औरंगाबाद जिल्ह्यातील 1344 गावांपैकी ‘इतकी’ गावे शंभर टक्के लसवंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – देशात 100 कोटी लसीकरणाचा टप्पा देशाने पार केला असला तरी औरंगाबाद जिल्ह्यात 1344 गावांपैकी केवळ 56 गावांचे शंभर टक्के लसीकरण झाले आहे. उर्वरित गावांचे शंभर टक्के लसीकरण करून घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. यात औरंगाबाद, गंगापूर तालुक्यांतील सर्वाधिक गावांनी शंभर टक्के लसीकरण करून आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसताना जिल्ह्यातील काही गावांनी शंभर टक्के लसीकरण करून आदर्श निर्माण केला आहे. शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणारी सर्वाधिक गावे औरंगाबाद तालुक्यातील आहेत. येथील २४ गावांना शंभर टक्के लसीकरण पूर्ण केली आहेत तर पैठण आणि फुलंब्री तालुक्यांतील एकाही गावात शंभर टक्के लसीकरण झालेले नाही.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत 100 टक्के लसीकरण केले जाणार आहे. मात्र जिल्ह्यात सध्या संथगतीने लसीकरण सुरू आहे. प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करूनही उर्वरित नागरिक लस घेण्यास तयार नाहीत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण 32 लाख 24 हजार 677 नागरिकांना लस दिली जाणार असून त्यातील 19 लाख 39 हजार 706 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. अजूनही 12 लाख 84 हजार 971 नागरिकांचे लसीकरण होणे बाकी आहे. मात्र गावपातळीवर लसीकरणास फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.

गावोगावी, घरोघरी आशा वर्कर्स, आरोग्यसेवक यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लसीकरणाबाबत आवाहन केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्य उपक्रमांना जिल्ह्यातील 1344 गावांपैकी 56 गावांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. दरम्यान शुक्रवारपासून हर्सूल सावंगी येथील कायगाव येथे सलग ७५ तास लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.

Leave a Comment