Thursday, January 1, 2026
Home Blog Page 3000

एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत राज्यातील 10 मंत्र्यांना आणि 20 हून जास्त आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान आता राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे, असे त्यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे.

मंत्री शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणा सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबई आणि नवी मुंबईतील विकासकामांची केली पाहणी केली होती. दरम्यान काल खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांच्याकडून विविध कार्यक्रम रद्द केले जात आहेत. तसेच राज्य सरकारकडून ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले जात आहेत.

या नेत्यांना झाली आहे कोरोनाची लागण –

आतापर्यंत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार; पडळकरांची टीका

Awhad Padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझा ओबीसींवर फारसा विश्वास नाही कारण आरक्षणाच्या लढाईत ओबीसी मैदानात नव्हतेच असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार आहेत अशी टीका पडळकरांनी केली आहे.

पडळकर म्हणाले, जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही. कारण मंडल आयोग आरक्षण येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता. वंचितांच्या आरक्षणाला नाकं मुरडली होती. त्यावेळी शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला?, असा सवाल करत जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार आहेत अशी टीका पडळकरांनी केली.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले-

ठाण्यातील ओबीसी एकीकरण समिती तर्फे आयोजित सन्मान सावित्रीच्या लेकींचा या कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणाचा विषय मांडला आहे. खरं तर माझा ओबीसींवर फारसा विश्वास नाही. मंडळ आयोगाचे आरक्षण हे ओबीसी साठी होत मात्र आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते असे आव्हाड यांनी म्हंटल. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पडगा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं.असेही ते म्हणाले.

कोरोना बाधित शतकाकडे : सातारा जिल्ह्याचा पाॅझिटीव्ह रेट 3. 45 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 98 जण बाधित आढळले आहेत. कोरोना बाधितांचा गेल्या काही दिवसातील आकडा आता वाढू लागल्याने लागला आहे. गेल्या दोन महिन्यांतील उच्चांकी कोरोना बाधित आढळल्याने जिल्हा प्रशासनापुढे पुन्हा कोरोना थोपवण्याचे आव्हान उभे राहताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात 98 लोक बाधित आढळून आले आहेत. गेल्या आठवड्यात तपासणी अहवालाचा पॉझिटिव्ह रेट हा 1 टक्क्यापेक्षा कमी झाला होता, मात्र आजच्या अहवालात जिल्हाचा पॉझिटिव्हिटी दर पोहचला 3. 45 टक्क्यांवर पोहचाला आहे.

गेल्या 2-3 दिवसापासून बाधितांचा आलेला आकडा जिल्हावासियासाठी डोकेदुखी वाढवणारा आहे. त्यामुळे हळूहळू जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असलेल्या सातारा जिल्ह्यात पुन्हा कोरोना डोके वर काढत असून धाकधूक वाढतानाचे चित्र दिसत आहे. त्यातच फलटण तालुक्यासह सातारा शहरात अोमिक्राॅन बाधित सापडल्याने पुन्हा कोरोना आणि अोमिक्राॅनचा सामना जिल्हावासियांना करावा लागू शकतो.

 

अनिल परब यांच्यावर कारवाई होणार?; ‘हे’ आहे कारण

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर परब यांच्या किनारपट्टी भागातील रिसॉर्टवर केंद्र सरकारच्या वतीने लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कॅबिनेट मंत्री अनिल परब यांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी नोटीस दिली होती. नोटिशीमध्ये लवकरात लवकर सीआरझेड अंतर्गत येणाऱ्या रिसोर्टचे बांधकाम पाडावे अशी सूचना देण्यात आली होती. त्यामध्ये आपल्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई करण्याची ताकीत केंद्र सरकारने दिली होती. यासाठी परब यांना मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, आता मुदतीचा कालावधी पूर्ण झालयामुळे केंद्र सरकारच्यावतीने आठवडाभरात पुन्हा एकदा नोटीस बजावून कारवाई करण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या सीआरझेड अंतर्गत येणारे या संपत्तीच्या मुद्द्यावरून अनेक पुरावे सादर केले आहेत. सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत त्याबाबत त्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्यातर्फे अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या संपत्तीची पाहणी करण्यात आली होती. तसेच केंद्र सरकारच्या वतीने परब यांना हे बांधकाम तोडण्या करीत दिलेली मुदत संपलेली आहे. त्यामुळे परब यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कलमांतर्गत कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

रोहित पवारांना कोरोनाची लागण; जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहित पवार यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून 30 पेक्ष्या अधिक राजकीय नेत्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यामुळे चिंता वाढली आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच राजकीय नेत्यांना देखील कोरोनाचा विळखा बसला आहे. खासदार सुप्रिया सुळे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, अशा अनेक मातब्बर नेत्याना कोरोनाची लागण झाली आहे.

दुसऱ्या बायकोचा पहिल्या बायकोला अभिमान..ही भानगड नक्की काय हाय ते बघाच

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

असं कुठ असतंय व्हय, पण असतयं आमच्या कराडात दुकानाला नावं ते पण साधसुध नव्हे तर चक्क दुसरी बायको असे असते. कराड तालुक्यातील कोळे गावातील सलुन दुकानदाराने दुसरी बायको जेंन्टस पार्लर असे नाव आपल्या दुकानाला दिले आहे. अमोल सपकाळ याने बायको सारखे व्यवसायावर प्रेम करत असल्याने दुकानाला दुसरी बायको असे नाव दिल्याने नावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अन् महत्वाच म्हणजे पहिल्या बायकोला दुसऱ्या बायकोचा अभिमानही वाटतो.

कोळे गावातील अमोल सकपाळ यांचा पारंपारिक सलुन व्यवसाय आहे. अद्यावत साधना सह नुतनीकरण केलेल्या दुकानाला काय नाव द्यावे या विचारता त्यांने दुकानाला दुसरी बायको असे नाव दिले. दुसरी बायको जेंन्टस पार्लर अशा विचित्र नावाची पाटी पाहुन बायकोसह घरातील सदस्यांनी नापसंती दर्शवत विरोध केला होता. दुकान, व्यवसाया प्रति असलेल्या प्रेमातून नाव देत असल्याचे समजवल्यानंतर घरच्यांचा विरोध मावळला. मात्र सैन्य दलातून निवृत झालेल्या अमोल यांच्या वडीलांचा जोरदार विरोध कायम होता. मी बायकोवर जेवढे प्रेम माया करतो तिला जपतो तिच्या सानिध्यात असतो तसाच मी बायकोनंतर घरातून आल्यावर सलून दुकानात व्यवसायाच्या सानिध्यात असतो. दुकान व व्यवसायावर माझे बायको इतकेच प्रेम आहे. माझा संसार यशस्वी चालण्यासाठी दुकान व बायको दोन्हींची गरज असल्याने मी दुकानाला दुसरी बायको नाव दिले. सैनिकांची दुसरी पत्नी बंदुक असते तसे माझे दुकान माझ्यासाठी आहे. कोणी काही म्हणो मी ठाम आहे अशी माहिती अमोल सकपाळ यांनी दिली

पहिल्या बायकोला… दुसऱ्या बायकोचा अभिमान

सुरवातीला दुसरी बायको हे नाव थोडे विचित्र वाटले. माझ्याशी लग्न केल्यामुळे त्यांनी पहिली बायको मला केले व व्यवसायावर प्रेम असल्याने दुकानाला दुसरी बायको नाव दिले. व्यवसाय व बायकोची जबाबदारी महत्वाची असते व ती एकमेकांना पुरक असल्याने ती जबाबदारी त्यांनी यशस्वी निभावली आहे. दुसरी बायको असे दुकानाला नाव दिल्याचा अभिमान वाटत असल्याचे अमोल सपकाळ यांच्या पत्नीने यांनी सांगितले.

दुकानाच्या नावाने गैरसमज, गंमती- जमती 

कराड ढेबेवाडी राज्य रस्त्यावर असणाऱ्या कोळे गावातील प्रवेश द्वारावरच अमोल यांचे दुकान असुन बनपुरी येथील श्रीक्षेत्र नाईकबाला येणाऱ्या भाविक पर्यटकांचे दुकानाच्या नावाची पाटी लक्ष वेधून घेत आहे काही उत्सुक पर्यटक , भाविक फोटो, सेल्फी काढुन घेतात तर काही जण या मागचे कारण विचारुन घेतात तसेच दुकानात केस कापणयासाठी आलेल्या ग्राहकाने फोनवरून समोरच्याला ठिकाण सांगितले असता दुसऱ्या बाजूला ऐकणाऱ्या अनेकांचे गैरसमज गंमती जमती होतात अशी माहिती अमोल सकपाळ यांनी दिली.

पोस्ट मास्तरने केला 35 लाखांचा घोटाळा; सर्व सामान्यांचे बचत खात्यातील पैसे ‘असे’ पळवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खातेदारांकडून जमा केलेल्या पैशांवर चक्क पोस्ट मास्तरनेच डल्ला मारला असल्याची घटना मांजरखेड येथील पोष्टाच्या शाखेत घडली आहे. त्याच्याकडून दररोज खातेदारांकडून पैसे घेत त्याची खातेपुस्तकावर नोंद न करता स्वतः वापरण्यात आली आहे. या शाखेतील पोस्टमास्टरने एक-दोन नव्हे, तर तब्बल 35 लाख रुपयांचा हा घोटाळा केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मांजरखेड येथील पोष्टाच्या शाखेत जानराव किसनराव सवई या नावाचे पोस्ट मास्टर अनेक वर्षांपासून काम करत आहेत. तो पोष्टात खातेदाराकडून दररोज जमा केलेल्या रक्कमेची रीतसर पासबुक तसेच कम्पुटरमध्ये नोंद न करता परस्पर वापरत असे. हा प्रकार अनेक दिवसांपासून त्याच्याकडून केला जात होता.

ज्यावेळी खातेदारांकडून पासबुकांची मागणी केले जात असे त्यावेळी पासबुक घाल झाल्याचे त्याच्याकडून कारण सांगितले जात. अखेर हि गोष्ट चांदूर रेल्वे येथील पोस्ट ऑफिसमधील उपडाकपालांच्या कानी पडल्यानंतर त्यांनी पासबूकमध्ये नोंद असलेल्या आणि प्रत्यक्षात जमा करण्यात आलेल्या रकमेचा ताळमेळ जुळतोय का हे पाहिले.

पासबूकमध्ये नोंद असलेल्या आणि प्रत्यक्षात पोस्ट ऑफिसमधील खातेदाराच्या खात्यात जमा म्हणून नोंद असलेल्या रक्कमेत ताळमेळ नसल्याचे उपडाकपाल याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी जानराव किसनराव सवई यांच्याकडे विचारणा केली. चौकशी अंती 16 जुलै 2021 रोजी सवई याला निलंबित केले. त्यानंतर सहायक अधीक्षक डाकघर (दक्षिण उपविभाग, अमरावती) संगीता रत्तेवार यांनी 24 डिसेंबर रोजी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तक्रार नोंदवत अधिक तपास केला. त्यानंतर पोस्ट मास्टर जानराव किसनराव सवई याने डी. जी. गुल्हाने, डी. एन. भाग्यवंत यांच्या मदतीने काही खातेधारकांचे पासबूक आपल्या ताब्यात घेऊन ते गहाळ केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, आरोपी सवई याला मदत करणाऱ्या दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार देण्यात आली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न –

खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात येऊ नये यासाठी पोस्टमास्टरने अत्यंत हुशारीने खातेदारांची पासबुकच गहाळ केली. पुस्तके घाल करण्यासाठी संबंधित पोस्टमास्टरने आपल्या इतर सहकाऱ्यांचीही मदत घेतली. त्याच्या मदतीच्या साहाय्याने त्याने खातेदारांची पुस्तके गहाळ केली. त्यामुळे त्याला या प्रकारात मदत करणाऱ्या दोघा सहकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आरक्षणाच्या लढाईत ओबीसी मैदानात नव्हतेच; जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने नवा वाद उफाळणार ??

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसींवर माझा काही फार विश्वास नाही, कारण आरक्षणासाठी जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केल आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ओबीसी एकीकरण समिती तर्फे आयोजित सन्मान सावित्रीच्या लेकींचा या कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणाचा विषय मांडला आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे

जितेंद्र आव्हाड म्हणाले खरं तर माझा ओबीसींवर फारसा विश्वास नाही. मंडळ आयोगाचे आरक्षण हे ओबीसी साठी होत मात्र आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला महार आणि दलित समाज होता. कारण ओबीसींनी लढायचंच नसत .

ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पडगा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नसत. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येतात. नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे, केंद्र सरकारशी दोन हात करावे लागतील’, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या विधानानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाडांचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात शांततेचं वातावरण असताना धर्मा धर्मा मध्ये आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम जितेंद्र आव्हाड करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला तसेच आव्हाडांनी राज्यातील जनतेची माफी मागावी असेही अशी मागणी त्यांनी केली

 

पंतप्रधान मोदी प्रचंड अहंकारी; राज्यपालांनीच साधला निशाणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलो असता मला त्यांच्यातील अहंकार दिसला असा बेधडक आरोप भाजपचेच नेते आणि मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर कृषी कायद्यांबाबत मोदींशी चर्चा करताना पाच मिनिटातच माझा वाद झाला असेही ते म्हणाले. थेट भाजपच्या राज्यपालांनीच पंतप्रधानांवर गंभीर आरोप केल्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे

सत्यपाल मलिक हरयाणातील दादरी येथील एका धार्मिक ठिकाणी भेट द्यायला आले होते. तेव्हा ते म्हणाले की, मी शेतकरी आंदोलनाबाबात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. परंतु पंतप्रधान मोदी हे अतिशय अहंकारी आहेत. मी त्यांना म्हटले की शेतकरी आंदोलनात ५०० शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा ते माझ्यासाठी मेले का? असा प्रतिप्रश्न मोदींनी मला केला , तेव्हा मलिक यांनी हो तुमच्यामुळेच मेले कारण तुम्ही राजा झाले आहात असेही मलिक यावेळी म्हणाले.

कोण आहेत सत्यपाल मलिक

सत्यपाल मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये 24 जुलै 1946 ला एका शेतकरी जाट कुटुंबात झाला

1974 मध्ये चौधरी चरण सिंह यांच्या भारतीय क्रांती दलाच्या तिकीटावर ते पहिल्यांदा आमदार

अमित शाहंच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते

30 सप्टेंबर 2017 रोजी त्यांना बिहारचं राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं

गोवा, ओडिशा, कश्मीर सारख्या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी पाहिली

सध्या ते मेघालयचे राज्यपाल आहेत

Video : महाबळेश्वरच्या बाजारपेठेत रानगव्याची थाटात एंन्ट्री, वनविभाग सतर्क

महाबळेश्वर | सांगली शहरात गेल्या आठवड्यात आलेल्या रानगव्याच्या एंन्ट्रीनंतर आता आता थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे मंगळवारी मध्यरात्री दि. 3 रोजी 1 वाजण्याच्या सुमारास घुसला होता.  सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत मध्यरात्री जंगली रानगव्याने फेरफटका मारला. मध्यरात्री गव्याने बाजारपेठेत आल्याने त्याचे चित्रीकरणही कैद झाले आहे.

महाबळेश्वर बाजारपेठेत गवा हा सुमारे तासभर परिसरात फिरत होता. या गव्याचे चित्रीकरण सीसीटीव्हत कैद झाले आहे. महाबळेश्वर परिसरात घनदाट जंगल आहे. येथे अनेक प्रकारचे पशू पक्षी आहेत. जंगलाचा भाग साेडून ते कधीच शहरात येत नाहीत. परंतु मध्यरात्री एक रानगवा बाजारपेठेत घुसला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

https://www.facebook.com/watch?v=222437713390021

या गव्याची माहिती मिळताच स्थानिकांनी वनविभागास कळविले. वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी गव्यास नजीकच्या जंगलात हुसकावून लावले. यामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. पहिल्यांदाच गव्याचा फेरफटका बाजारपेठेत झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.