कोरोना HIV सारखा कधीच नष्ट होणार नाही, WHOची चेतावनी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । संपूर्ण जग कोरोना व्हायरसने ग्रासलं आहे. जगभरात लॉकडाऊनमुळं लोक घरात कोंडून आहे, उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प. तर दुसरीकडे कोरोना विषाणूचा प्रतिबंध करणाऱ्या औषधाचा अजूनही शोध लागलेला नाही. अशा बिकट परिस्थितीतून जात असताना जीवघेणा कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. ‘अन्य विषाणूंप्रमाणे कोरोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही’ असे मायकल जे रेयान म्हणाले. ते WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.

त्यासाठी त्यांनी HIV च्या विषाणूचे उदहारण दिले. ‘HIV चा विषाणू आजही अस्तित्वात आहे तसेच करोना व्हायरस नेमका कधी निघून जाईल ते सांगता येणार नाही’ असे रेयान म्हणाले. “HIV चा विषाणू अजूनही नष्ट होऊ शकलेला नाही. पण ज्यांना या विषाणूची लागण झाली त्यांना उत्तम आरोग्य राखून दीर्घायुष्य कसे लाभेल ते मार्ग आपण शोधले. आपल्याला वास्तवाचा स्वीकार केला पाहिजे. कोरोना व्हायरसचा आजार कधी संपेल ते आपल्याला ठाऊक नाही” असे रायन म्हणाले.

मागच्यावर्षी चीनच्या वुहान शहरातून या कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला होता. तेथून या विषाणूने जगभर आपले हातपाय पसरले. आतापर्यंत जगभरातील ४२ लाख नागरिकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. जगभरात तीन लाख लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देश लॉकडाउनमध्ये आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. उपासमारीचा, रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनसह जगातील प्रमुख देशांमध्ये कोरोनावर लस शोधण्याासठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. पण या आजाराला रोखणारे अजून एकही ठोस औषध सापडलेले नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment