हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटलीच्या फुटबॉल क्लब जुव्हेंटसने म्हटले आहे की,” त्यांच्या सर्व खेळाडूंचा कोविड-१९ चा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत ते मोठ्या गटात सराव सुरु करतील. जुव्हेंटस क्लबने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “इटालियन फुटबॉल महासंघाच्या (एफआयजीसी) वैद्यकीय वैज्ञानिक आयोगाकडून परवानगी आल्यानंतरच संपूर्ण संघाची काल कोविड -१९ ची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये सर्व खेळाडूंचा अहवाल नकारात्मक आला आहे. त्यानंतर आम्ही आता पुढील काही दिवसात मोठ्या गटात ट्रेंनिंग सुरु करू शकू. “
जुव्हेंटसच्या अनेक खेळाडूंनी याआधीच वैयक्तिकरित्या ट्रेंनिंग सुरु केली आहे. स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोनेही मंगळवारी आपल्या खेळाडूंबरोबर सराव केला. यापूर्वी असे मानले जात होते की लीग १३ जूनपासून सुरू होऊ शकेल आणि सगळ्या क्लबनेही गेल्याच आठवड्यात यासाठी मतदानही केले होते. मात्र, ही लीग १५ जूनपर्यंत सुरू होणार नसल्याचे प्रशासनाने सोमवारीच स्पष्ट केले आहे.
एफआयजीसीने नंतर सांगितले की,”त्याने सेरी-ए लीग सह सर्व स्पर्धांचे निलंबन हे १४ जूनपर्यंत वाढवले आहे. हा निर्णय कोरोनाव्हायरस या साथीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर घेतला गेलेला आहे. तथापि, गुरुवारी एफआयजीसीने म्हटले आहे की सेरी-ए लीगचा सध्याचा सिझन हा २० ऑगस्टपर्यंत संपेल आणि त्यानंतर १ सप्टेंबर २०२०-२१ पासून नवीन सिझन सुरू करता येईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.