सातारा जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन बेड व्यवस्थापन सुरु – जिल्हाधिकारी शेखर सिंह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात उद्या पासून ऑनलाईन बेड व्यवस्थापन सुरु होईल अशी माहिती सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. यामुळे आता कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड आहेत याची माहिती रुग्णांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. रेमडीसीव्हर इंजेक्शन आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महत्वपूर्ण निवेदन केले यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यात रेमडेसिवीर औषधाची असलेली टंचाई दूर होणार असून हे औषध सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत उपलब्ध होण्यासाठी नियोजन केले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांना उपचारासाठी वेळेत बेड मिळावा यासाठी मंगळवार दि.29 पासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेबसाईट सुरू करण्यात येत आहे. बेडची उपलब्धता आणि बेडचे व्यवस्थापन एका क्लिकवर कळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1079601739165588/

सातारा जिल्ह्यात बेडची उपलब्धता व त्याच्या व्यवस्थापनाबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना होत्या. बेड व्यवस्थापनाची माहिती प्रशासनाच्या 1077 या हेल्पलाईनवरूनही माहिती देण्याचा प्रयत्न सुरू होता.ही माहिती मिळावी यासाठी लिंक व वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. रुग्ण व्यवस्थापन प्रणाली असून या covid19satara.in लिंक द्वारे रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध होणार आहे. काही अडचण आली तर टोल फ्री क्रमांक 1077 हा सुध्दा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment