हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक जिंकून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ उद्या मायदेशी परतणार आहे. बार्बाडोसमधून टीम इंडियाचे खेळाडू भारताकडे रवाना झाले असून उद्या सकाळी ५ ते ६ च्या दरम्यान नवी दिल्लीत दाखल होतील. दिल्लीत आल्यानंतर सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील आणि मुंबईकडे रवाना होतील. मुंबईत ओपन बस मधून सर्व खेळाडूंची भव्य मिरवणूक निघेल असं बोलल जात आहे. बीसीसीआयने मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
२००७ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईत ओपन बसमधून भारतीय खेळाडूंची गौरव यात्रा काढण्यात आली होती. आताही अशाच प्रकारची खेळाडूंची भव्य मिरणवूक काढण्यात येईल. मुंबई विमानतळापासून वानखेडे स्टेडियम पर्यंत हि भव्य मिरवणूक काढली जाईल. पुन्हा एकदा विश्वविजेत्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले असून यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळेल. मुंबईला भारतीय क्रिकेटची पांढरी मानले जाते. मुंबईने अनेक दिग्गज खेळाडू भारताला दिले आहेत. त्यातच कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचाच असल्याने मुंबईकरांचे प्रेम नेहमीच रोहितला मिळालं आहे.
टीम इंडियाच्या आगमनानंतरचे संपूर्ण वेळापत्रक कसे असेल?
४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता बार्बाडोसहून नवी दिल्लीत खेळाडू पोचतील.
सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान मोदींच्या घराकडे टीम इंडिया रवाना होईल.
मोदींची भेट घेतल्यानंतर सर्व खेळाडू मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
मुंबई विमानतळावरून वानखेडे स्टेडियमपर्यंत खेळाडूंची ओपन बस मधून मिरवणूक निघेल.
वानखेडे स्टेडियमवर छोटस प्रेझेन्टेशन पार पडेल.
रोहित शर्मा वर्ल्डकप ट्रॉफी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे सुपूर्त करेल.
त्यानंतर खेळाडू आपापल्या घरी जातील.