फडणवीस-राज्यपाल भेट; म्हणाले राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य परिस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकावर टीका करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारीची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिलं आहे. यावेळी रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आपल्या वाहिनीवर सोनिया गांधींवर आक्षेपार्ह्य विधान केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होत. ही घटना म्हणजे मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण करणारी असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी या पत्रातून फडणवीस यांनी राज्यपालांना केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी स्थिती निर्माण केली जात आहे”.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात राज्य सरकारने कारवाई केलेल्या काही प्रसारमाध्यमांचा उल्लेख करत कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.  “एखादं वृत्त प्रतिकूल असेल तर त्याचा खुलासा करता येऊ शकतो. पण असे न करता थेट धमक्या देणे, अटक करणे, चौकशीचा ससेमिरा लावण्याची दहशत दाखवणे असे प्रकार सर्रास केले जात आहेत,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींची अशा पद्धतीने चौकशी करण्याचं धाडस सरकार दाखवू शकलेलं नाही”. “सोशल मीडियात सरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची सुद्धा मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरु आहेत. दुसरीकडे वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थ्यांनी सांगितलं असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुद्ध राज्य सरकारला याबद्दल जाब विचारला आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “एकूणच हे प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून अघोषित आणीबाणीसदृश्य आहेत. या सर्व घटनांची अतिशय गंभीर दखल घेत याबद्दल राज्य सरकारला जाब विचारावा,” अशी मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”