औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा हा ६७ हजार पार जाऊन पोहोचला असताना दुसरीकडे प्रादुर्भाव कमी होण्यासाठी विशेष यंत्रणा उभी केली जात आहे. त्यासाठी कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात चाचणी केली जात आहे. रेल्वे स्थानकावर रेल्वेतून विविध ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांचे काय? असा देखील प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे.
केवळ दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध ठिकाणी कोरोनाच्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यात दुसरीकडे प्रतिदिन कोरोनाचा आकडा एक हजाराहून अधिक येत आहे. त्यामुळे चिंता वाढत चालली आहे. असे असले तरी रेल्वे स्थानकावर अजूनही केवळ दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांचीच तपासणी केली जात आहे. इतर प्रवाशी मात्र तपासणी न करताच शहरात येत आहेत.
रेल्वेने प्रतिदिन मुबंई, नाशिक, दिल्ली, अमृतसर, हैद्राबाद, परभणी, लातूर, नांदेड आदी ठिकाणाहून प्रवासी मोठ्या प्रमाणात शहरात येतात. बऱ्याच रेल्वे सध्या धावत असून त्यामुळे बरेच प्रवासीदेखील शहरात ये-जा करत आहेत. असे असताना दुसरीकडे अजूनही केवळ दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांचीच कोरोनाची चाचणी केली जात आहे. इतर प्रवासी तपासणीविनाच शहरात ये-जा करत आहेत. या आगोदर रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना काहि दिवस कॉरंटाईन तरी केले जात होते. परंतु आता कॉरंटाईन केले जात नाही.
याशिवाय याअगोदर रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले होते. याशिवाय त्यांची तपासणी करूनच त्यांना रेल्वे मध्ये प्रवेश दिला जात होता. परंतु आता दिल्ली मध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता केवळ दिल्ली हुन येणाऱ्या प्रवाशांचीच तपासणी केली जात आहे. इतर ठिकाणी देखील कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणाहून कोरोनाचे रुग्ण समोर येत आहेत. असे असतानाही दिल्लीव्यतिरिक्त इतर प्रवाशांची कोरोनाची तपासणी अजूनही केली जात नाही. त्यामुळे रेल्वेने येणाऱ्या इतर प्रवाशांचे काय? असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा