Saturday, February 4, 2023

अखेर ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल !

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन मागवण्यात आला आहे. त्यासाठी विशेष ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमहुन महाराष्ट्रात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोंदियात दाखल झाली. या ऑक्सिजनच्या रेल्वेमध्ये ऑक्सिजनचे एकूण साठ कंटेनर आहेत. रेल्वेतून आणण्यात आलेला ऑक्सिजनचा पुरवठा हा नागपूर, नाशिक, मुंबई आदी ठिकाणी केला जाणार आहे.

राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस धावत आहे. ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची मदत घेण्यात आली आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडरचे टँकर या रेल्वेत ठेवण्यात आलेले आहेत. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

या ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने लिक्वीड ऑक्सिजनसाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला होता. या दोन्ही राज्यांनी रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजनच्या वाहतुकीबद्दल विचारणा केली होती. त्यानंतर सोमवारपासून (19 एप्रिल) महाराष्ट्रातून ऑक्सिजनचे खुले टँकर्स रेल्वेमार्गाने विजाग, जमशेदपूर, राऊरकेला, बोकारो येथे पाठविण्यात आले. त्यानंतर येथून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेमार्गाने करण्यात आलेला आहे.