Friday, December 26, 2025
Home Blog Page 2739

SBI च्या ‘या’ योजनेद्वारे एकदाच पैसे जमा करून दर महिन्याला करता येईल कमाई

post office

नवी दिल्ली । SBI ची अ‍ॅन्युइटी डिपॉझिट स्कीम ही बँकेच्या सर्वात महत्वाच्या डिपॉझिट स्कीमपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना एकाच वेळी सर्व पैसे जमा करावे लागतील. काही महिन्यांनंतर बँक दरमहा हप्त्याच्या स्वरूपात ग्राहकांना पैसे देते. बँक हा हप्ता मुद्दलाचा व्याजदर म्हणून मोजते. या योजनेत ग्राहकांना मिळणारे व्याज तीन महिन्यांच्या चक्रवाढ दरावर मोजले जाते.

या अ‍ॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणुकीचा कालावधी बदलतो. तुम्ही या योजनेत 36 महिने, 60 महिने, 84 महिने आणि 120 महिन्यांसाठी गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे या योजनेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकता. या योजनेत किमान 1,000 रुपये गुंतवणे आवश्यक आहे.

18 वर्षांखालील लोकंही गुंतवणूक करू शकतात
या योजनेसाठी खाते उघडल्यानंतर, ग्राहकाला युनिव्हर्सल पासबुक मिळते. 18 वर्षांखालील लोकंही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत, सिंगल अकाउंट किंवा जॉईंट अकाउंट उघडता येते. यामध्ये, गुंतवणुकीवरील व्याज दर निवडलेल्या कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटप्रमाणेच असेल.

अशा प्रकारे गणित समजून घ्या
समजा, जर तुम्ही पाच वर्षांसाठी फंड जमा केला, तर तुम्हाला पाच वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर लागू असलेल्या व्याजदरावर व्याज मिळेल. भारतातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. जर एखाद्या गुंतवणूकदाराला दरमहा 10000 रुपये मासिक उत्पन्न हवे असेल तर त्यासाठी गुंतवणूकदाराला 5 लाख 7 हजार 965 रुपये आणि 93 पैसे जमा करावे लागतील. तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर 7 टक्के व्याज दराने रिटर्न मिळेल, ज्यामुळे गुंतवणूकदार दरमहा सुमारे 10 हजार रुपये कमावतील.

गुंतवणूकीचे नियम
SBI च्या अ‍ॅन्युइटी स्कीममध्ये दरमहा किमान 1000 रुपये जमा करण्याचा नियम आहे, मात्र जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. अ‍ॅन्युइटी पेमेंटमध्ये, ग्राहकाने जमा केलेल्या रकमेवर व्याज आकारून विहित वेळेनंतर उत्पन्न सुरू होते. या योजना भविष्यासाठी खूप छान आहेत, मात्र मध्यमवर्गीयांना इतके पैसे एकत्र जमवणे शक्य नाही.

अ‍ॅन्युइटी स्कीमचे खास फीचर्स
तुम्ही SBI च्या सर्व शाखांमधून अ‍ॅन्युइटी स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता.
SBI कर्मचारी आणि माजी कर्मचाऱ्यांना एक टक्का जास्त व्याज मिळेल.
ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के जास्त व्याज मिळेल.
या योजनेवर फिक्स्ड डिपॉझिट व्याज दर देखील लागू होतील.
डिपॉझिट नंतरच्या महिन्यापासून पेमेन्टच्या तारखेला अ‍ॅन्युइटी दिली जाईल.
TDS कापल्यानंतर बचत खात्यात किंवा चालू खात्यात अ‍ॅन्युइटी भरली जाईल.
एकरकमी रकमेवर चांगला रिटर्न मिळविण्यासाठी एक चांगली योजना आहे.
विशेष परिस्थितीत अ‍ॅन्युइटीच्या शिल्लक रकमेच्या 75% पर्यंत ओव्हरड्राफ्ट/कर्ज मिळू शकते.
अ‍ॅन्युइटी स्कीममध्ये बचत खाते चांगले रिटर्न देते.

“राजकीय बदल्याची भावनेतून कारवाई”; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मलिक यांच्यावरील कारवाई हि राजकीय बदला घेण्याच्या भावनेतून करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज नवाब मलिक यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची महत्त्वाची बैठक होईल. नवाब मलिक यांच्या बद्दल अधिक माहिती कोर्टात मिळेल.

वास्तविक पाहता मलिक यांच्यावर जी कारवाई करण्यात आली आहे. ती कारवाई राजकीय बदल्याची भावना यातून दिसून येत आहे. ही कायदेशीर लढाई सुरु आहे, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

नवाब मलिकांना अटक; शरद पवारांनी बोलवली महत्वाची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हालचाली वाढवण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांकडून मलिक यांच्या बाजूने असल्याचे सांगण्यात आले आहेत. दरम्यान थोड्याच वेळात मलिक यांच्या अटक प्रकरणी त्यांना कोर्टात अजर करण्यात आले असून युक्तिवादाला सुरुवात होणार आहे.

ईडीच्यावतीने नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर याने नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर आता ईडीने अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं दोघांमध्ये चर्चा झाली. आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मुलीचे कन्यादान करुन पित्याने संपविले जीवन

Suicide

औरंगाबाद – मुलीच्या विवाहानंतर दोनच दिवसांत पित्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. वाळूज परिसरातील साजापूर येथील ही घटना काल उघडकीस आली.

साजापूर येथील समीर चांद शहा (40) यांच्या मुलीचा शुक्रवारी साजापूर येथे विवाह झाला होता. त्यानंतर ढोरकीन येथे मुलीच्या सासरी रविवारी स्वागत समारंभ असल्याने समीर हे परिवारासह ढोरकीन येथे गेले होते. तेथून परतल्यानंतर समीर हे संपर्कात नव्हते. दरम्यान, काल समीर यांचा मृतदेह साजापूर येथील तलावात तरंगत असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यातील एकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करून समीर यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी समीर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला. मात्र, समीर यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मलिकांना अटक करण्यात आलीय आता नंबर अनिल परब यांचा; किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. आता तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे,”असे किरीट सोमय्या यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील सरकारमधील माजी मंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दुसरा व तिसरा नंबर राष्ट्रवादीच्या व शिवसेनेच्या नेत्याचा लागणार असल्याचे म्हंटले होते. आता मलिक यांना आज प्रत्यक्ष अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी कितीही दादागिरी केली तरी आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार आहोत, असे किरीट सोमय्या यांनी म्हंटले आहे.

AED 2022 मध्ये मुकेश अंबानी म्हणाले -“2030 पर्यंत आशिया जगाच्या अर्थव्यवस्थेत 60 टक्के योगदान देईल”

नवी दिल्ली । पुण्यात सुरू असलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2022 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल अतिशय सकारात्मक विधान केले. ते म्हणाले की,”2020 मध्ये भारताने उर्वरित जगाच्या आर्थिक विकासाचा दर ओलांडला आहे.”

पीआयसीचे अध्यक्ष रघुनाथ माशेकर यांच्याशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले की,”भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग जगात सर्वात वेगवान आहे. आपल्याकडे जगातील सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ आहे. जगातील 60 टक्के लोकसंख्या आशियामध्ये राहते. यासह 2030 पर्यंत जगाच्या अर्थव्यवस्थेतील आशियाचे योगदान 60 टक्क्यांवर पोहोचेल. त्याचबरोबर पुढील दशकात भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.”

आशियाचा दबदबा वाढतो आहे
मुकेश अंबानी म्हणाले की,”जागतिक अर्थव्यवस्थेत आशिया आणि विशेषतः भारताचा वाटा वाढत आहे. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत आशिया हे आकर्षणाचे केंद्र आहे आणि त्याचे वर्चस्व सातत्याने वाढत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीने प्रभावित होऊनही आशियाई देशांचा जीडीपी संपूर्ण जगात सर्वाधिक राहिला आहे. आज डेमोग्राफी आणि डेव्हलपमेंटमध्ये चांगला ताळमेळ आहे.”

ही परिषद तीन दिवस चालणार आहे
पुणे इंटरनॅशनल सेंटर पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित एशिया इकॉनॉमिक डायलॉग 23 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2022 या कालावधीत चालणार आहे. या वेळी परिषदेची थीम पोस्ट-पँडेमिक वर्ल्ड इन रेझिलिएंट ग्लोबल ग्रोथ अशी ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गज साथीच्या आजारातून सावरलेल्या जगासमोरील आव्हानांवर चर्चा करत आहेत.

यावेळी आशिया इकॉनॉमिक डायलॉग (AED 2022) मधील मुख्य चर्चा जागतिक व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातील कोविड-19 च्या प्रभावावर असेल. यासोबतच कोविड-19 च्या आशियावरील प्रभावाला सामोरे जाण्याच्या मार्गांवरही चर्चा केली जाईल. औद्योगिक क्षेत्रातील बड्या चेहऱ्यांसह अनेक मोठे जागतिक नेतेही या परिषदेत सहभागी होत आहेत.

Stock Market : सेन्सेक्स 68.62 अंकांनी तर निफ्टी 28.95 अंकांनी घसरला

Stock Market

नवी दिल्ली । आज बुधवारीही बाजारात अस्थिरता होती. सकाळी मजबूतीसह खुला झालेला बाजार सायंकाळी घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स 68.62 अंकांच्या घसरणीसह 57232.06 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 28.95 अंकांनी घसरून 17063.25 वर बंद झाला. दुपारी 17,200 च्या पातळीला स्पर्श केल्यानंतर निफ्टी खाली घसरला. मग ही घसरण थेट रेड मार्कवर जाऊन बंद झाली.

निफ्टी सलग सहाव्या दिवशी घसरणीवर बंद झाला आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये ऑटो, कॅपिटल गुड्स शेअर्स टॉप लूझर ठरले आहेत. तर दुसरीकडे, मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्स काठावर बंद होण्यात यशस्वी झाले. बाजाराची सुरुवात आज वाढीने झाली. 09:16 वाजता सेन्सेक्स 332.26 अंकांच्या किंवा 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 57,632.94 वर ट्रेड करत होता. दुसरीकडे, निफ्टी 100.35 अंकांच्या किंवा 0.59 टक्क्यांच्या वाढीसह 17192.55 च्या पातळीवर दिसला.

जागतिक कारणांमुळे प्रचंड अस्थिरता
मार्केट एक्पसपर्टच्या मते, रशिया आणि युक्रेनमधील संकटामुळे बाजारातील अस्थिरतेचा अंदाज बांधणे कठीण आहे. उद्या निफ्टीची स्थिती कशी असेल हे युक्रेनच्या संकटाच्या नव्या डेव्हलपमेंटवर अवलंबून आहे. सध्या नवीन अपडेटनुसार रशियाने राजनैतिक चर्चेसाठी सहमती दर्शवली आहे, अशा बातम्या बाजारात येत आहेत. चर्चेचे सकारात्मक परिणाम दिसून आले तर भारतीय बाजारात तेजी पाहायला मिळू शकते.

मात्र सध्या युक्रेनच्या संकटावर सकाळी काही अपडेट आहे आणि संध्याकाळी आणखी काही अपडेट येते त्यामुळे आजची स्थिती जागतिक संकटामुळे घेतली आहे आणि ट्रेंडमुळे उद्या या स्थितीचे काय होईल हे सांगणे कठीण आहे.

परवानगीशिवाय प्रीपेड वॉलेट्स चालवणाऱ्या कंपन्यांबाबत RBI ने जारी केली चेतावणी

RBI

नवी दिल्ली | RBI ने परवानगीशिवाय प्रीपेड वॉलेट्स चालवणाऱ्या कंपन्यांबाबत चेतावणी जारी केली आहे. सेंट्रल बँकेने सांगितले की गुरुग्राम-रजिस्टर्ड ‘sRide Tech Private Limited’ त्याच्या कार पूलिंग अ‍ॅप ASRide द्वारे प्रीपेड पेमेंट वॉलेट म्हणून काम करत आहे, जरी त्याच्याकडे त्यासाठी आवश्यक मान्यता नसल्या तरीही.

सेंट्रल बँकेने सर्वसामान्यांना अनधिकृत संस्थांच्या प्रीपेड वॉलेट्सबाबत सतर्क केले आहे. Asride Tech Private Limited हे कार पूलिंग अ‍ॅप Asride द्वारे प्रीपेड वॉलेट चालवत आहे. यासाठी, पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीम कायदा-2007 अंतर्गत आरबीआयकडून आवश्यक मान्यता नाही.

तुम्ही तुमच्या जबाबदारीवर असाल, काळजी घ्या
RBI ने म्हटले आहे की, जर कोणी या कंपनीसोबत कोणतेही ट्रान्सझॅक्शन केले तर तो स्वतःचा धोका असेल. त्यामुळे अशा कोणत्याही अनधिकृत कंपनीसोबत पैशांचा ट्रान्सझॅक्शन करण्यापूर्वी लोकांना असे अ‍ॅप वापरताना अत्यंत काळजी घेण्याची विनंती केली जाते.

RBI च्या वेबसाइटवर लिस्ट तपासा
RBI ने सांगितले की, अधिकृत पेमेंट सिस्टीम प्रोव्हायडर किंवा अधिकृत पेमेंट सिस्टीम ऑपरेटरची लिस्ट RBI च्या वेबसाइटवर आहे. तुम्ही वापरत असलेले अ‍ॅप किंवा ती अ‍ॅक्टिव्हिटी करण्यासाठी अधिकृत आहे याची खात्री करा.

फसवणूकीपासून कसे वाचावे ?
मोबाईल वॉलेटची लोकप्रियता झपाट्याने वाढत असताना फसवणुकीच्या घटनाही समोर येत आहेत. QR/UPI कोड फ्रॉड, अकाउंट स्किमिंग आणि क्रिप्टो संबंधित फसवणूक फिशिंगसह सामान्य झाली आहे.
ScreenShare, AnyDesk, Teamviewer इत्यादी थर्ड पार्टी अ‍ॅप्स एकाच डिव्हाइसवर डाउनलोड आणि इन्स्टॉल करू नका. स्मार्टफोनच्या सिक्योरिटी फीचर्समध्ये सुधारणा करून अपडेट रहा.
SMS किंवा मेलद्वारे पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करू नका किंवा तुमच्या खात्याशी संबंधित उत्तर देऊ नका.
पेमेंट करताना, तुम्ही तुमचे खाते OTP किंवा बायोमेट्रिक प्रोटेक्टेड केले पाहिजे.
ही सुविधा रजिस्टर अ‍ॅप विभागात उपलब्ध आहे. कृपया पेमेंट करताना प्रत्येक वेळी हे तपासा.

ईडीच्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी दिली ‘हि’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीच्यावतीने चौकशीसाठी नेण्यात आले. दरम्यान आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आल्यानंतर मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे,” असे मलिक यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर आज पहाटे ईडीने कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर त्याची चौकशी सुरु असताना त्यांनी ट्विट करीत “झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे”,अशी प्रतिक्रिया दिली होती. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना दुपारी अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आले.

ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी पहिल्यांदा माध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना संवाद साधता आला नाही. अखेर त्यांनी दोनच शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

दररोज फक्त 14 रुपये वाचवून मिळवू शकाल दरमहा 10,000 रुपये, ‘या’ सरकारी योजने विषयी जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । जर तुम्ही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (APY) पैसे गुंतवू शकता. अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ज्यांच्याकडे बँक आहे किंवा खाते आहे, तो गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन घेऊ शकतो. पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेत ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते.

अटल पेन्शन योजना काय आहे?
अटल पेन्शन योजनेत तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेंतर्गत किमान मासिक 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि कमाल 5000 रुपये पेन्शन मिळू शकते. जर तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी रजिस्ट्रेशन करायचे असेल, तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

‘हे’ फायदे मिळवा
तुम्ही जितक्या लवकर अटल पेन्शन योजनेत सामील व्हाल तितके जास्त फायदे तुम्हाला मिळतील. जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत सामील झाली तर त्याला वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 5000 रुपये मासिक पेन्शनसाठी 210 रुपये प्रति महिना जमा करावे लागतील.

अशा प्रकारे तुम्हाला दरमहा 10,000 रुपये मिळतील
जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झाली तर वयाच्या 60 व्या वर्षी त्याला दरमहा 5,000 रुपये मासिक पेन्शनसाठी फक्त 210 रुपये प्रति महिना जमा करावे लागतील. त्याच वेळी, 39 वर्षांपेक्षा कमी वयाचे पती-पत्नी स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात, ज्यातून 60 वर्षांचे झाल्यानंतर, दोघांना एकत्र करून त्यांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळेल.

कॅलक्युलेशन समजून घ्या
या योजनेत दरमहा 1000 रुपये मासिक पेन्शनसाठी दरमहा केवळ 42 रुपये जमा करावे लागतील. दुसरीकडे 2000 रुपयांच्या पेन्शनसाठी 84 रुपये, 3000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी 168 रुपये दरमहा जमा करावे लागतील.

टॅक्स बेनिफिट
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा टॅक्स बेनिफिट मिळतो. यातून ग्राहकांचे करपात्र उत्पन्न वजा केले जाते. याशिवाय, विशेष प्रकरणांमध्ये 50,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त टॅक्स बेनिफिट उपलब्ध आहे. अशा प्रकारे, या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतची डिडिक्शन उपलब्ध आहे.