आठवलेंचा एक आमदार, एक खासदार तरी आहे का? NDAमध्ये सामील होणाच्या ऑफरवर शरद पवारांचा टोला

पंढरपूर । केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना NDA मध्ये सहभागी  होण्याची ऑफर दिली होती. जर शिवसेना भाजपासोबत येणार नसेल तर शरद पवार यांनी राज्याच्या भल्यासाठी NDA मध्ये सहभागी व्हावं. भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं असा सल्ला आठवले यांनी पवारांना दिला होता. त्यावर ”रामदास आठवले यांच्या पक्षाचा एक आमदार किंवा एक खासदार तरी आहे का? त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही असं सांगत पवारांनी आठवलेंच्या ऑफरची खिल्ली उडवली. आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर पवार पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक आबा साळुंखे उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शरद पवारांना एनडीएत सामील होण्याच्या सल्ल्यावर पवार म्हणाले,”रामदास आठवले यांच्या पक्षाचा एक आमदार नाही किंवा एकही खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही.” असं टोला त्यांनी यावेळी लगावला. याशिवाय फडणवीस-राऊत भेटीबाबत पवार यांनी सांगितलं कि, ”खासदार संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आठवलेंची पवारांना ऑफर तरी काय होती?
”राजकीय वर्तुळातील आरोप- प्रत्यारोप आणि भूमिका पाहता आमची दोस्ती अशी आहे की त्यांना तिकडे आणि मला इकडे करमत नाही, तर पवारांनीच इथं यावं.तसं झाल्यास पवारांना पुढे मोठं पद मिळू शकतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगला मित्र मिळू शकतो,” असं वक्तव्य करत आठवलेंनी सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. ”जर शिवसेना भाजपासोबत येणार नसेल तर शरद पवार यांना राज्याच्या भल्यासाठी NDA मध्ये सहभागी व्हावं. भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं. शिवसेनेसोबत राहण्यात काहीच फायदा नाहीये” असं आठवले यांनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

You might also like