हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वर्क फ्रॉम होम, सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाउनची अंमलबजावणी केली गेली आहे. अशा परिस्थितीत बहुतेक लोक घरातच असतात. घरातच असल्याने कंडोम, गोळ्या आणि एडल्ट सेक्स टॉयजच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सेक्सुअल वेलनेस उद्योगाच्या उत्पन्नामध्ये २४-२८ टक्के वाढ झालेली आहे. यामुळे केवळ लैंगिक आरोग्यावरच केंद्रित असलेल्या काही वेबसाइट्सच ट्रॅफिक प्रचंड वाढलेलं आहे. फर्स्टपोस्टच्या वृत्तानुसार, प्रमुख ई-कॉमर्स साइटच्या सूत्रांनी सांगितले की कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या ऑनलाइन विक्रीतही लक्षणीयरित्या वाढ झालेली आहे. त्याच वेळी, सेक्सुअल वेलनेस अंतर्गत एडल्ट सेक्स टॉयजची मागणी देखील खूप वाढली आहे. अशी उत्पादने विकणार्या कंपनीच्या वेबसाइटवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या उत्पादनांमध्ये बट प्लग्स, एनल ल्यूब्स, आई मास्क, थ्रस्ट वाइब्स, लोवेंश लश आणि फ्लॅशलाइट्सचा समावेश आहे.
ऑनलाइन सर्च आणि खरेदीमध्ये वाढ
अहवालानुसार, IMBesharamचे सह-संस्थापक राज अरमानी असे मानतात की ऑनलाइन सर्च आणि खरेदीमध्ये वाढ झालेली आहे. यावेळी लोक काही नवीन आणि सर्जनशील पर्याय शोधत आहेत. लॉकडाऊन दरम्यान कंपनीने ३,९६० हून अधिक ऑर्डर्सची डिलिव्हरी पाठविली आहे. सर्वाधिक डिलिव्हरी या बेंगळुर, दिल्ली आणि मुंबई येथील रहिवाशांना देण्यात आलेल्या आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की एक ऑर्डर तर सुमारे ५८६५ रुपये इतकी होती.
डॅट्सपर्सनल डॉट कॉम या सेक्सुअल वेलनेस उद्योगाचे विक्रेते चे मुख्य विपणन अधिकारी विनेश कुमार कुनिरमण म्हणाले की, भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची बातमी वाढल्यापासून विक्रीत वाढ होण्याचा धोका आहे. सरकारने वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्यापूर्वीच बर्याच कंपन्यांनी स्वतःच वर्क फ्रॉम होम करण्याचे ठरवलेले होते. यानंतर, खरेदीदारांनी दुकानांमध्ये जाण्याऐवजी ऑनलाइन उत्पादनांचा सर्च सुरू केला. नेटफ्लिक्स लस्ट स्टोरीज व्हायरल झाल्यानंतर, सेक्सुअल वेलनेस उद्योगाच्या विक्रीत अचानक वाढ झाली आहे.
महिलांसाठी ४० टक्के सेक्स टॉयज
महिलांसाठीच्या सेक्स टॉयजच्या ऑनलाइन सर्च मध्ये ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांनी सांगितले की massagers आणि masturbators ला जास्त मागणी मिळत आहे. वर्क फ्रॉम होमकरणार्या लोकांमध्ये सेक्स टॉयज १,५००० ते २,५०० रुपयांच्या किंमतीत विकल्या जात आहेत. या काळात ऑर्डरमध्येही ८ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. अरमानी म्हणाले की, ऑनलाईन साइट पुरुषांसाठी ६० टक्के सेक्स टॉयज व महिलांसाठी ४० टक्के सेक्स टॉयज विकते. Lovense Lush सेक्स टॉयज साइटवर २२,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
जगातील सर्वात लोकप्रिय सेक्स टॉय म्हणजे Lovense Lush
सोशल डिस्टंसिंगच्या या काळात, IMBesharamच्या लक्षात आले की ग्राहक रिमोट किंवा अॅपद्वारे चालवले जाणारे सेक्स टॉयज शोधत आहेत. या सेक्स टॉयजसाठी एकमेकांशी शारीरिक सान्निध्य आवश्यक नसल्याचे विनेशकुमार कुनिरामन म्हणाले. जगातील सर्वात लोकप्रिय सेक्स टॉयजचे नाव आहे Lovense Lush, ज्याला दुसऱ्या खोलीतून, दुसऱ्या शहरातून किंवा जगात कोठूनही ऍपचा वापर करून नियंत्रित केले जाऊ शकते.
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!#USPresident #Presumed #coronavirus #HelloMaharashtra https://t.co/mFiLmmCxPj
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.
आमच्या WhatsApp ग्रुपला Join व्हा
Facebook पेज Like करा