जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; आज 292 रुग्णांची वाढ , एकूण बाधितांची संख्या 5304

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । आज दिवसभरात 292 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 5304 झाली आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 96 रूग्णांनी कोरोना वर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3079 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 1924 रूग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत 309 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे, जळगाव शहर 82, जळगाव ग्रामीण 20, भुसावळ 18, चाळीसगाव 17, अमळनेर 12, भडगाव 1, पाचोरा 1, धरणगाव 4, यावल 14, एरंडोल 17, जामनेर 33, रावेर 8, पारोळा 14,  मुक्‍ताईनगर 31, बोदवड 19 असे 292 रूग्ण आढळले.

जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्ण संख्येने आता जळगाव करांची चांगलीच चिंता वाढवली आहे. सततची वाढती संख्या बघता आता शहरवासी व जिल्ह्यातील पादुर्भाव झालेल्या ठिकाणी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्रात ७ जुलैच्या पहाटे 05 पासून ते १३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता ही क्षेत्रे बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या अगोदर जाहीर केले आहे.


Leave a Comment