Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2999

एलन मस्क दर तासाला करतात ‘इतकी’ कमाई; जाणून व्हाल थक्क

नवी दिल्ली । 2021 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर असलेले टेस्लाचे सीईओ एलन मस्क,यांनी यावर्षीही दमदार सुरुवात केली आहे मस्कने सोमवारी म्हणजेच 2022 मधील शेअर बाजाराच्या पहिल्याच दिवशी आपल्या कमाईत 33.8 अब्ज डॉलर्स (सुमारे 2.53 लाख कोटी) ची वाढ नोंदवली आहे. मस्कच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत झालेली वाढ हे यामागील सर्वात मोठे कारण आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची संपत्ती 304 बिलियन डॉलर्स आहे. मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. गेल्या वर्षी, एलन मस्कची एकूण संपत्ती 340 अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. यादरम्यान त्यांनी अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस यांनाही मागे टाकले. यावर्षीही त्यांची बरीच प्रगती होताना दिसत आहे.

टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

मस्कच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण प्रामुख्याने टेस्लाचे शेअर्स आहेत. टेस्ला शेअर्स सोमवारी 13.5% वाढून 1,199.78 डॉलर्सवर पोहोचले. मस्ककडे टेस्लाच्या सर्व शेअर्सपैकी सुमारे 18% हिस्सा आहे. टेस्लाच्या कार विक्रीत सलग सहा तिमाहीत वाढ होते आहे. यामुळे टेस्लाच्या शेअर्सची किंमत गगनाला भिडली आहे. सोमवारी, कंपनीचा स्टॉक 13.5 टक्क्यांनी वाढून 1,199.78 डॉलर्सवर पोहोचला.

टेस्लाने मॅन्युफॅक्चरिंग वाढवले

मस्कच्या EV मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने 2021 मध्ये जगभरातील डिलिव्हरी सुमारे एक मिलियन युनिट्सपर्यंत दुप्पट केली आहे. केवळ वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने 3 लाख युनिट्सची डिलिव्हरी केली. रिपोर्ट्स नुसार, Tesla Model 3 आणि Model Y हे अमेरिकन निर्मात्याकडून सर्वात लोकप्रिय EV होते, दोन्हीपैकी 911,208 युनिट्स विकले गेले.

भारतात दाखल होणार
इलेक्ट्रिक कार बनवणारी टेस्ला लवकरच भारतात देखील दाखल होणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी कर्नाटकातील बेंगळुरू येथे रजिस्ट्रेशन केले होते. यानंतर कंपनी भारतात आयात शुल्कात सवलत देण्याची मागणी करत आहे. मात्र सरकारकडून अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

पीएम किसानचा 10 वा हप्ता मिळाला नसेल तर ‘या’ ठिकाणी करा तक्रार

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. मात्र, काही शेतकरी असे आहेत की ज्यांना अजूनही हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही सरकारने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही त्या भागातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशीही संपर्क साधू शकता.

येथे तक्रार करा

किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाला नसेल, तर पीएम किसान सन्मानच्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल. यासाठी तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 011 24300606 / 011 23381092 वर कॉल करू शकता.

पीएम किसान हेल्प डेस्क

याशिवाय सोमवार ते शुक्रवार पीएम किसान हेल्प डेस्कशी http://pmkisan [email protected] वर ईमेलद्वारे संपर्क साधता येईल.

यामुळे अडकू शकतात हप्त्याचे पैसे

काही वेळा सरकारकडून खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात, मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण तुमचे आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांकातील चूक असू शकते.

केंद्र सरकार लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. ही रक्कम थेट खात्यात जमा केली जाते. 6000 रुपयांची ही रक्कम प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते. जर एखाद्या शेतकऱ्याला या योजनेंतर्गत पैसे मिळाले नाहीत, तर तुम्ही केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या हेल्पलाइनवर कॉल करून माहिती मिळवू शकता.

RBI कडून ऑफलाइन पेमेंटला परवानगी; पण ‘ही’ आहे मर्यादा

RBI

नवी दिल्ली । खेडे आणि शहरांमध्ये डिजिटल ट्रान्सझॅक्शन्सना चालना देण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकने ऑफलाइन पेमेंट अंतर्गत 200 रुपयांपर्यंतच्या ट्रान्सझॅक्शन्सना परवानगी आहे. जास्तीत जास्त 10 ट्रान्सझॅक्शनपर्यंत म्हणजेच एकूण 2,000 रुपयांपर्यंत ऑफलाइन ट्रान्सझॅक्शन करण्याची मर्यादा असेल. RBI ने सोमवारी ऑफलाइन डिजिटल पेमेंटसाठी एक फ्रेमवर्क जारी करत याबाबत माहिती दिली आहे.

ऑफलाइन डिजिटल पेमेंट्स अशा ट्रान्सझॅक्शन्ससाठी असतात, ज्यांना इंटरनेट किंवा मोबाइल नेटवर्कची आवश्यकता नसते. ऑफलाइन मोडमध्ये, कार्ड, वॉलेट आणि मोबाइलसह कोणत्याही माध्यमातून समोरासमोर पेमेंट केले जाऊ शकते.

AFA आवश्यक नाही

RBI ने म्हटले आहे की,”अशा ट्रान्सझॅक्शन्ससाठी ‘अ‍ॅडिशन फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन (AFA)’ आवश्यक नाही.” RBI ने सांगितले की,”यामध्ये पेमेंट ऑफलाईन होणार असल्याने, थोड्या अंतरानंतर ग्राहकांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे ‘अ‍ॅलर्ट’ मिळतील.”

ट्रान्सझॅक्शन्सची मर्यादा काय असेल ?
ऑफलाइन मोडद्वारे लहान मूल्याच्या डिजिटल पेमेंट सुविधेची रूपरेषा सांगते, “प्रत्येक ट्रान्सझॅक्शन्ससाठी 200 रुपयांची मर्यादा असेल. त्याची एकूण मर्यादा 2,000 रुपये असेल…” RBI ने सांगितले की, ऑफलाइन पेमेंट प्रायोगिक तत्त्वावर सप्टेंबर 2020 ते जून 2021 पर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये सुरू करण्यात आले. मिळालेल्या फिडबॅकच्या आधारे हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

काय फायदा होईल ?
रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे की, “ऑफलाइन पेमेंटमुळे खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात डिजिटल ट्रान्सझॅक्शन्सना प्रोत्साहन मिळेल. विशेषतः गावे आणि शहरांमध्ये. ही व्यवस्था तात्काळ लागू झाली आहे.” मात्र ग्राहकांच्या परवानगीनंतरच ऑफलाइन पेमेंटचा वापर करता येईल, असे केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे.

साताऱ्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 105 गावांसाठी धावले ‘नाम’ फाउंडेशन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यात महाबळेश्वर तालुक्यात 22 आणि 23 जुलै रोजी पावसाने हाहाकार केला होता. यामध्ये अनेक गावांवर अस्मानी संकट कोसळले होते. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने अनेक गावांचे भुसखलन होऊन मोठे अर्थिक नुकसान झाले होते. ढगफुटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या घराचे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले होता. या नुकसानग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सपाटीकरण आणि डागडुजी करण्याचा संपूर्ण खर्च ‘नाम’ फाउंडेशनने उचला आहे. पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान आणि गावातील वाहून गेलेल्या रस्त्यांसाठी नाम फौंडेशनने 105 गावांसाठी जेसीबी आणि पोकलेंन देऊन मदतीचा हात दिला आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील कोयना, सोळशी, कांदाटी, बामणोलीसह यांसह अनेक गावांचे अतोनात नुकसान झाले होते.
105 गाव व्यवस्थापन समिती आणि नाम फाउंडेशनच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आणि गावालगत असलेले ओढे, नदीपात्रे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासाठी नाम फाउंडेशनने मदतीचा हात दिला‌ आहे. अतिवृष्टीने मारलं आणि नाम फौंडेशनने तारले असे सांगत गावकऱ्यांनी नाम फौंडेशनचे आभार मानले आहेत.

दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्यात उर्जित अवस्था आणण्यासाठी नाम कडून मदत केली जाणार आहे. या वाहनांना स्थानिक समाजिक संस्था व व्यक्तीकडून इंधन पुरवठा केला जाणार आहे. वाघाळे, उचाटे येथे आज कामांचा शुभारंभ करण्यात आला.

मिरजेत पोलिसांकडून 33 लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

सांगली । कर्नाटकातील अथणी येथून पुण्याला गुटखा घेऊन चाललेल्या आयशरला मिरज गांधी चौकी पोलिसांनी मिरज-सांगलीरोडवरील हॉटेल राजधानीसमोर सापळा रचून पकडले. यावेळी पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये भुसा ठेवलेल्या पोत्याच्या पाठीमागे 33 लाखांचा वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा आढळला. यावेळी पोलिसांनी गुटखा व आयशर ट्रक असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी वाहन चालक दाऊल इकबाल मुल्ला, हसन आप्पासाहेब सनदी या दोघांना अटक केली आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालात 25 लाख 20 हजार रुपयांचा हिरा पान मसाल्याचे 105 पाऊच प्रत्येक पाऊचमध्ये 32 पुड्या 200 पोतींमध्ये 21 हजार पाऊस तसेच दुसर्‍या पांढर्‍या रंगाच्या प्लास्टीकच्या पोत्यात 6 लाख 30 रुपयांचा रेलॉय 717 सुंगधी तंबाखुचे 105 बॉक्स प्रती बॉक्समध्ये 30 पुड्या असे 200 पोती तसेच 8 लाख 800 रुपयांचा मोठ्या प्लास्टीकच्या बॉक्समध्ये रत्नाछाप तंबाखू तसेच 16 लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक व इतर साहित्य असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आयशरमधून गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखु अथणी येथून पुण्याला मिरजेतून जाणार असल्याची माहिती डीबी पथक व गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गांधी चौकी पोलिसांनी नाकाबंदी करून आयशर ट्रक राजधानी हॉटेल समोरून जात असताना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यास पकडले. यावेळी पोलिसांनी या ट्रकची झाडाझडती घेतली असता ट्रकच्या पाठीमागील बाजूस समोर भुसा भरलेली पोती ठेवली होती. पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर त्यांना भुसा भरलेल्या पोत्यांच्या मागील बाजूस पांढर्‍या पोत्यामध्ये गुटखा आढळून आला.

पुणे जिल्हा बँक निवडणूकीत महाविकास आघाडीचा डंका; 20-1 ने सत्ता काबीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  निवडणूकीत महाविकास आघाडीचा डंका पाहायला मिळाला. 21 जागांसाठी लागलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने 20 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विजयानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, जिल्हा बँकेत झालेला विजयाने नक्कीच आनंद झाला आहे.मात्र एक जागा गेली याच दुःख वाटतंय असे म्हणत जिथे कमी पडलो त्याची चौकशी करू असे अजित पवारांनी म्हंटल

सुरेश घुले यांच्या पराभवाने धक्का –

विद्यमान संचालक सुरेश घुले यांचा पराभव हा अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी घुले यांचा पराभव केला आहे. घुले यांच्या विजयासाठी स्वत: अजित पवार मैदानात उतरले होते. कंद यांना जागा दाखवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं. तरीही घुले यांचा पराभव झाल्याने अजित पवारांची धक्का मानला जात आहे

14 जागा आधीच बिनविरोध

पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, संग्राम थोपटे, संजय जगताप, दिलीप मोहिते, रमेश थोरात, संजय काळे, आप्पासाहेब जगदाळे, माऊली दाभाडे, रेवनाथ दारवटकर, प्रविण शिंदे, संभाजी होळकर, दत्तात्रेय येळे हे 14 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत

SBI ग्राहकांना झटका!! ‘या’ सर्व्हिससाठी मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

Bank

नवी दिल्ली । 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यासह अनेक शुल्क वाढले आहेत. त्यातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांना अजून एक झटका बसणार आहे. आगामी 1 फेब्रुवारी पासून एसबीआयच्या IMPS या लोकप्रिय पेमेंट सेवेसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

SBI च्या वेबसाइटनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान पैसे पाठवण्याचे शुल्क 20 रुपये + GST ​​असेल. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे ट्रान्सझॅक्शनसाठीच्या रकमेची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली होती त्यानुसार SBI ने यासाठी 20 रुपये + GST असे शुल्क आकारले आहे.

IMPS म्हणजे काय ?
IMPS ला इमीडियेट मोबाइल पेमेंट सर्व्हिस म्हणतात. IMPS ही बँकांद्वारे ऑफर केलेली लोकप्रिय पेमेंट सर्व्हिस आहे, जी रिअल-टाइम इंटर-बँक फंड ट्रान्सफरला परवानगी तर देतेच तसेच ती रविवार आणि सुट्ट्यांसह 24 X 7 उपलब्ध आहे.

एटीएममधून पैसे काढणे महागणार
दरम्यान, जानेवारी 2022 पासून एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे. एटीएममधून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ग्राहकाला जास्त शुल्क द्यावे लागेल. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एक्सिस बँक किंवा इतर बँकेच्या एटीएममधील मोफत मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक ट्रान्सझॅक्शनवर 21 रुपये + GST लागू होईल. हे सुधारित दर 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील.

नवीन मर्यादा अशी असेल
पुढील महिन्यापासून, ग्राहकांनी मोफत ट्रान्सझॅक्शनची मासिक मर्यादा ओलांडल्यास 20 रुपयांऐवजी 21 रुपये प्रति ट्रान्सझॅक्शन द्यावे लागतील. RBI ने सांगितले होते की, जास्त इंटरचेंज चार्ज आणि सामान्य खर्चात वाढ झाल्यामुळे, त्यांनी ट्रान्सझॅक्शनवरील शुल्क 21 रुपयांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे.

Gold Price : सोन्याच्या किंमतीत वाढ, आज किती महागले जाणून घ्या

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजच्या सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली असून आगामी काळात सोन्याच्या दरवाढीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 49260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोरोना मुळे जगभरात वाढलेले निर्बंध, लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या आर्थिक घडामोडींवर होणारे परिणाम यामुळे सोन्याच्या मागणीला आणखी वेग येऊन दरवाढ होईल अशी शक्यता आहे.

MCX वर वाढले सोन्याचे भाव
आज मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 47,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. तर दुसरीकडे, चांदीबाबत बोलायचं झालं तर आज चांदीच्या दरात 0.12 टक्क्यांनी घसरण झाली असून 61,668 रुपये किलो असा चांदीचा भाव आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,540 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,070 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,260 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,260 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,260 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,260 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,260 रुपये
पुणे – 46,540 रुपये
नागपूर – 47,260 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -49,260 रुपये
पुणे – 49,070 रुपये
नागपूर – 49,260 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4655.00 Rs 4656.00 0.021 %⌃
8 GRAM Rs 37240 Rs 37248 0.021 %⌃
10 GRAM Rs 46550 Rs 46560 0.021 %⌃
100 GRAM Rs 465500 Rs 465600 0.021 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4908.00 Rs 4909.00 0.02 %⌃
8 GRAM Rs 39264 Rs 39272 0.02 %⌃
10 GRAM Rs 49080 Rs 49090 0.02 %⌃
100 GRAM Rs 490800 Rs 490900 0.02 %⌃

लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौरांचे महत्वाचे विधान; म्हणाल्या…

kishori pednekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या दरम्यान आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन, कोरोना संदर्भात महत्वाचे विधान केले आहे. सध्या रुग्णसंख्या तीन ते चार पटीने वाढत आहे. मुंबईत दिवसेंदिवस ओमिक्रॉन, कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री लॉकडाऊन आणि कोरोना संदर्भात जनतेशी बोलणार असल्याचे पेडणेकर यांनी म्हंटले आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या दिशेने चालले आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी काळजी घेतली तर लॉकाडाऊन होणार नाही. पण आपल्याकडे वीस हजार हा कोरोनाबाधितांचा आकडा झाला तर केंद्राने दिलेल्या नियमांची पूर्तता करावी लागेल.

केंद्राने दिलेल्या नियमांचे पूर्तता टाळायची असेल तर बाजारातील, लग्नातील गर्दी टाळावी लागेल. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आपण थोपवली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सहकार्याने आपण ही लढाई जिंकू शकतो. कोरोना रोखण्यासाठी सोसायट्यांसाठी महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्या सोसायटीमध्ये 20 किंवा त्यापेक्षा कोविड बाधित रुग्ण आढळतील ती इमारत सील करण्यात येणार आहे. आतापर्यंत 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येत होती, अशीही माहिती पेडणेकर यांनी यावेळी दिली.

पुणे- सातारा मार्गावर बेकायदेशी टोल वसुली : कंत्राटदार रिलायन्सला दोन आठवड्यात याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश

सातारा | पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील दोन टोल नाक्यांवर वाहनांकडून गेली पाच वर्षे सुरू असलेली कोट्यावधींची टोल वसूली ही बेकायदेशीर असून ती करार आणि नियमांचा भंग करून सुरू असल्याचा आरोप करत हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाटेगावकर यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय आहूजा यांच्या खंडपीठानं सोमवारी याप्रकरणी कंत्राटदार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला दोन आठवड्यात याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिलेत.

सीबीआय, राज्य सरकार आणि अंमलबजावणी संचालनालय या प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी 24 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर सहा लेनचं बांधकाम पूर्ण व्हायच्या आधीच टोल वसूली केली आहे. केंद्र सरकारनं नियमांमध्ये सुधारणा करत काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुलीवर घातलेली बंदी याकडे याचिककर्त्याने न्यायालयाचं लक्ष वेधलं आहे. या रस्त्याचे कंत्राटदार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीने करार आणि नियमांना हरताळ फासून ही टोल वसुली सुरू केली. यामध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप या याचिकेतून केला गेला आहे. यावेळी हायकोर्टानं कंपनी विरोधात याचिका असताना त्यांना यात प्रतिवादी का करण्यात आलेलं नाही?, असा सवालही उपस्थित केला. यावेळी वाटेगावकर यांनी कंपनी विरोधात तक्रार केल्यानंतर सीबीआयनं याची दखल घेऊन राज्य सरकारकडे आठ महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु राज्य सरकारने अद्याप ही परवानगी दिली नसल्याचं हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिलं.

राष्ट्रीय महामार्ग 4 च्या पुणे-सातारा विभागात हवेली येथील खेडशिवापूर आणि जावळी तालूक्यातील आणेवाडी या दोन ठिकाणी सास 2010 मध्ये टोल वसूल करण्याचे कंत्राट रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीला 24 वर्षांकरता देण्यात आलं आहे. हे कंत्राट देताना या टोलवसुलीतून चार पदरी रस्ता अडीच वर्षात सहा पदरी करण्याची अट घालण्यात आली होती. महामार्ग रूंदीकरणाचं काम साल 2013 पर्यंत पूर्ण केलं नाही. दरम्यान केंद्र सरकारनं डिसेंबर 2013 मध्ये या नियमांमध्ये दुरूस्ती करून 30 महिन्यांत रस्त्याचं सहा पदरी काम अपूर्ण असलेल्या प्रकल्पांमध्ये टोलवसूल करण्याचा अधिकारच रद्द केला आहे. मात्र राज्य सरकारनं कंपनीला डिसेंबर 2015 पर्यंत कंपनीला मुदत वाढ दिली. त्यानंतरही साल 2020 पर्यंत कंपनीनं सहा पदरी रस्त्याचं काम पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे जानेवारी 2016 पासून कंपनीनं इथं बेकायदा टोल वसूल करून वाहन धारकांची पूर्ण फसवणूक केली असल्याचे याचिकाकर्ते वाटेगावकर यांनी म्हटले आहे.