पी चिदंबरम यांना पोलिसांकडून धक्काबुक्की, गंभीर दुखापत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष व ‘यंग इंडियन’ कंपनीचे प्रमुख समभागधारक राहुल गांधी यांची सोमवारी ईडीच्यावतीने तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. त्यापूर्वी, काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी काँग्रेसच्या बढया नेत्यांमध्ये पी चिदंबरम यांचाही समावेश होता. यावेळी दिल्ली पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत पी चिदंबरम यांना गंभीर दुखापत झाली असून हाड मोडली आहेत.

काँग्रेस नेत्याच्यावतीने राहुल गांधी यांच्या ईडीच्या चौकशीच्या निषेधार्थ दिल्लीत काल आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांसोबत काँग्रेस नेत्यांची झटापटी झाली. यामध्ये पी चिदंबरम जखमी झाले. तसेच चिदंबरम यांचा चश्माही जमिनीवर फेकण्यात आला होता.

दरम्यान पी चिदंबरम यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून जखमी झाल्याच्या माहिती दिली त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, “जेव्हा तीन पोलीस कर्मचारी तुमच्या अंगावर धावून येतात तेव्हा फक्त हेअरलाइन फ्रॅक्चर होत असेल तर सुदैव आहे. डॉक्टरांनी जर हेअरलाइन क्रॅक असेल तर १० दिवसात तो बरा होईल असे सांगितले आहे. मी ठीक आहे आणि उद्यापासून कामावर जाणार आहे,” असे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे.

Leave a Comment