करोनामुळं पांढर सोनं मातीमोल! कापसाची निर्यात ठप्प, महाराष्ट्राचं ५०० कोटींचं नुकसान

0
55
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमूळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. असं कोणतच क्षेत्र नाही ज्याला कोरोनाचा फटका बसला नाही आहे. पांढर सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस अर्थव्यस्थेला सुद्धा करोनाने चांगलाच तडाखा दिला आहे. कोरोनामूळे कापूस निर्यात ठप्प झाल्याने एकट्या महाराष्ट्राचं आतापर्यंत तब्बल ५०० कोटींचं नुकसान झालं आहे.

जगातील सर्वात मोठ्या कापूस बाजारपेठांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतातून चीन, पाकीस्तान, बांगलादेशासह जगभरात निर्यात होतेय. मात्र, कोरोनामूळे ही निर्यात सध्या संपुर्णपणे ठप्प झाल्याची स्थिती आहे. यामूळे देशभरात कापसाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. भारतातून तब्बल ४५ लाख कापसाच्या गाठी चीनमध्ये निर्यात होत असते. मात्र, चीनमध्येच करोनाची उत्पत्ती आणि त्यानंतर झालेल्या हाहाकाराने भारतातून होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. यंदा केवळ ४ लाख कापसाच्या गाठींची निर्यात चीनला करण्यात आली आहे.

या कापूस निर्यात बंदीची आर्थिक सर्वात जास्त झळ कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे. निर्यात ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे ३०० रुपयांचे नुकसान झालं आहे. त्यामुळं मिळेल त्या भावात कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कापूस व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार तब्बल २५ लाख क्विंटल कापूस विक्री विना पडून आहे. त्यामुळं करोनाशी मुकाबला करत असतांना आर्थिक संकटाच्या सापडलेल्या कापूस क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी दूरगामी परिणाम करणार धोरण सरकारने आखण्याची गरज आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here