नवी दिल्ली । एसबीआय कार्डद्वारे (SBI Card) होणाऱ्या ट्रान्सझॅक्शनमधील ऑनलाईन पेमेंट (Online Payment) चा हिस्सा 50 टक्क्यांहून अधिक आहे. यामध्ये किराणा, वीज इत्यादी बिले भरणे, इन्शुरन्स प्रीमियम इत्यादींचा समावेश आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,”ऑनलाइन पेमेंटचा हा ट्रेंड आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.”
एसबीआय कार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राम मोहन राव अमारा यांनी देशातील कोरोना विषाणूच्या नुकत्याच वाढणाऱ्या प्रकरणांवर सांगितले की,” लोकांच्या खरेदी व्यवहारावर याचा परिणाम होईल की नाही हे सांगणे कठीण आहे.”
ऑनलाईन पेमेंटमध्ये जवळपास नऊ टक्के वाढ
अमारा म्हणाले की,” ऑनलाइन पेमेंट हे असे माध्यम आहे जे आणखी वर जाईल.” अमारा म्हणाले,” आता एसबीआय कार्डवरील 53 टक्के पेक्षा जास्त खर्च ऑनलाइन पेमेंटद्वारे होतो. पूर्वी ते 44 टक्के होते. किराणा वस्तू, वस्त्रे, युटिलिटी बिले भरणे, इन्शुरन्स प्रीमियम आणि ऑनलाइन शिक्षणासारख्या प्रकारांमुळे ऑनलाईन पेमेंटमध्ये जवळपास नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे.”
ते म्हणाले, “या वर्गवारीत कंपनीच्या ऑनलाइन खर्चात अचानक वाढ झाली आहे. आम्हाला विश्वास आहे की, ते ऑनलाइन राहील. लोक आता ही आरामदायक परिस्थिती पसंत करतात. मग ते कोविड असो वा नसो, आता काही फरक पडणार नाही.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा