कांद्याची हिरवी पात आपल्या आरोग्यासाठी आहे महत्वाची

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कांदा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे. कांद्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते तसेच त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत पण होते. कांद्याची हिरवीगार पात हि गावाकडे मिळते. हिरव्या पालेभाज्या या आहारात असल्या पाहिजे. कांदयाच्या पातीपासून वेगवेगळ्या भाज्या बनवता येतात. तसेच त्याच्यापासून अनेक नवीन पदार्थ बनवले जातात. लहान मुलांना कांद्याची पात आवडत नसेल तर पिझ्झा सारख्या पदार्थामध्ये कांद्याच्या पातीचा समावेश करावा . मुलं असे पदार्थ आवडीने खातात.

कांद्याच्या पाती मध्ये सल्फर मुबलक प्रमाणात असते. यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असून पौष्टिक घटक भरपूर हातात. त्यामुळे जेव्हा आपण आजारी पडतो त्यावेळी तुम्ही कांद्याच्या भाजीचा वापर हा आपण सलाड म्हणून करू शकतो. कांद्याच्या पतीचा वरचा भाग तसेच खालचा पांढरा भाग हा सुद्धा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त—-

आपले वजन कमी करायचे असल्यास कांद्याच्या पातीचा वापर करा. तसेच ब्लड प्रेशर आणि आणि कोलेस्ट्रॉल यासारख्या समस्या दूर

कांद्याच्या पाती च्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवले जाते त्यामुळे हृदय रोग असलेल्या रुग्णांच्या आहारात कांद्याच्या पातीच्या भाजीचा समावेश नेहमी असू द्यावा.

— रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्या लोकांनी कांद्याच्या भाजीचा समावेश करावा. कांद्याच्या पातीत असलेल्या सल्फर मुळे शरीरात योग्य प्रमाणात इन्सुलिन त्यात व्हायला मदत होते ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. म्हणूंन मधुमेहींच्या आहारात कांद्याच्या पातीचे असणे अगदी गरजेचे आहे.

— डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभकारक

कांद्याच्या पातीत असलेले ल्युटेन आणि व्हटामिन ‘ए’ डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. तुम्हाला रातांधळेपणाचा त्रास होत असेल अश्या वेळी याचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. म्हणून लहानपणा पासून कांद्याची पात मुलांच्या जेवणात असावी याची काळजी घेतली गेलीच पाहिजे.

— कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो

कांद्याच्या पातीत असलेले सल्फर आणि फ्लेवनॉइड्स मुळे कॅन्सरच्या पेशी बनवणाऱ्या एन्झाइम्स ना आटोक्यात ठेवण्यास मदत होते. तसेच पेशींना बळकट बनवण्यासाठी सुद्धा कांद्याचा वापर केला जातो.

पोटाच्या समस्यांसाठी गुणकारी—

कांद्यामध्ये फायबर चे प्रमाण हे जास्त असते . त्यामुळे आपले पोट साफ करण्यास मदत होते.

हांडांच्या बाळकटीला मदत —

कांद्याची पात हि हाडे मजबूत करण्यास मदत करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’