NRC च्या भीतीने आसाममध्ये 100 तर बंगालमध्ये 31 जणांचा मृत्यू; ममता बॅनर्जींचा धक्कादायक दावा

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : NRCच्या (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) भीतीमुळे आसाममध्ये 100 तर बंगालमध्ये 31 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक दावा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने यांनी केला आहे. नादिया जिल्ह्यात आयोजित केलेल्या एका सभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या नागरिकांवर गोळ्या चालवल्या जात आहेत, असंही त्या म्हणाल्या.

 

भाजपशी असहमत असलेल्या प्रत्येकाला दहशतवादी ठरवण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपकडून सध्या राबवला जात आहे, असा आरोपही ममता यांनी यावेळी केला. देशात आधीच सीएए आणि एनआरसीवरून आंदोलनांचा वणवा भडकलेला असतानाच ममता यांनी गंभीर आरोप केल्याने या आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here