दारु घ्यायला गर्दी कशाला?; केजरीवाल सरकारकडून ऑनलाईन दारुविक्रीसाठी टोकन सिस्टीम सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लॉकडाउनचा कालावधी दोन आठवड्यांसाठी वाढवन्यात आला आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य दुकानं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. तसंच, रेड झोनमध्येही कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता दारु विक्रीला परवानगी मिळाली. पण, दारुची दुकाने पुन्हा सुरु झाल्यानंतर दारु खरेदीसाठी मद्यप्रेमींची एकच गर्दी दुकानासमोर होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारच्या महसुलात वाढ होतीये खर पण कोरोना रुग्णाची संख्या मात्र वाढते आहे. यावर केजरीवाल सरकारने उपाय केला आहे. दारुच्या दुकानासमोर गर्दी होवू नये, म्हणून केजरीवाल यांनी ऑनलाइन टोकन व्यवस्था सुरु केली आहे.

केजरीवाल सरकारने https://www.qtoken.in/ ही एक वेबसाइटची लिंक जारी केली आहे. या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर दारु खरेदीसाठी जवळचं दुकान निवडावं लागेल. त्यानंतर तारीख आणि वेळ सांगितली जाईल. त्यावेळेमध्ये संबंधित व्यक्ती रांगेमध्ये उभे न राहता दुकानामध्ये जाऊन दारु खरेदी करु शकेल.

टोकन दुकानात दाखवताना एक सरकारी ओळखपत्रही दाखवावं लागणार आहे. दारुच्या दुकानांबाहेरील गर्दी कमी होत नसल्याने आता सरकारने ऑनलाइन टोकन व्यवस्था सुरू केली आहे.

You might also like