हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI कडून आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा ऑनलाइन दिल्या जातात. याबरोबरच SBI ने ऑनलाइन पोर्टलवर घरबसल्या FD उघडण्याची सुविधाही सुरु केली आहे. याशिवाय आता घरबसल्या SBI मध्ये FD खाते देखील उघडता येते. चला तर मग आज आपण घरबसल्या ऑनलाइन FD कशी उघडावी ते जाणून घेउयात…
‘ऑनलाइन FD खाते उघडण्याची प्रक्रिया जाणून घ्या
सर्वात आधी, SBI ऑनलाइन पोर्टलला भेट द्या.
पर्सनल माहिती देऊन लॉग इन करा किंवा नवीन युझर म्हणून नोंदणी करा.
यानंतर, ‘डिपॉझिट स्कीम’ > ‘टर्म डिपॉझिट’ > ‘ई-फिक्स्ड डिपॉझिट’ वर क्लिक करा.
त्यानंतर FD चा प्रकार निवडा आणि ‘Proceed’ वर क्लिक करा.
यानंतर खात्याचे तपशील भरा. यानंतर, FD चे मूल्य निवडा आणि रक्कम एंटर करा.
60 वर्षांवरील लोकांसाठी, ‘ज्येष्ठ नागरिक’ टॅबवर टिक करा.
यानंतर cumulative/STDR deposit or a non-cumulative/TDR deposit निवडा आणि मॅच्युरिटीचा कालावधी निवडा.
आता मॅच्युरिटी इंस्ट्रक्शन्स निवडा आणि ते वाचल्यानंतर अटी आणि नियम मान्य करा.
यानंतर ‘सबमिट’ वर क्लिक करून FD खाते उघडता येईल.
ज्येष्ठ नागरिकांना मिळेल जास्त व्याज
हे जाणून घ्या कि, SBI कडून 7 दिवसांपासून ते 10 दिवसांच्या कालावधीसाठी अनेक FD योजना ऑफर केल्या जातात. SBI च्या FD वर 7 दिवस ते 10 वर्षांच्या दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना 3% ते 7.1% व्याज दिले जात आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना या सर्व कालावधीच्या एफडीवर 50 बेसिस पॉइंट्सचे अतिरिक्त व्याज मिळते. यतसेच बँकेच्या 400 दिवसांच्या अमृत कलशवर FD सर्वसामान्य नागरिकांना 7.1 टक्के व्याज मिळत आहे. हे दर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू आहेत.
एसबीआयच्या एफडीचे नवीन दर
SBI कडून 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3% दराने व्याज दिले जात आहे. त्याचप्रमाणे, 46 दिवस ते 179 दिवसांसाठी एफडीवर 4.5 टक्के, 180 दिवस ते 210 दिवसांसाठी 5.25 टक्के, 211 दिवस ते 1 वर्षाच्या FD वर 5.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे. 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.00 टक्के तर 3 वर्षे ते 10 वर्षांच्या FD योजनांवर 6.5 टक्के व्याज दिले जात आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/deposit-rates/retail-domestic-term-deposits
हे पण वाचा :
Jio कडून ग्राहकांना धक्का, ‘हा’ रिचार्ज प्लॅन 100 रुपयांनी महागला
येत्या 7 दिवसात पूर्ण करा ‘ही’ 5 महत्वाची कामे अन्यथा मिळू शकेल Income Tax ची नोटीस
Bank Account बंद करताय जरा थांबा… लक्षात घ्या ‘या’ 5 गोष्टी !!!
New Business Idea : वर्षभर मागणी असणारा ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न
हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये शेअर्स डंप केल्याचा आरोप असलेल्या Amrita Ahuja कोण आहेत ? जाणून घ्या त्यांचे भारत कनेक्शन