Friday, December 26, 2025
Home Blog Page 2740

नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर आज सकाळी ईडीच्यावतीने चौकशीसाठी बोलवण्यात आले. दरम्यान आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आज पहाटे ईडीच्यावतीने चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान त्यांची ईडीने चौकशी केल्यानंतर अटक केली. दुपारी तीन वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयातून बाहेर आणण्यात आले.

मलिक यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर हात वर करून झुकेनगा नही अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान त्यांना ईडीच्यावतीने वैदयकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.

“मलिकांना अटक करण्याचे ठरवलेच असेल तर नाईलाज”; जयंत पाटील पाटील यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर आज सकाळी ईडीच्यावतीने चौकशीसाठी बोलवण्यात आले. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणानाच्या दुरुपयोग सुरु आहे. नवाब मलिक यांना अटक करण्याचे ठरवलेच असेल तर नाईलाज आहे, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

मंत्री ज्यात पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी काही लोकांची चरचाही झाली असणार आहे. उगाच कारवाई करण्यात आलेली नाही. आमचे मंत्री तुरुंगात गेले कि सरकार पडेल, असे मला वाटत नाही. मला खात्री आहे कि चौकशीनंतर ईडी मलिक यांना नक्की घरी सोडेन. जर मलिक यांच्याकडून प्रश्नाची जी उत्तरे दिल्यानंतर त्यांना अटक करण्याचे ठरवले असेल तर आमचा नाईलाज आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली आहे. “ईडीच्या नोटिसीला महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घाबरू नये. राज्य सरकावरही टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, सध्या जेलमध्ये असलेले अनिल देशमुख यांनी नुकतेच एक विधान केले आहे की, “मला तोंड उघडायला लावू नका. मी जर तोंड उघडले तर…,” असे देशमुख यांनी म्हंटले असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम हवाई प्रवासावर दिसून आला, जाणून घ्या जानेवारीत किती प्रवासी कमी झाले?

नवी दिल्ली । कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव देशात सौम्य असला तरी त्याचा परिणाम विमान वाहतूक क्षेत्रात नक्कीच दिसून आला आहे. यामुळेच जानेवारी 2021 च्या तुलनेत जानेवारी 2022 मध्ये लोकांनी हवाई प्रवास कमी केला आहे. तज्ज्ञांच्या मते, जानेवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचली होती, त्यामुळे लोकांनी काही काळ प्रवास थांबवला असावा. DGCA च्या रिपोर्ट नुसार जवळपास 17 टक्के प्रवाशांनी हवाई प्रवास कमी केला आहे.

डायरेक्‍टरेट जनरल ऑफ स‍िविल एविएशनच्या रिपोर्ट नुसार, गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत यंदाच्या जानेवारीत हवाई प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये 77.34 लाख प्रवाशांनी विमानाने प्रवास केला होता, तर यावर्षी जानेवारी महिन्यात 64.04 लाख प्रवाशांनी विमानाने प्रवास केला आहे. रिपोर्ट नुसार -17.14 टक्के वाढ झाली आहे. याआधीही प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. हे पाहता येत्या दोन महिन्यांत विमान वाहतूक क्षेत्रात कोरोनाच्या आधी प्रवाशांची संख्या पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

त्याचवेळी, जानेवारी महिन्यात प्रवाशांची संख्या कमी होण्याचे कारण कोरोनाची तिसरी लाट असल्याचे मानले जात आहे. एअरपोर्ट अथॉरिटीचे माजी अध्यक्ष आणि एविएशन एक्‍सपर्ट व्हीपी अग्रवाल यांनी सांगितले की,”जानेवारीमध्ये देशभरात कोरोनाची प्रकरणे अचानक वाढली होती. त्यामुळे लोकांनी कमी हवाई प्रवास केला असता. जानेवारी 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये कमी प्रवासी निघण्याचे हे कारण असू शकते.”

DGCA च्या रिपोर्ट नुसार, स्पाइसजेटवर या वर्षी जानेवारीमध्ये सर्वाधिक 73 टक्के प्रवासी लोड होता, गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये 83 टक्के होता, तर इंडिगोवर 66 टक्के प्रवासी लोड होता, गेल्या वर्षीच्या 80 टक्के होता. रिपोर्ट नुसार, जानेवारीमध्ये रद्द झालेल्या एकूण फ्लाईट्स पैकी 46 टक्के फ्लाईट्स हवामानामुळे रद्द करण्यात आली आहेत. तक्रारींच्या बाबतीत एअर इंडिया पहिल्या क्रमांकावर होती, तर अलायन्स एअर दुसऱ्या क्रमांकावर होती.

महाविद्यालयात असताना काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल : युवकावर गुन्हा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कराड येथील एका युवकाने सातारा शहर परिसरात राहणाऱ्या युवतीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून बदनामी केल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. नांदलापूर (ता. कराड) येथील आकाश दिलीप शिर्के असे गुन्हा दाखल केलेल्या संशयित युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एक युवती एका महाविद्यालयात शिकत असताना तिची ओळख आकाश शिर्के याच्‍याशी झाली. यानंतर त्‍या युवतीसह तिच्‍या इतर मैत्रिणींनी शिर्के याच्‍याकडून फोटोसेशन केले होते. यानंतर काही कारणास्‍तव शिर्के व त्‍या युवतीच्‍यात दुरावा निर्माण झाला.

यामुळे आकाश शिर्केने युवतीस धमकावत फोटो व्‍हायरल करण्‍याची धमकी दिली. याच काळात त्‍याने युवतीचे फोटो तिच्‍या नातेवाइकांना मोबाईलवर पाठवले. यानंतरही युवतीने कोणताही प्रतिसाद न दिल्‍याने आकाशने इन्‍स्‍टाग्रामवर बनावट अकाउंट ओपन करत त्‍यावरून युवतीचे फोटो व्‍हायरल करत ते तिच्‍या नातेवाइकांना पाठवले. हा प्रकार लक्षात आल्‍यानंतर याची तक्रार आज युवतीने शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात नोंदवली. यानुसार शिर्केवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

“वेळ आली कि माकडीण पिल्लालाही पायाखाली घेते हि यांची संस्कृती”; चंद्रकांतदादांची पवारांवर नाव न घेता टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवाब मलिक यांच्या कारवाई प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “गेल्या 50 वर्षापासून शरद पवारांकडून राजकारण केले जात आहे. त्यांचे हे राजकारण सर्वांना माहीत आहे. समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न पवारांकडून केला जात आहे. “वेळ आली कि माकडीण पिल्लालाही पायाखाली घेते हि तर याची संस्कृती आहे,” अशी टीका पाटील यांनी पवार यांच्यावर नाव न घेता केली.

चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, “ईडीच्या नोटिसीला महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घाबरू नये. राज्य सरकावरही टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, सध्या जेलमध्ये असलेले अनिल देशमुख यांनी नुकतेच एक विधान केले आहे की, “मला तोंड उघडायला लावू नका. मी जर तोंड उघडले तर…,” असे देशमुख यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा त्यांना भेटायलाही कोणी गेले नाही. एक कथा आहे कि माकडीण आपल्या पिल्लाना कवटाळून घेत असते. मात्र, जेव्हा एखादे सक्त येते आंही पाण्यात गेल्यावर आपण आता मरू असे वाटते तेव्हा ती माकडीण त्याच पिल्लाना पायाखाली घेते, अशीच याची संस्कृती आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

“नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी”; दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. यावरून भाजप नेत्यांकडून मलिक यांच्यावर टीका केली जात असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करीत भाजपवर निशाणा साधला आहे. तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले आहे.

मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, राजकीय सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाचे आणखी उदाहरण आज मंत्रिमंडळातील आमचे सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावरील ईडी कारवाईतून दिसून आले.

केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून शासकीय यंत्रणांना राजकीय आयुध म्हणून वापरल्याने लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे वसळे पाटील यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

बाजारातील अस्थिरतेमुळे सरकार घाबरणार नाही, सीतारामन यांनी LIC IPO बाबत केले मोठे विधान

Nirmala Sitharaman

नवी दिल्ली । शेअर बाजारातील सततची अस्थिरता आणि रशिया-युक्रेन तणावादरम्यान, सरकारी Life Insurance Corp. of India (LIC) IPO आणण्यासाठी वचनबद्ध आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की,”सरकार आपल्या योजनेत कोणताही बदल करणार नाही आणि वेळेवर IPO लाँच केला जाईल.”

सीतारामन म्हणाल्या,”LIC च्या IPO बद्दल बाजारात उत्साह आहे आणि आम्ही पुढे जात आहोत. जागतिक परिस्थितीचा बाजारावर होणार्‍या परिणामाबाबत आम्ही तितकेच चिंतित आहोत. मात्र, सध्याची अस्थिरता पाहता IPO ची तारीख पुढे ढकलता येईल का, या प्रश्नावर? अर्थमंत्री म्हणाल्या,” गुंतवणूकदार याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्याचा लाभ घेण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.”

NSE घोटाळ्यावर बोलण्यास नकार
NSE चे माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अर्थमंत्र्यांसमवेत पत्रकार परिषदेत झालेल्या वादांबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की,” त्याची चौकशी बाजार नियामक सेबीकडे आहे आणि त्यांच्याकडे संपूर्ण तपशील नसताना ते करू शकत नाहीत.”

राज्यांच्या GST भरपाईचा मुद्दा उपस्थित केला
GST वसूलीतील कमतरता भरून काढण्यासाठी राज्यांकडून अधिक पैशांच्या मागणीवर, सीतारामन म्हणाल्या की या दोघांमध्ये कोणताही फरक नाही. अशा मुद्द्यांबाबत केवळ GST परिषद अंतिम निर्णय घेते आणि 2020 मध्ये झालेल्या घसरणीची भरपाई करण्यासाठी राज्यांना स्वतंत्र कर्ज देण्यात आले. यासोबतच सेसच्या स्वरूपात वसुलीचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे.

मुलीच्या अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी कामगाराने उभ्या ऊसाला लावली आग 

fire
fire

औरंगाबाद – ऊसतोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला पकडण्यासाठी चक्क उभ्या ऊसाच्या फडालाच आग लावण्यात आली. औरंगाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऊस तोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करणारा आरोपी ऊसाच्या फडात लपला होता. त्यानंतर चक्क उभा ऊसाचा फड पेटवून देण्यात आला. अखेर आरोपीला अलगद जाळ्यात पकडण्यात आले. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिवपूर गावात घडली आहे. बाबासाहेब दुबिले असं या धाडसी शेतकऱ्याचे नाव आहे. तर विष्णू उत्तम गायकवाड असं लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

ऊसतोड कामगाराच्या मुलीचं अपहरण करणारा आरोपी ऊसाच्या फडात लपला. त्यामुळे अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी चक्क उभ्या ऊसाच्या फडाला आग लावून त्याला जाळ्यात पकडण्यात आले. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिवपूर गावात घडली आहे. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास आरोपीने ऊसतोड कामगारांच्या गाडीत झोपलेल्या मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, पण मुलांच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे ऊसतोड कामगार गाडीकडे धावले.

त्यावेळी अपहरण करणाऱ्या आरोपीने धूम ठोकली आणि तो ऊसाच्या फडात धाव पळाला. तेव्हा ऊस मालकाने अख्ख्या ऊसाच्या फडला आग लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अपहरण करणारा आरोपी अलगद जाळ्यात सापडला. त्यानंतर ऊसतोड कामगारांनी आरोपीचे हातपाय बांधून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

“ईडीच्या चौकशीवेळी नवाब मलिकांनी केले ‘हे’ सूचक ट्विट, म्हणाले….”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. यावरून ईडीच्यावतीने तब्बल पाच तास उलटले तरी चौकशी केली जात आहे. या दरम्यान मलिक यांनी एक सूचक ट्विट केले आहे. ‘ना डरेंगे, ना झुकेंगे, Be ready for 2024 !,” असे नवाब मलिक यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मलिक यांनी यापूर्वी भाजपमधील नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांना आवाज पहाटे ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी मलिक यांनी ईडीच्या चौकशीवरून पुन्हा ट्विट करीत केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कितीही कारवाई करा आम्ही ना डरेंगे, ना झुकेंगे,” असे म्हंटले आहार. तसेच आगामी २०२४ च्या निवडणुकी साठी आम्ही तयार आहोत, असे एकप्रकारे मलिक यांनी या ट्विटमधून म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असलेले नवाब मलिक यांच्याकडून गेल्या अनेक दिवसांपासून ईडी तसेच भाजप, केंद्र सरकावर गंभीर टीका केली जात आहार. अनेक माःय्मातून ईडीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. दरम्यान त्यांची आज ईडीच्यावतीने पाच तास उलटले तरी चौकशी केली जात आहे.

NSE Scam : सेबीच्या आदेशापूर्वीच विदेशी गुंतवणूकदारांनी केली ‘ही’ युक्ती

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मधील को-लोकेशन प्रकरणात फसवणूक झाल्याचा मोठा खुलासा झाला आहे. NSE वेबसाइटनुसार, फेब्रुवारीमध्ये, NSE च्या माजी MD आणि CEO चित्रा रामकृष्णा विरुद्ध मार्केट रेग्युलेटर SEBI च्या कारवाईपूर्वी, एक्सचेंजमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सेबीच्या आदेशापूर्वी विदेशी गुंतवणूकदारांनी आपले शेअर्स मोठ्या प्रमाणात देशांतर्गत गुंतवणूकदारांना विकले. या कालावधीत झालेल्या 209 ट्रान्सझॅक्शनपैकी सुमारे 35 टक्के ट्रान्सझॅक्शन विदेशी गुंतवणूकदारांचे होते, ज्यामध्ये देशांतर्गत गुंतवणूकदारांना शेअर्स विकले गेले. या कालावधीत एकूण 11.61 लाख शेअर्स परदेशी गुंतवणूकदारांना विकले गेले. त्यांची किंमत 1,650 ते 2,800 रुपयांपर्यंत होती.

जानेवारीमध्ये शेअर्सचे भाव सर्वाधिक होते
NSE शेअर्सची किंमत जानेवारीमध्ये सर्वाधिक 3,650 रुपये होती, मात्र अनलिस्टेड असल्याने, त्यांच्या स्टॉकमध्ये फारशी हालचाल झाली नाही. यावरून हे सूचित होते की, जानेवारीमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री काही गडबडीचे लक्षण आहे, कारण डिसेंबरमध्ये जवळपास 50 टक्के ट्रान्सझॅक्शन हे 2,000 रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर झाले होते. यापैकी काही प्रति शेअर 2,800 रुपये इतके होते.

2021 मध्ये असे दृश्य दिसले नव्हते
तज्ञांचे म्हणणे आहे की, यापूर्वी सप्टेंबरमध्ये NSE शेअर्सची इतकी मोठी विक्री दिसून आली होती, मात्र ती देशांतर्गत गुंतवणूकदारांमध्ये होती. हे वगळता, 2021 मध्ये कोणत्याही महिन्यात 100 पेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शन झाले नाहीत. अशा स्थितीत जानेवारीतील या मोठ्या विक्रीतून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अनेक मोठे गुंतवणूकदार पूर्णपणे बाहेर
NSE देखील बाजारात स्वतःला लिस्ट करण्याच्या शर्यतीत आहे, मात्र त्यांनी आपली योजना तात्पुरती पुढे ढकलली आहे. दरम्यान, Citigroup, Goldman Sachs आणि Norwest Venture Partners सारखे प्रमुख विदेशी गुंतवणूकदार 2021-22 आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच NSE मधून पूर्णपणे बाहेर पडले आहेत. सैफ कॅपिटल सारख्या काही मोठ्या गुंतवणूकदारांनीही आपले स्टेक कमी केले आहेत.

IPO ला होणारा उशीर ‘हे’ सर्वात मोठे कारण आहे
NSE च्या शेअर्समधील विदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा कमी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एक्सचेंजच्या IPO ला होणारा उशीर. मात्र, बहुतेक बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जानेवारीतील प्रचंड विक्री या कारणाकडे सूचित करत आहे. काही दिग्गजांचे असेही म्हणणे आहे की, या विक्रीचा संबंध को-लोकेशन वादाशी असू शकतो ज्यामुळे 2015 पासून NSE सतत त्रस्त आहे.

Institutional investors चा वाटा सातत्याने कमी होत आहे
Institutional investors हे NSE वरील आपला हिस्सा सतत कमी करत आहेत, तर रिटेल इन्‍वेस्‍टर्सचा हिस्सा वाढत आहे. 2011-12 या आर्थिक वर्षात NSE वर Institutional investors चा वाटा 87 टक्के होता, जो आता 50 टक्क्यांवर आला आहे. NSE चे शेअर्स देखील जून 2020 मध्ये 1,000 रुपयांवरून दुप्पट झाले आहेत. तो 3,000 पर्यंत जाण्याचा विश्लेषकांचा अंदाज आहे.