Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2902

बहुचर्चित 30-30 घोटाळ्याचा मास्टरमाईंड पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद – मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या ‘तीस-तीस’ घोटाळ्यातून लोकांची फसवणूक करणाऱ्या संतोष उर्फ सचिन राठोडला पोलिसांनी अटक केली आहे. तीस-तीस योजनेत लोकांकडून गुंतवणूक करुन साठेअठरा लाखांची फसवणूक केल्याचा आरोप राठोडवर आहे.

दरम्यान या घोटाळ्याची व्याप्ती कोट्यवधी रुपयांत असण्याची शक्यता आहे. 30-30 योजनेत लोकांकडून गुंतवणूक केल्याची कबुली संतोष राठोडनं दिली होती. बिडकीन पोलिस ठाण्यास साडे अठरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोषवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या ‘तीस-तीस’ घोटाळ्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील शेकडो शेतकरी, अधिकारी, राजकीय नेत्यांनी या तीस-तीस योजनेत पैसे गुंतवणूक केली होती.

वर्षभरापासून या योजनेचा मास्टरमाईंड संतोष उर्फ सचिन राठोड पैसे परत देतो म्हणून टाळाटाळ करत होता. तर काही दिवस यो फरार सुद्धा झाला होता. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात कृष्णा राठोड, पंकज चव्हाण आणि संतोष राठोड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घोटाळ्याची व्याप्ती करोडो रुपयात असण्यात शक्यता आहे.

पुन्हा दर्शन : किरपेत ऊसात बिबट्या… बांधावर मजूर अन् वनविभाग झोपेत

कराड | कराड तालुक्यातील किरपे येथे दोन दिवसापूर्वी 5 वर्षाच्या मुलावर जीवघेणा हल्ला बिबट्याने केला होता. त्यानंतर या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. परिसरातील लोकांना व ऊसतोड मजूरांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. मात्र वनविभागाला बिबट्याचा मागमूस लागत नसल्याने मजूरांसह नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सुस्त वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कधी जागे होणार आणि बिबट्याचा बंदोबस्त करणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्यातून केला जात आहे.

गुरूवारी किरपेत मुलावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर शुक्रवारी दक्षिण तांबवे येथे बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर शनिवारी आज दि. 22 रोजी 1.30 वाजण्याच्या सुमारास किरपे येथे ज्या परिसरात मुलावर बिबट्याने हल्ला केला. त्याच परिसरातील सुतारकी येथे संतोष तिकवडे यांच्या शेतात ऊसतोड सुरू आहे. तेव्हा चक्क ऊसतोड मजूराच्या समोर ऊसात बिबट्या शिरला, त्यामुळे मजुरांनी ऊसतोड बंद केली आहे. तसेच ऊसात बिबट्या तर बाधांवर ऊसतोड आणि वनविभाग झोपेत अशी परिस्थिती दिसून येत आहे.

कराड तालुक्यातील तांबवे, किरपे, येणके परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून वनविभागाला सापळा लावून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे. तरीही सापळा लावण्याची परवानगी घेण्याच्या कारणापासून रडगाणे सुरू करणारे वनविभाग झोपेचे सोंग घेताना दिसून येत आहे. येणके येथे 5 वर्षाच्या मुलाचा बळी गेल्यानंतर किरपेत दोन दिवसापूर्वी 5 वर्षाच्या मुलावर हल्ला तरीही वनविभाग म्हणते आम्हांला बिबट्या दिसत नाही. या वनविभागाच्या कार्यशैलीमुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे.

राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत परभणी जिल्ह्यासाठी 240 कोटी निधी मंजूर !

परभणी प्रतिनिधी  |

कोविड-19 च्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग 21 जानेवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी 150 कोटी रुपयांची अतिरिक्त निधीची मागणी केली होती. त्यानुसार वित्त व नियोनज मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 240 कोटीच्या निधीस मंजुरी दिली आहे .

यावेळी बैठकीस पालकमंत्री नवाब मलिक ,जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई विटेकर, खासदार फौजिया खान, आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मिना, महापालिका आयुक्त देविदास पवार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रणालीद्वारे उपस्थिती होते.
यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली.

तसेच जिल्ह्यातील 275 पोखरा अंतर्गत गावे, निजामकालीन शाळांची देखभाल दुरुस्ती व नव्याने बांधणी, रुग्णालयांचे नूतनीकरण, कोव्हिड-19 विषयक सोयी सुविधा, पुतळा सुशोभीकरण, स्मशानभूमी आदीसाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी 150 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी जिल्ह्याकरिता 240 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली. सदर निधी हा जिल्ह्यातील विविध विकास कामांवर योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले आहेत .

ऑटो पार्ट्स स्वस्त होणार ! अर्थसंकल्पात GST कमी करण्याची उद्योगांची मागणी

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे बाजारपेठेतील घटती मागणी आणि बनावट बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑटो पार्ट्स इंडस्ट्रीने सर्व ऑटो पार्ट्सवरील GST कमी करण्याची मागणी केली आहे. ऑटो पार्ट्सवर 18 टक्के GST दराची मागणी. सध्या ऑटो पार्ट्सवर 28 टक्क्यांपर्यंत GST आकारला जातो.

ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ACMA), भारतीय ऑटो कंपोनंट उद्योगातील सर्वात मोठी संघटना, केंद्रीय अर्थसंकल्पासाठी सरकारला केलेल्या शिफारशींमध्ये, सर्व ऑटो पार्ट्सवर 18% एकसमान GST दराची मागणी करत आहे. रिसर्च अँड डेव्हल्पमेंटमधील गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने RoDTEP विचार करायला सांगितले आहे.

गतिशीलता आणण्यास मदत होईल
ACMA चे अध्यक्ष संजय कपूर म्हणाले की,”ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री आजवरच्या सर्वात आव्हानात्मक, तरीही मनोरंजक काळाचा साक्षीदार आहे. साथीच्या रोगाने आयटी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि गतिशीलता आणण्यास मदत केली आहे. ACC बॅटरी, PLI आणि FAME-II योजना ऑटो आणि ऑटो कंपोनंन्टसाठी PLI योजनेच्या विस्ताराबाबत सरकारने अलीकडील पॉलिसी घोषणा खरोखरच दीर्घकाळ प्रलंबित आहेत ज्यावर काम करणे आवश्यक आहे.”

ग्रे मार्केट संपवण्यासाठी मदत करा
कपूर म्हणाले की,”सर्व ऑटो पार्ट्सवर 18 टक्के एकसमान GST लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. इंडस्ट्रीमध्ये 28 टक्के GST दरासह लक्षणीय आफ्टरमार्केट ऑपरेशन्स होत आहेत, ज्यामुळे ऑटो पार्ट्समध्ये बनावट आणि ग्रे मार्केट वाढत आहे. GST चे दर कमी केल्यास हा ग्रे मार्केट दूर होण्यास मदत होईल.”

देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यावर भर द्यावा लागेल
याशिवाय, ACMA ने ऑटो कंपोनंन्ट इंडस्ट्रीसाठी नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याचे आणि अशा उत्पादनांची वाढती देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी क्षमता निर्माण करण्याचे आवाहन केले आहे, ज्यामध्ये सरकारचे पर्यावरण, ऊर्जा सुरक्षा आणि वाहन सुरक्षा यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश का नाही झाला? प्रियांका गांधींनी सांगितली इनसाईड स्टोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध राजनीतिकार प्रशांत किशोर हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या मात्र प्रशांत किशोर यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश होऊ शकला नाही याबाबत प्रियांका गांधी याना विचारले असता त्यांनी यामागील कारण सांगितलं

प्रियांका गांधी म्हणाल्या, “प्रशांत किशोर आणि काँग्रेसची भागीदारीसाठी चर्चा सुरू होती. मात्र, ही भागीदारी होऊ शकली नाही. यामागे अनेक कारणं होती. काही कारणं त्यांच्याकडून होती, तर काही कारणं आमच्याकडून होती. मी त्याच्या तपशीलात जाऊ इच्छित नाही. काही मुद्द्यांवर सहमत होणं शक्य नव्हतं त्यामुळे भागीदारीची ही चर्चा पुढे जाऊ शकली नाही.”

दरम्यान, काँग्रेस मध्ये प्रवेश नाही होऊ शकल्यानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती . देशातील प्रमुख विरोधी पक्ष होण्याचा दैवी अधिकार काँग्रेसला मिळालेला नाही असे म्हणत काँग्रेसने गेल्या १० वर्षात ९० टक्के निवडणूका हरलेल्या आहेत शी टीका त्यांनी केली

कराडला शुक्रवारी शेतकरी संघटनाचा वीज वितरणवर आक्रोश मोर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वीज वितरण विरोधात सर्व शेतकरी संघटना एकवटल्या असून शुक्रवार दि. 28 रोजी विविध मागण्यांसाठी वीज वितरणच्या कराड शहर कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेती पंपांना मोफत वीज द्या व थकीत बिलापोटी शेती पंपाची तोडलेली वीज तात्काळ जोडा, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेस बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष पंजाबराव पाटील, शेती मित्र अशोकराव थोरात, स्वाभिमीनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, शेतकरी नेते अनिल घराळ, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, रयत संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक लोहार, शेकापचे अॅड. समिर देसाई, उत्तम खवाले, सुनील कोळी, विश्वास जाधव, आनंदराव थोरात, रामचंद्र साळुंखे, मनोज हुवाले, अविनाश फुके, नजीर पटेल, कृष्णत जगताप, सागर कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पंजाबराव पाटील म्हणाले, वीज वितरणची शेतकऱ्यांबाबतची धोरणे अत्यंत अन्यायकारक व चुकीची आहेत. उद्योगांची लोखो रूपयांची वीज बिले थकीत असताना कारवाईचा बडगा मात्र शेतकऱ्यांवर उगारला जातो. उद्योगांना दिवसा वीज आणि शेतकऱ्यांना रात्री. शिवारात बिबटे, साप, विंचू यांचा धोका असताना शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करून शेतीला पाणी देण्यासाठी रात्री दोन वाजता शेतात जाणार हा शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे.

अशोकराव थोरात म्हणाले, चुकीच्या पध्दतीने शेतकऱ्यांकडून वीज आकारणी केली जात आहे. शेतकऱ्यांना कर्नाटक, तेलंगणा या प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोफत वीज दिली पाहिजे. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मकता दाखवली पाहिजे.

जर तुम्हालाही पीएम किसानचे पैसे मिळालेले नसतील तर आजच करा ‘हे’ काम

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत देशातील करोडो लोकांना पैसे मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी पीएम किसानचा 10 वा हप्ता 10.57 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे. सद्य:स्थितीत दोन कोटी शेतकऱ्यांचा डिसेंबर-मार्चचा हप्ता थकीत आहे. कारण 12.44 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबे PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रजिस्टर्ड आहेत.

तुम्हालाही पीएम किसानचे पैसे अजून मिळाले नसतील तर काही महत्त्वाचे काम त्वरित करून घ्या. यासाठी पीएम किसान टोल फ्री क्रमांक, हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. येथून तुम्हाला कळेल की तुमचा हप्ता का लटकला आहे.

हप्त्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की आधार, खाते नाव आणि बँक खाते क्रमांकातील चूक. असे झाल्यास येत्या ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ताही मिळणार नाही. तुम्ही पीएम किसानच्या वेबसाईटला ऑनलाइन भेट देऊन हे दुरुस्त करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही माहिती असण्याची गरज नाही.

तुम्हाला ‘या’ स्टेप्स फॉलो कराव्या लागतील…

> तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या http://pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
> येथे तुम्हाला वरच्या जागी एक लिंक फार्मर्स कॉर्नर दिसेल.
> तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यास आधार एडिटची लिंक दिसेल, जिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल.
> यानंतर तुमच्या समोर उघडणाऱ्या पेजवर तुम्ही तुमचा आधार क्रमांक दुरुस्त करू शकता.
> दुसरीकडे, जर खाते क्रमांक चुकीचा भरला असेल आणि तुम्हाला तुमच्या खाते क्रमांकामध्ये काही बदल करायचे असतील, तर तुम्हाला तुमच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी किंवा लेखपालशी संपर्क साधावा लागेल. तिथे जाऊन तुम्ही केलेली चूक सुधारू शकता.

त्यामुळे हप्ताही अडकू शकतो
अनेक राज्यात अपात्र शेतकरीही याचा लाभ घेत होते. अशा शेतकऱ्यांवर सरकारने मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी चुकीच्या मार्गाने पैसे घेतलेल्या आयकरदात्यां शेतकऱ्यांकडून सर्वाधिक पैसे वसूल केले आहेत. अशा अनेक शेतकऱ्यांची नावे दहाव्या हप्त्यातून काढून टाकण्यात आली आहेत.

स्टेट्स तपासण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा

> सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
> येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘Farmers Corner’ चा पर्याय मिळेल.
> येथे ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पेज उघडेल.
> नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक यामधील कोणताही एक पर्याय निवडा.
> या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
> तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा क्रमांक टाका. त्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.
> येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रान्सझॅक्शनची सर्व माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाला.

तरीही न मिळाल्यास मंत्रालयात अशाप्रकारे संपर्क साधा

पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011—23381092, 23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे:0120-6025109
ई-मेल आयडी: [email protected]

होम लोनच्या इन्शुरन्स प्रीमियमवरील करात मिळू शकते सूट; कोणाकोणाला होणार फायदा??

home

नवी दिल्ली । तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की होम लोनवर टॅक्स सूट उपलब्ध आहे. आगामी अर्थसंकल्पात होम लोनच्या इन्शुरन्स प्रीमियमवरही करात सूट दिली जाऊ शकते. होम लोन सुरक्षित करण्यासाठी ही सुविधा ग्राहकांना बजेटमध्ये द्यावी, असे आवाहन इन्शुरन्स कंपन्यांनी सरकारला केले आहे.

बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ तपन सिंघल म्हणाले की,”सरकारने प्रत्यक्ष कर सवलतीची व्याप्ती वाढवली पाहिजे. ज्या करदात्यांनी होम लोन सुरक्षित करण्यासाठी इन्शुरन्स उतरवला आहे त्यांना प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख सूट व्यतिरिक्त दिलासा दिला पाहिजे.” ते म्हणाले की,”वाढती आपत्ती आणि कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना होम लोन इन्शुरन्स काढण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. बँका होम लोन घेणाऱ्यांवर इन्शुरन्स काढण्यासाठी दबाव आणत असल्या तरी त्याचा हप्ता कर्जाच्या रकमेतच जोडला जातो. अशा परिस्थितीत ग्राहकांवर अतिरिक्त बोझा वाढतो, मात्र त्याचा फायदा त्यांना प्राप्तिकरात मिळत नाही.”

ही मागणीही उचलून धरली… जेणेकरून इन्शुरन्स प्रीमियम स्वस्त होईल
इन्शुरन्सचा हप्ता स्वस्त करण्यासाठी कंपन्यांनी बजेटमध्ये काही पावले उचलण्याची मागणीही केली आहे. ते म्हणतात की,” जर प्रीमियमवरील जीएसटी दर सध्याच्या 18 टक्क्यांवरून कमी केला तर इन्शुरन्सचा प्रवेश सुलभ होईल आणि प्रीमियम देखील स्वस्त होईल.” इन्शुरन्स कंपन्यांचे म्हणणे आहे की, इन्शुरन्स हे महामारीच्या वातावरणात प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक प्रॉडक्ट्स बनले आहे. सध्या देशात त्याची पोहोच 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. सरकारने प्रीमियम कमी करण्यास मदत केली तर इन्शुरन्स प्रॉडक्ट्स ची पोहोच वाढवता येईल.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासह संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह तर 10 कर्मचारी बाधित

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून जिल्हा रुग्णालयातील अन्य 10 जणांनाही कोरोनाची बाधा झाल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. डॉ. सुभाष चव्हाण आपल्या कुटुंबासमवेत आपल्या मूळ गावी पाली येथील घरी उपचार घेत आहेत.

सातारा जिल्ह्यामध्ये मार्च 2020 मध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित व्यक्तींसाठी ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देण्यासह अन्य सेवा सुविधा पुरविल्या होत्या. गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत त्यांनी सर्व प्रकारची खबरदारी घेऊनही काल कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी तातडीने आपली रॅट करून घेतली असता, ती पॉझिटिव्ह आली. त्यांच्या पाठोपाठ पत्नी, दोन मुले व कुटुंबातील अन्य एका सदस्याची चाचणी करण्यात आली. या सर्वांचेच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली. डॉ. सुभाष चव्हाण यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांना कोरोना झाल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहवासात आलेल्या जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपली रॅट चाचणी करून घेतली असता त्यापैकी 15 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांच्यावर आपापल्या घरी उपचार सुरू आहेत.

गेल्या अडीच वर्षातील उच्चांक

यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील अनेक वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सुरक्षा रक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र एकाच वेळी रुग्णालयातील 20 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या अडीच वर्षातील जिल्हा रुग्णालयातील हा उच्चांक समजला जातो.