विरोधकांनी माझ्यासोबत विकासाची लढाई करावी : आ. जयकुमार गोरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस

माण मधील विरोधक नेत्यांनी माझ्यासोबत विकासाची लढाई करावी, या मतदारसंघाच्या शेतीच्या पाणीप्रश्‍नासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करतोय. या भागांमधील रस्त्याचे प्रश्‍न सोडवण्यात मी यशस्वी झालो आहे. उत्तर माण मध्ये शेतकऱ्याच्या शिवारात ऊस पिकल्या शिवाय राहणार नाही. यासाठी काम करतोय असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी बिजवडी येथे व्यक्त केले.

यावेळी आमदार जयकुमार बोलताना म्हणाले, उत्तर माण तालुक्यामध्ये साखर कारखाने उभे राहिलेत. औद्योगिक एमआयडीसीचे मोठ काम आपण करतोय. या भागातील तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सोडवून जाणार आहे. पायाभूत सुविधा निर्माण करणे, चांगले रस्ते करणे, शेतीला पाणी आणणे, ज्या पिकांचे उत्पादन केले जाते त्या पिकांना बाजारपेठ निर्माण करून देण्यासाठी काम करणार आहे

उत्तर मान तालुक्यामध्ये बिजवडी ते जगदाळेवस्ती (राजवडी ) १ कोटी ९४ लाख, बिजवडी ते लिंबखोरी (येळेवाडी) रस्ता १ कोटी ४० लाख, प्रजिमा ४७ ते दडसवाडा रस्ता २ कोटी १ लाख, महालक्ष्मी मंदिर सभामंडप ५ लाख आदी कामांच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे ,माण पंचायत समितीच्या सभापती अपर्णा भोसले, माण तालुका कृषी बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख, उपसभापती वैशालीताई विरकर, माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव,  सरपंच आप्पासोा अडागळे, सरपंच रोहिदास राऊत, सरपंच किरण बरकडे, सरपंच नीलेश दडस,विठ्ठलराव भोसले, दौलतराव जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ विरकर यांनी केले. यावेळी अक्षयमहाराज भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.

Leave a Comment