Saturday, December 6, 2025
Home Blog Page 4

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी केंद्राचा मोठा निर्णय!! या लाईनवर 2 नव्या मार्गिका उभारणार

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिले आहे. बदलापूर ते कर्जतदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने मुंबईकरांसाठीचा हा प्रकल्प मंजूर केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लोकलची गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे.

मुंबई-पुणेदरम्यान रेल्वे प्रवासाचा (Mumbai Local Train) वेग वाढवणे आणि मुंबई उपनगरी रेल्वेवरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी कर्जत ते बदलापूरदरम्यान तिसरी-चौथी मार्गिका उभारण्यात येत आहेत. ३२ किलोमीटरच्या मार्गात आठ मोठे पूल, १०६ लहान पूल असे एकूण ११४ पूल आणि एक वाहने आणि पादचाऱ्यांसाठी बोगदा (रोडअंडर ब्रीज) तयार करण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या दृष्टीने भविष्यातील मागणीही पूर्ण करता येईल, या नव्या मार्गिकांमुळे दक्षिण भारतासोबतच्या दळणवळणीय जोडणीची सुविधाही मिळू शकेल. बदलापूर ते कर्जतदरम्यान दोन नव्या रेल्वे मार्गांमुळे मुंबई उपनगरी रेल्वेसह मुंबई-पुण्यातील प्रवाशांनाही लाभ होणार आहे.

गुजरातसाठीही आणखी एक प्रकल्प– Mumbai Local Train

बदलापूर ते कर्जत व्यतिरिक्त केंद्र सरकारने देवभूमी द्वारका (ओखा) – कानालूस दुहेरीकरण – 141 किलोमीटर प्रकल्पाला सुद्धा मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील ४ जिल्ह्यांतून जाणाऱ्या या दोन्ही प्रकल्पांमुळे रेल्वेचे नेटवर्क सुमारे २२४ किलोमीटरने वाढणार आहे. या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजूरी दिल्याने ३२ लाख लोकसंख्या असलेल्या सुमारे ५८५ गावांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यांचा प्रवास आणि दळणवळणाची सोय सोप्पी होणार आहे. विस्तारीत मार्गिकेच्या क्षमतेमुळे वाहतुकीचा वेग आणि व्याप्तीत वाढ होईल. तसेच वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होईल.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी युती? शरद पवार – एकनाथ शिंदे एकत्र येणार ?

Maharashtra Politics

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Politics । स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळच चित्र बघायला मिळतेय. एकीकडे राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी असा थेट सामना होईल असं बोललं जात होतं . मात्र प्रत्यक्षात स्थानिक ग्राउंडवर मात्र परिस्थिती वेगळीच पाहायला मिळते. अनेक ठिकाणी शिंदे गट आणि पवार गट एकत्र दिसतोय, तर काही ठिकाणी भाजप विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र मोट बांधण्याचे चित्र पाहायला मिळतंय. अशातच आता आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नव्या युतीची शक्यता बोलून दाखवली आहे.

काय म्हणाले शशिकांत शिंदे? Maharashtra Politics

सोलापुर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे शिंदेंच्या शिवसेनेने पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली आहे. याच दरम्यान शशिकांत शिंदे यांनी म्हंटल कि, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिंदे शिवसेना यांची कुर्डूवाडी नगर परिषदेत झालेली निवडणूक पूर्व युती भविष्यातील नांदी ठरू शकते. कुर्डूवाडी नगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाची सत्ता रोखण्यासाठी शिंदे गट आणि शरद पवार गट एकत्र आला आहे. यावेळी भाषणात शशिकांत शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदेंचा केवळ वापर करुन घेतला. आपण तर सर्व साधी माणसं आहोत. पण लढणारी माणसे कधीच शरणागती घेत नसतात. कुर्डूवाडी मध्ये तुम्ही लोक आज एकत्र आलाय कदाचित भविष्यातल्या राजकारणाची नांदी ठरू शकते. शशिकांत शिंदे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. भाजपकडून शिंदे गटातील स्थानिक नेते फोडले जात आहेत असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाऊन अमित शाह यांनाही भेटले होते. तर दुसरीकडे शरद पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध राहिलेत. मुख्यमंत्री असतानाही शिंदे आणि पवारांच्या भेटीगाठी या होतच होत्या. त्यामुळे आज शशिकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदेंसोबतच्या युतीच्या चर्चाना यामुळेच बळ मिळताना दिसतंय. भविष्यात खरोखरच शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा उलटफेर बघायला मिळेल.

Gold Price Today : सोन्याचे भाव कमी झाले!! ग्राहकांना मोठी खुशखबर

Gold Price Today 27 nov

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Price Today । सोने खरेदीदार ग्राहकांसाठी आज आनंदाची बातमी आहे. खरं तर गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत वाढत चालल्या होत्या. परंतु आज भारतीय सराफा बाजारात सोन्याचे भाव एकदम कमी झाले आहेत. आज २४ कॅरेट १० ग्राम सोने 125500 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत -0.34% म्हणजेच 431 रुपयांची घसरण झाली आहे, तर दुसरीकडे चांदीच्या किमती मात्र वाढलेल्या पाहायला मिळत आहेत.

खरं तर MCX वर आज सोन्याचा व्यवहार 125500 रुपयांवर उघडला जो मागील बाजारात 125931रुपयांवर बंद झाला होता. सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमती खाली जात गेल्या. ९ वाजून ५३ मिनिटांनी सोन्याच्या किमती १२५३७० रुपयांवर व्यवहार करत होत्या. यानंतर ११ वाजून २६ मिनिटांनी सोन्याचा भाव १२५२८६ रुपयांच्या निच्चांकी पातळीवर पोहचला. दुपारनंतर सोन्याच्या किमती थोड्याफार वाढताना दिसल्या. सध्या १२ वाजून १० मिनिटांनी २४ कॅरेट १० ग्राम सोने 125500 रुपयांवर व्यवहार करत आहे. Gold Price Today

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 117100 रुपये
मुंबई – 117100 रुपये
नागपूर – 117100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 127750 रूपये
मुंबई – 127750 रूपये
नागपूर – 127750 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाला जोडणार आणखी एक शहर; कोणाला होणार फायदा?

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samruddhi Mahamarg । मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या विस्ताराचे काम सुरु आहे. मराठवाडा, विदर्भासाठी गेमचेन्जर ठरत असलेल्या या समृद्धी महामार्गामुळे प्रवास अगदी सोप्पा आणि जलद झाला आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा समृद्धी महामार्ग देशातील एक महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जातोय. आता महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर समृद्धी महामार्गाला जोडलं जाणार आहे. पुणे–शिरूर राष्ट्रीय महामार्ग आणि समृद्धी महामार्गाला जोडणारा आणखी एक महत्त्वाचा रस्ता निर्माण करण्यास मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली आहे.

पुणे ते शिरुर राष्ट्रीय महामार्गावरील 53.4 किमी अंतरातील चार पदरी आणि सहा पदरी उन्नत महामार्गासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बिडकीन औद्योगिक वसाहत आणि बिडकीन ते ढोरेगाव सहा पदरी रस्ता निर्मितीला (Samruddhi Mahamarg ) मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या नवीन प्रोजेक्टमुळे पुणे, शिरूर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातील औद्योगिक क्षेत्रांना थेट समृद्धी महामार्गाची जोड मिळणार असून, औद्योगिक वाहतूक आणि प्रवास अतिशय सोप्पा आणि जलद होणार आहे.

शेंद्रा–बिडकीन औद्योगिक पट्ट्यास मोठा फायदा – Samruddhi Mahamarg

या नव्या रस्त्यामुळे शेंद्रा–बिडकीन औद्योगिक पट्ट्यास मोठा फायदा होणार आहे. पुणे ते शिरूरदरम्यान औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात असल्याने साहजिकच आगामी काळात येथील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे ही उन्नत वाहतूक व्यवस्था तातडीने उभी करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. यासाठी हे काम तीन वर्षांच्या आत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. 6 पदरी रस्त्यांच्या काम आणि भूसंपादनाला तातडीने सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Hong Kong Fire : 7 इमारतींना भीषण आग; 44 मृत्यू, 300 बेपत्ता

Hong Kong Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hong Kong Fire जागतिक पटलावरून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. एकाच भागातील ७ इमारतींना भीषण आग लागली आहे. या आगीत आत्तापर्यंत ४४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ३०० हुन अधिकजण गंभीररित्या जखमी आहेत. इमारती उंचच उंच असल्याने बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.आगीची हि घटना हॉंगकॉंग मध्ये घडली आहे.

नेमकं काय घडलं ? Hong Kong Fire

हाँगकाँगमधील तैपो येथील बुधवारी (26 नोव्हेंबर 2025) 7 बहुमजली इमारतींमध्ये आग लागली. ज्यावेळी आगीची घटना घडली, त्यावेळी लोक मोठ्या संख्येने घरात होते. लोकांना घरातून बाहेर पडण्याची साधी संधी देखील मिळाली नाही, आग तर दुसरीकडे अगदी वाऱ्यासारखी पसरत गेली. या हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या बाहेर बांबूचे मचान आणि बांधकाम जाळ्या लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे आग इतर इमारतींमध्ये वेगाने पसरली. या आगीत आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 300 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. हि आग कशी लागली याचा तपास आता केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी ३ संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

अग्निशामक दल घटनास्थळी

सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. आग विझविण्यासाठी (Hong Kong Fire) आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी 700 हून अधिक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी सतत काम करत आहेत. परंतु धूर, उंची आणि अरुंद पायऱ्या यामुळे बचाव कार्य करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी, उंच मजल्यांवरून पाणी फवारण्यासाठी हायड्रॉलिक शिड्यांचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे आग काल दुपारी लागली असली तरीही रात्री उशीरापर्यंत ही आग विझली नव्हती. इमारतींची उंची जास्त असल्याने आग विझवण्याचे मोठे आव्हान आहे.

Uttan to Virar Sea Bridge : उत्तन ते विरार सागरी सेतू प्रकल्पाला मंजूरी! मुंबईकरांचा प्रवास होणार सोप्पा

Uttan to Virar Sea Bridge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Uttan to Virar Sea Bridge । मागील काही वर्षात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईचा मोठा कायापालट झाला आहे. अनेक ठिकाणी नवनवीन रस्ते, उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत, जेणेकरून मुंबईकरांचा प्रवास सुखाचा आनंदाचा आणि आरामदायी व्हावा. आता मुंबईकरांसाठी आणखी एक प्रकल्प मंजूर झाला आहे. महाराष्ट्र सरकारने उत्तन-विरार सागरी मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केला, हा प्रकल्प अखेर मुंबईच्या किनारी रस्त्यांच्या नेटवर्कचा सर्वात उत्तरेकडील भाग म्हणून काम करेल.

किती कोटींचा प्रकल्प – Uttan to Virar Sea Bridge

पहिला टप्पा एकूण ५५.१२ किलोमीटर लांबीचा आहे, ज्यामध्ये सागरी मार्ग आणि रस्त्याचा समावेश आहे. यामध्ये उत्तन आणि विरार (Uttan to Virar Sea Bridge) दरम्यानचा २४.३५ किलोमीटरचा सागरी मार्ग, ९.३२ किलोमीटरचा उत्तन जोड रस्ता, २.५ किलोमीटरचा वसई जोड रस्ता आणि १८.९५ किलोमीटरचा विरार जोड रस्ता यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा खर्च ५८,७५४ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. त्यासाठी निधी उभारण्यासाठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ला परदेशी कर्जदारांकडून ४४,३३२ कोटी रुपये उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी मिटणार –

एकूण 55.12 किलोमीटरच्या या नेटवर्कमुळे वाहतूक अधिक सुसाट होईल. पर्यावरणस्नेही डिझाइनद्वारे हा सेतू बांधला जाईल, ज्यामुळे किनारपट्टीवरील प्रवास सोप्पा होईल. सध्या दक्षिण मुंबईतून विरारला जाण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते. परंतु एका हा का उत्तन ते विरार सागरी सेतू तयार झाला तर हेच अंतर अवघ्या ४५ मिनिटांवर येईल. या नवीन सागरी सेतूमुळे उत्तर उपनगरांतील कोंडी कमी होईल, आर्थिक वाढीला चालना मिळेल आणि बंदराशी जोडणीमुळे मुंबईतही व्यापार वाढण्यास आणखी मदत होणार आहे. एकूणच काय तर मुंबईसाठी हा सागरी सेतू गेमचेंजर ठरेल यात शंकाच नाही.

Helicopter Service On Mumbai Delhi Expressway : नाद खुळा!! या एक्सप्रेसवे वर सुरु झाली हेलिकॉप्टर सेवा

Helicopter Service On Mumbai Delhi Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Helicopter Service On Mumbai Delhi Expressway । भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेवर आता हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्यात आली आहे. ऐकायला जरी जे नवल वाटत असलं तरी खरं आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील पिनान शहरात एक्सप्रेसवेच्या १२५ व्या किलोमीटर अंतरावर असलेल्या विश्रांती क्षेत्रात हेलिकॉप्टर सेवा औपचारिकपणे सुरू करण्यात आली. ही सेवा भारतीय महामार्गांवर आपत्कालीन वैद्यकीय सेवा जलद आणि अधिक सुलभ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.

मुंबई आणि दिल्ली या देशातील २ महत्वाच्या शहरांना जोडणारा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे सध्या अंशतः खुला आहे आणि येत्या काळात कामे पूर्ण झाल्यानंतर तो पूर्णपणे सर्वसामान्यांच्या वापरात येणार आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा देशातील सर्वात व्यस्त आणि हाय-स्पीड मार्गांपैकी एक आहे, ज्यावरून दररोज हजारो वाहने जातात. तथापि, उच्च गतीमुळे अनेकदा गंभीर अपघात होतात. रस्ते अपघातानंतरचा पहिला तास “गोल्डन अवर” म्हणून ओळखला जातो, ज्या दरम्यान जखमी व्यक्तीला त्वरित आणि योग्य उपचार मिळाल्यास वाचण्याची सर्वाधिक शक्यता असते. जास्त वाहतुकीमुळे किंवा अपघातस्थळी पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेमुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास अनेकदा उशीर करतात. अशावेळी हि हेलिकॉप्टर सेवा रुग्णांसाठी वरदान ठरू शकते. ही हेलिकॉप्टर सेवा “बुक युअर हेलिकॉप्टर” नावाच्या कंपनीने सुरू केली आहे. Helicopter Service On Mumbai Delhi Expressway

याबाबत कंपनीचे प्रवक्ते मनीष कुमार सुनारी यांनी सांगितले की, या हेलिकॉप्टर सेवेचा प्राथमिक उद्देश अपघातग्रस्तांना घटनास्थळावरून जवळच्या मोठ्या आणि सुसज्ज रुग्णालयात पोहोचवणे आहे. ही सेवा “गोल्डन अवर” मध्ये वैद्यकीय मदत करेल, ज्यामुळे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होईल. हा उपक्रम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या देशातील एक्सप्रेसवे आंतरराष्ट्रीय मानकांवर आणण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करतो.

काय आहेत वैशिट्ये ? Helicopter Service On Mumbai Delhi Expressway

दरम्यान, 9 मार्च 2019 रोजी मुंबई ते दिल्ली एक्स्प्रेस वेच्या बांधकामास परिवहनमंत्री नितीन गडकरी, अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला होता. या एक्सप्रेसवेची एकूण लांबी १,३८६ किलोमीटर आहे. या महामार्गामुळे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तौडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, सूरत या शहरांत जाणे-येणे सोपे होईल. दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ सुमारे २४ तासांवरून केवळ १२ तासांवर येईल.लवकरच हेलिपॅड सेवेचा दुसरा टप्पा सुरू होणार असून, तो राजस्थान पर्यटन विभागाच्या सहकार्याने राबवला जाणार आहे. या टप्प्यात सरिस्का अभयारण्य, अरवली पर्वतरांगा, ऐतिहासिक किल्ले आणि प्रमुख पर्यटन स्थळे यांना जॉय राईड्स आणि एरियल टूरद्वारे जोडले जाणार आहे.

Bus Stand In Alandi : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उभारणार नवीन बस स्थानक

Bus Stand In Alandi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bus Stand In Alandi । महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. लवकरच राज्यात एक नवीन बस स्थानक उभारण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र आळंदी येथे पीएमपीचे नवीन आगार उभारले जाणार आहे. आळंदीला येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते, या भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी आळंदी येथे राज्य परिवहन महामंडळाची चार एकर जागा पीएमपीला देण्यात आली आहे.

सध्या आळंदीत ‘पीएमपी’चे आगार नाही. आळंदीत दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी छोट्या जागेत बस थांबा बांधण्यात आला.खरं तर आळंदीत दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने भाविकांच्या सोयीसाठी ‘पीएमपी’ प्रशासन गेल्या काही दिवसांपासून आगार बांधण्यासाठी जागेच्या शोधात होती. ‘पीएमपी’चे अध्यक्ष पंकज देवरे यांनी काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे जागा मिळण्यासाठी प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे वर्ग झाल्यानंतर आयुक्तांच्या माध्यमातून हा प्रस्ताव एसटी महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आला आणि एसटी महामंडळाने या पीएमपीच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बस स्थानक उभारणीचा मार्ग मोकळा झाला. Bus Stand In Alandi

तब्बल 80 बसेस थांबू शकतील- Bus Stand In Alandi

लवकरच एसटी महामंडळाची चार एकर जागा पीएमपी प्रशासनाच्या ताब्यात हस्तांतरित होणार आहे. याच जागेवर पीएमपी प्रशासनाकडून एक भव्य आगार बांधले जाणार आहे. या प्रस्तावित बस स्थानकात तब्बल 80 बसेस थांबू शकतील असं बोललं जात आहे. आळंदीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी हे बस स्थानक अतिशय महत्वाचं ठरेल.

दरम्यान, श्रीक्षेत्र आळंदी हे पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी असलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, हे तीर्थक्षेत्र संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी स्थळामुळे ओळखले जाते. हे ‘अलंकापुरी’ किंवा ‘अलंका नगरी’ म्हणूनही ओळखले जाते आणि वारकरी संप्रदायाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. येथे ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर असून, हे एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठे बदल; आजचे भाव इथे चेक करा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Price Today । भारतीय सराफा बाजारात सोने- चांदीच्या किमतीत गगनाला भिडलेल्या आहेत. सोने- चांदी खरेदी करणे हे सर्वसामान्य जनतेच्या तर आवाक्याबाहेरच आहे. आज २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सोने- चांदीच्या किमतीत मोठी उलथापालथ बघायला मिळाली आहे. भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 125338 रुपयांवर पोचला असून यामध्ये तब्बल 1484 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीनेही नवा उच्चांक गाठला आहे. १ किलो चांदीचा दर १६७००० रुपयांवर गेला आहे. सोने- चांदीच्या किमतीत दररोज बदल पाहायला मिळतात. आता सोन्याचांदीच्या किमती वाढल्याने खरेदीदार ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX वर आज २५ नोव्हेंबर २०२५ रोजी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा (Gold Price Today) व्यापार १२४९०० रुपयांवर उघडला मार्केट सुरु होताच सोन्याचा भाव (Gold Rate Today) सुरुवातीपासून वर वर जाताना दिसला. ११ वाजून ३९ मिनीटांनी सोन्याने १२५५१६ रुपयांचा उच्चांकी आकडा गाठला. त्यानंतर या किमतीत काहीशी घसरण बघायला मिळाली. सध्या १२ वाजून ५७ मिनिटांनी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याची किंमत १२५३१७ रुपयांवर व्यवहार करत आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 116450 रुपये
मुंबई – 116450 रुपये
नागपूर – 116450 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 127040 रूपये
मुंबई – 127040 रूपये
नागपूर – 127040 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.

धन्यासारखा नीच माणूस पृथ्वीतलावर नाही; जरांगेंचा निशाणा

manoj jarange patil dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून सध्या तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडची आठवण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला वाल्मिक कराडची उणीव भासत असेल तर त्या धन्या इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही अशी जळजळीत टीका जरांगे पाटील यांनी केली. तसेच अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडले पाहिजे असं म्हणत अजित पवारांनाही टोला लगावला.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?

प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे काय म्हणले ते मी नीट ऐकलं नाही, पण ते असे काही बोलले असतील तर त्यांच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर त्या धन्या इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर दुसरा कोणी असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा सोयरा असो. जर त्याने वाईट कृत्य केले असेल तर त्याचे कधीच समर्थन करायचे नाही. आता तरी अजित पवार यांचे डोळे उघडले तर बरं होईल. अशा माणसांना किती दिवस पाठीशी घालायचं ते अजित पवार आणि फडणवीस यांच्या लक्षात यायला पाहिजे. शब्दातून का होईना पण हे समोर आलं कि त्यांना वाल्मिक कराडची आठवण येतेय.

गुंडगिरी करणे, भ्रष्टाचार करणे, लोकांच्या जमिनी हड्पणे, किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणे, समाजातील काही लोकांना गुन्हेगारीकडे वळवून त्याच्यातून फक्त पैसे कमवायचे, कोणालाही ब्लॅकमेल करायचे आणि काळा पैसा उभा करायचा इतकं भयंकर पाप तो करत होता. धनंजय मुंडे हे गुंडगिरीमधून राजकारण उभं करत होते, असा माणूस अजिबात चांगला नाही. इथून पुढे तरी लोकांनी डोळे उघडले पाहिजे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडलं.

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले होते?

जगमित्र कार्यालयातून गोरगरिबांची सेवा करत आलो, गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून हे कार्यालय सुरू आहे, काम सुरू आहे. पण आज एक व्यक्ती आपल्यासोबत नाही, याची जाणीवही होते. काय चुकले, काय नाही, ते न्यायालय बघेल, पण ती जाणीव नक्कीच आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढली होती.