एक राजाच चागल्या पद्धतीनं राज्य चालवू शकतो, चंगू मंगू नाही; कंगणा रानावतचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे आपल्या भूमिका मांडते. यावेळी तिनं कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाचं निमित्त साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “एक राजाच चागल्या पद्धतीनं राज्य चालवू शकतो, चंगू मंगू नाही,” अशी जोरदार टीका तिनं केली आहे.

“हे शहर आता जणू एखाद्या सांगाड्यासारखं भासतंय. कधीकाळी जे इतरांना स्वत:च्या दहशतीनं घाबरवत होते. आज ते स्वत: कोरोनाच्या दहशतीखाली जगतायेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची ही स्थिती पाहून मला आश्चर्य वाटतंय. जय मुंबा देवी.” अशा आशयाचं ट्विट करुन तिनं मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला आहे.

काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं कंगनानं केलेलं अनधिकृत बांधकाम पाडलं होतं. तेव्हापासून ती सातत्यानं महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहे. कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान या ट्विटवर महाराष्ट्र सरकारनं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आता नव्याने ट्विट करुन तिनं मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला आहे.

You might also like