हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना संकटाच्या काळात आपलं घरदार सोडून इतरत्र अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी देशांतर्गत रेल्वे आणि बससेवा तर देशाबाहेरील व्यक्तींसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत परदेशातून हजारो भारतीयांना परत स्वदेशी आणण्यात यश मिळालं आहे. माघारी आणलेल्या सर्वांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
दरम्यान भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजित सिंग संधू यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत राहणाऱ्या २५,००० भारतीय लोकांनी आपल्या मायदेशी परतण्यासाठी अर्ज केले आहेत. नागरिकांची व्यवस्थित माहिती घेऊन त्यांना देशातील विविध ठिकाणी पोहचवण्यात येणार असल्याचं संधू म्हणाले आहेत.
भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून अचानक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे आणि विमानसेवा बंद झाल्या. त्यामुळे देशाबाहेर आणि इतर राज्यात असणारे नागरिक हे आहे तिथंच अडकून पडले. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.