आता SBI मध्ये कुठेही अन् कधीही उघडता येणार खाते !!! कसे ते जाणून घ्या

Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI कडून नुकतेच एक नवीन बचत खाते लॉन्च करण्यात आले आहे. हे खाते बँकेच्या YONO App द्वारे कोठूनही आणि कधीही सुरू करता येऊ शकते. एका व्हिडिओद्वारे बँकेकडून या खात्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये खात्याच्या फीचर्सविषयी देखील माहिती देण्यात आली आहे.

Some SBI customers complain of digital outages on mobile platform

ट्विटरवर याबाबतची माहिती संतांना बँकेने म्हंटले की, “आता बँकेत न जाताही आमच्याकडे खाते उघडता येईल. आमच्या अगदी नवीन KYC व्हिडिओ सर्व्हिसद्वारे कुठेही आणि कधीही बचत खाते उघडता येईल. YONO वर आताच अर्ज करा.” आता ग्राहकाला कोणत्याही शाखेत न जाता पेपरलेस पद्धतीने SBI इंस्टा प्लस बचत खाते उघडता येईल.

SBI waives of loan processing fee on Yono app - Thesmeindia

या खात्याच्या फीचर्स विषयी जाणून घ्या…

YONO App द्वारे ग्राहकाला NEFT, IMPS आणि UPI वापरून पैसे ट्रान्सफर करता येतील.
याशिवाय, SBI चे इंटरनेट बँकिंग देखील वापरता येईल.
ग्राहकाला रूपे क्लासिक कार्ड दिले जाईल.
इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि YONO App द्वारे 24 तास बँकिंग सुविधा मिळतील.
SBI ची क्विक मिस्ड कॉल सुविधा आणि SMS अलर्ट सुविधा मिळेल.
इंटरनेट बँकिंग चॅनलद्वारे अकाउंट ट्रान्सफरची सुविधा मिळेल.
नॉमिनेशन सुविधा बंधनकारक असेल.
ग्राहकाने मागणी केल्यास त्याला पासबुक देखिल दिले जाईल.
चेकबुकसाठी, डेबिट/ व्हाउचर ट्रान्सझॅक्शनसाठी किंवा इतर कोणत्याही सिग्नेचर आधारित सर्व्हिसेससाठी ग्राहकाला जवळच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल.

Jolt to SBI account holders: Bank reduces interest rate on savings account | Business News – India TV

कोणाकोणाला खाते उघडता येईल ???

18 वर्षे किंवा त्याहून जास्त वय असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला हे खाते उघडता येईल. तसेच त्यांना भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशात कर दायित्व नसावे. त्याच बरोबर ग्राहकाकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे बंधनकारक असेल. यावेळी ग्राहकाचा ई-मेल आयडी आणि फोन नंबर त्याच्या नावावर रजिस्टर्ड असला पाहिजे. डिजिटल बचत खात्यासाठी, ग्राहकाला बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करावे लागेल ज्यासाठी बँकेला भेट द्यावी लागेल. इथे हे लक्षात घ्या कि, एका मोबाईल नंबरवरून फक्त एकच डिजिटल बचत खाते उघडता येईल. SBI डिजिटल बचत खाते जॉईंट अकाउंट अंतर्गत उघडता येणार नाही.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.onlinesbi.sbi/

हे पण वाचा :

Chinese Loan App प्रकरणी ED कडून पेटीएम, रेझरपेच्या कार्यालयांवर छापे

SBI देत आहे अल्पवयीन मुलांसाठी खाते उघडण्याची सुविधा, त्याचे फायदे काय आहेत ते पहा

Kotak Mahindra Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा

Business Idea : केळीच्या लागवडीद्वारे अशा प्रकारे करा भरपूर कमाई !!!

Post Office च्या ‘या’ योजनेत दररोज 95 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 14 लाख रुपये !!!