाली.

औरंगाबाद मधील 24 वर्षीय रुग्ण डिसेंबर रोजी अमेरिकेतून परत आला होता. दिल्लीमार्गे औरंगाबाद मध्ये दाखल झाल्यानंतर त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर शहराबाहेर जाण्यासाठी 29 डिसेंबर रोजी कोरोना तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचा नमुना जिनोमिक सिक्वेंसिंग साठी पाठवण्यात आला. त्याचा अहवाल काल आला असून, त्यातून हा रुग्ण व मायक्रम बाधित असल्याचे निदान झाले आहे. या रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

Leave a Comment