Thursday, January 1, 2026
Home Blog Page 330

Jio चा धमाकेदार रिचार्ज; 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून जिओकडे पाहिले जाते. हि कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी नवनवीन प्लॅन घेऊन येत असते. त्याचप्रमाणे आताही जिओने एका फायदेशीर प्लॅनची घोषणा केली आहे. ग्राहकांनाच्या गरजा लक्षात घेऊन हा प्लॅन बनवण्यात आला आहे. जर तुम्हाला जास्त व्हॅलिडिटीसह जिओचा प्लॅन हवा असेल, तर 90 दिवस व 200 दिवस व्हॅलिडिटीसह नवीन प्लॅन चांगला पर्याय ठरू शकतो. तर चला जाणून घेऊयात या फायदेशीर प्लॅनबदल अधिक माहिती.

जिओच्या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी –

899 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 90 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे . या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि 100 एसएमएस मोफत दिले जातात. याशिवाय 20GB अतिरिक्त डेटा भेटणार आहे. म्हणजेच एकूण 200GB डेटा उपलब्ध आहे. तसेच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळते. दररोजचा डेटा संपल्यानंतरही इंटरनेट स्पीड 64kbps ने कमी होणार आहे. पण इंटरनेट सुरु राहील. याचसोबत JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud यासारख्या जिओच्या अँपचा फायदा ग्राहकांना मिळेल. या प्लॅनची दिवसाला सरासरी किंमत फक्त 10 रुपये आहे. त्यामुळे हा प्लॅन ग्राहकांना परवडण्याजोगा आहे.

2025 रुपयांचा न्यू ईयर वेलकम प्लॅन –

नवीन वर्षानिमित्त जिओने खास न्यू ईयर वेलकम प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत 2025 रुपये असून याला 200 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. दररोज 2.5GB 4G डेटा, अनलिमिटेड 5G डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस या सर्व सुविधांचा ग्राहकांना मिळणार आहेत. यासोबत ग्राहकांना 2025 रुपयांपर्यंतच्या पार्टनर बेनिफिट्स मिळतील. या प्लॅनची दिवसाला किंमतही फक्त 10 रुपये असल्यामुळे ग्राहकांसाठी हा बजेटमध्ये मिळणार आहे.त्यामुळे जिओचे हे नवीन प्लॅन्स ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहेत.

Weather Update | ऐन हिवाळ्यात पुन्हा राज्यात कोसळणार पाऊस; हवामान विभागाने दिला इशारा

Weather Update

Weather Update | संपूर्ण राज्यामध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उद्या म्हणजे 21 डिसेंबर रोजी राज्यातील 4 ते पाच 5 जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील कांद्याची काढणी चालू झालेली आहे. तसेच रब्बी हंगामातील कांद्याची लागवड करण्याच्या शेतकरी तयारीत आहे. अशातच आता हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. हा पाऊस झाला तर शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहे.

भारतीय हवामान विभागाला दिलेल्या अंदाजानुसार आज म्हणजेच 20 डिसेंबर रोजी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथाच्या परिसरावर पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तसेच पुण्याच्या वेधशाळेने देखील पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामुळे उद्या राज्यातील जवळपास चार ते पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. 20 डिसेंबर रोजी कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे आज 20 तारखेला पुण्यामध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेत पिकाचे नियोजन शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेऊनच करावे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 21 तारखेनंतर पाऊस सुरू होणार आहे. 21 ते 26 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो. असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केलेला आहे.

यंदाच्या हिवाळ्यात पुण्याजवळील या ठिकाणांना द्या भेट; मिळेल मनमोहक अनुभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळा चालू झालेला आहे. हिवाळ्यात अनेक लोक फॅमिली तसेच मित्रांसोबत फिर्याला जाण्याचा प्लॅन करता असतात. जर तुम्ही या हिवाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर आजही ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण आज आम्ही हिवाळ्यात पुण्याजवळील फिरण्याची काही ठिकाणे सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्ही एका दिवसात देखील जाऊन येऊ शकता. तुमचा जास्त खर्च देखील होणार नाही आणि तुम्हाला निसर्गाचा आनंद देखील घेऊ शकता.

लोणावळा

पुण्याजवळील हिवाळ्यात फिरण्याचे लोकप्रिय ठिकाण म्हणजे लोणावळा. लोणावळा हे महाराष्ट्रातील एक छोटेसे हिल स्टेशन आहे. टेकड्या, धबधबे आणि आश्चर्यकारक पॉइंट्स एक दिवसाच्या सुट्टीसाठी हिट करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण बनवतात. जर तुम्हाला रोमांच आवडत असतील, तर तुम्हाला हायकिंग आणि चालणे आणि मोहक धबधब्यांच्या स्त्रोतांपर्यंत ट्रेकिंग करायला आवडेल.

लवासा

कारने पुण्याजवळील लोकप्रिय रोड ट्रिपपैकी आणखी एक ठिकाण म्हणजे लवासा. लवासा हे पुण्याजवळचे पहिले कृत्रिम हिल स्टेशन आहे. तुम्हाला येथील आकर्षक लँडस्केप आणि मनमोहक हिरवळ नक्कीच आवडेल. इतकेच काय, तुमची वाट पाहत असलेले वॉटर पार्क आणि साहसी उपक्रम हे अजिबात चुकवता कामा नये. दोन सहली, कौटुंबिक सुट्ट्या किंवा मित्रांसह मौजमजेसाठी या ठिकाणाची शिफारस केली जाते.

कामशेत

या वर्षी आपल्या हिवाळ्याचा आनंद घ्यायचा आहे का? कामशेतकडे प्रयाण करा, पुण्याहून भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक. तुमचे मनोरंजन करण्यासाठी साहसी क्रियाकलाप पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी हे ठिकाण काही आश्चर्यकारक ठिकाणे देते. त्यामुळे या हिवाळ्यात तुम्ही नक्की कामशेतला भेट द्या.

माथेरान

हे पुन्हा पुण्याजवळील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे तुम्हाला आराम आणि टवटवीत करण्यास मदत करेल आणि अगदी शांत सेटअपमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करेल. हे खरे तर नदी आणि धरणाने बनवलेले मानवनिर्मित तलाव आहे ज्यावरून या ठिकाणाचे नाव पडले. हे ठिकाण निसर्गाने वेढलेले आहे.

मुळशी धरण

मुळा नदीवरील मुळशी धरण येथे असलेल्या कॅफेटेरिया आणि रेस्टॉरंट्सचा आनंद घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी एक शांत ठिकाण देते. आणि हिवाळ्यात, तुम्ही लांब फिरायला जाण्यापूर्वी कॅफेमध्ये ताजेतवाने कॉफी पिण्यासाठी मुळशीचे हवामान पूर्णपणे योग्य असते.

ताम्हिणी घाटात धोकादायक वळणावर बसचा भीषण अपघात; 5 लोक जागीच ठार

Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दररोज कितीतरी अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. अशातच आता एक भयानक अपघाताची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे ताम्हिणी घाटाजवळ एक भयंकर अपघात झालेला आहे. धोकादायक वळणावर बस दरीत कोसळून हा अपघात झालेला आहे. ताम्हिणी घाटामध्ये अनेक धोकादायक अशी वळणे आहेत. या रस्त्यावरच बस दरीमध्ये कोसळली आहे. या अपघातात जवळपास 12 ते 13 प्रवास गंभीर जखमी झालेले आहेत. ही बस चाकण येथून महाडला लग्नासाठी जात होती. शुक्रवारी म्हणजेच 20 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे. या बसमध्ये एकूण 40 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

या बस अपघातात एकूण 5 लोकांचा मृत्यू झालेले आहेत. यातील तीन महिला आणि दोन पुरुषांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेले आहे. तर अजूनही दोन मृतदेह हे बसमध्ये अडकलेले आहे. त्याचप्रमाणे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या ठिकाणाच्या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. तसेच रेस्क्यू टीम आणि वैद्यकीय मदत देखील घटनास्थळी पोहोचलेली आहे. जखमींना लवकरात लवकर उपचार मिळावे, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न देखील चालू झालेले आहेत.

ताम्हिणी घाट धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो. या भागात रस्त्याची अवस्था देखील तितकीशी चांगली नाही. त्यामुळे या भागात अनेक वेळा अपघात घडत असतात. परंतु आत्ता झालेल्या अपघाताचे कारण अजूनही नीट स्पष्ट झालेले नाही. परंतु स्थानिक प्रशासन या अपघाता मागचे कारण शोधून बचाव कार्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे.

जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताचं खरं कारण समोर; रिपोर्टमध्ये नेमकं काय ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीन वर्षांपूर्वी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत , तसेच त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 12 लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला होता. हि घटना तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ घडली होती. 8 डिसेंबर 2021 च्या या दुर्घटनेचा अहवाल आता संसदेत सादर केला आहे. संरक्षण विषयक स्थायी समितीने सादर केलेल्या या अहवालानुसार, मानवी चुकांमुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दुर्घटनेमुळे देशात खळबळ –

भारतीय वायुसेनेचे Mi-17V5 हेलिकॉप्टर कोईंबतूरच्या सुलूर हवाई तळावरून वेलिंग्टनमधील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाकडे निघाले होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर डोंगरावर कोसळले. या अपघातात शौर्य चक्र विजेते ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे सुरुवातीला जिवंत राहिले होते, परंतु आठवडाभरानंतर त्यांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे देशात खळबळ उडाली होती.

विमान अपघातांची नोंदणी –

संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालात , 13 व्या संरक्षण योजनेच्या काळात भारतीय वायुसेनेच्या 34 विमान अपघातांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 33 वा अपघात जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरचा होता. यामध्ये मानवी चूक हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले आहे . या सर्व अपघातांची चौकशी पूर्ण झाली असून यासाठी योग्य ती पावले उचलण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

भारतीय लष्करातील एक महत्त्वाचे नेतृत्व –

जनरल बिपीन रावत हे भारतीय लष्करातील एक महत्त्वाचे नेतृत्व होते. देशाचे पहिले सीडीएस म्हणून त्यांनी तीन सैन्यदलांमध्ये समन्वय साधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा अकस्मात मृत्यू देशासाठी मोठा धक्का ठरला. त्यांनी लष्करात अनेक सुधारणा केल्या , त्यामुळे ते आजच्या युवा पिढीमध्ये आदर्श ठरले आहेत. त्यामुळे सरकारकडून या अपघातानंतर सुरक्षाविषयक उपाययोजनांवर अधिक भर देण्यात येत आहे.

67 वर्षीय महिला डेटिंग स्कॅमची बळी, 7 वर्षांत गमावले 4 कोटी रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऑनलाइन डेटिंग आणि अफेअरच्या बातम्या आता कॉमन झाल्या आहेत. अशातच आता मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये एक 67 वर्षीय महिला प्रेमाच्या जाळ्यात वाईटरित्या अडकली. महिला फेसबुकच्या प्रेमात पडली होती आणि सात वर्षांपासून सतत त्याच्या संपर्कात होती. मात्र ती महिला त्या व्यक्तीला कधीच भेटली नव्हती. महिलेला न भेटल्यानंतरही तिने त्या पुरुषावर इतके प्रेम केले की तिने त्याला 7 वर्षात 2.2 मिलियन MYR म्हणजेच अंदाजे 4.4 कोटी रुपये दिले. सीसीआयचे (व्यावसायिक गुन्हे अन्वेषण विभाग) संचालक दातुक सेरी रामली मोहम्मद युसूफ यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.

ऑक्टोबर 2017 मध्ये पीडित महिलेने फेसबुकवर घोटाळेबाजाशी संपर्क साधला होता. त्यावेळी, घोटाळेबाजाने स्वत:ची ओळख अमेरिकन व्यापारी म्हणून करून दिली जो सिंगापूरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीमध्ये गुंतला होता. महिनाभरात त्यांनी महिलेचा विश्वास जिंकला. आपण आर्थिक संकटातून जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्या आधारे त्याने महिलेकडून वाहतुकीच्या नावावर ५ हजार रुपये मागितले होते.

कुटुंब आणि मित्रांकडून कर्ज घेतले

जसजसा वेळ निघून गेला, घोटाळेबाजाने महिलेला आर्थिक समस्या आणि विविध व्यवसायांशी संबंधित संकटांबद्दल सांगितले. त्याला मदत करण्यासाठी, पीडितेने गेल्या काही वर्षांत 50 वेगवेगळ्या खात्यांमध्ये 306 बँक व्यवहार केले, ज्यामुळे RM2,210,692.60 चे नुकसान झाले. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्याने सर्व पैसे मित्र आणि कुटुंबीयांकडून उसने घेतले होते. तर पीडिता कधीही व्हिडिओ कॉलवर किंवा समोरासमोर भेटली नव्हती.

पीडित आणि घोटाळेबाज एकमेकांशी फक्त व्हॉईस कॉलवर बोलत होते. नोव्हेंबर महिन्यात या महिलेने सर्व हकीकत एका मैत्रिणीला सांगितली ज्याने तिला आपली फसवणूक होत असल्याची जाणीव करून दिली. या संपूर्ण घटनेची माहिती देताना सीसीआयडी संचालकांनी अशा ऑनलाइन संबंधांमध्ये सावधगिरी बाळगून अशा फसवणुकीत अडकू नये, असे आवाहन केले.

Google Chrome वापरकर्त्यांसाठी सरकारने दिला मोठा इशारा! तातडीने करा हे काम

Google Chrome

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजेच CERT-In ने भारतातील Google Chrome वापरकर्त्यांना उच्च जोखमीची चेतावणी दिली आहे. असे सांगण्यात आले आहे की ब्राउझरच्या डेस्कटॉप आवृत्तीमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांचा डेटा आणि सिस्टम स्थिरतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या दोषांचा वापर करून, हॅकर्स तुमची प्रणाली नियंत्रित करू शकतात. हॅकर्स धोकादायक कोड चालवू शकतात किंवा तुमचे डिव्हाइस क्रॅश देखील करू शकतात. या भेद्यता 131.0.6778.139 आणि 131.0.6778.108 पूर्वी रिलीज झालेल्या Windows, macOS आणि Linux साठी Chrome च्या आवृत्त्यांवर परिणाम करतात.

धोका काय आहे?

Google Chrome मध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. यामध्ये ब्राउझरच्या V8 इंजिनमध्ये “टाईप कन्फ्युजन” समाविष्ट आहे आणि त्याच्या भाषांतर वैशिष्ट्यामध्ये एक बग देखील आढळला आहे. हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेऊन हानीकारक कोड दूरस्थपणे संपादित करू शकतात किंवा डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DoS) हल्ला करू शकतात. यामुळे तुमची सिस्टीम क्रॅश होऊ शकते.

कोणत्या वापरकर्त्यांना धोका आहे?

डेस्कटॉपवर Google Chrome ची जुनी आवृत्ती वापरत असलेले कोणीही – Windows, macOS किंवा Linux – सध्या खूप धोक्यात आहे. 131.0.6778.139 किंवा 131.0.6778.108 पेक्षा पूर्वीच्या ब्राउझर आवृत्त्या असलेले लोक देखील धोक्यात आहेत.

तुम्ही स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकता?

CERT-In ने सर्व वापरकर्त्यांना शक्य तितक्या लवकर त्यांचे ब्राउझर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी गुगलने आधीच एक पॅच जारी केला आहे. हे अपडेट पूर्ण करण्यासाठी तुम्ही या प्रक्रियेचे अनुसरण करू शकता.

प्रथम Google Chrome ब्राउझर उघडा
नंतर वरच्या उजव्या कोपर्यात जा आणि मेनूवर क्लिक करा
यानंतर मदत विभागात जा, त्यानंतर Chrome बद्दल तपासा
यानंतर ब्राउझर अपडेट तपासेल आणि अपडेट इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही ते पुन्हा लॉन्च करू शकता.

SBI मध्ये मोठी भरती ; तब्बल 13735 रिक्त जागांची जाहिरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना बँकिंग क्षेत्रात आपलं करियर करायचं असेल त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदांसाठी 13735 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. तरी जे या पोस्टसाठी पात्र असतील त्या उमेदवारांना 17 डिसेंबर 2024 पासून 7 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तर चला जाणून घेऊयात यासाठी कोण पात्र असतील आणि किती शुल्क आकारले जाणार आहे.

एकूण 13735 रिक्त जागांची जाहिरात –

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने कनिष्ठ सहयोगी पदांसाठी एकूण 13735 रिक्त जागा जाहीर केल्या असून , यामध्ये सर्वाधिक 5870 पदे सर्वसाधारण श्रेणीसाठी राखीव आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता (EWS) 1361 पदे, इतर मागासवर्ग (OBC) साठी 3001 पदे, अनुसूचित जाती (SC) साठी 2118 पदे, आणि अनुसूचित जमाती (ST) साठी 1385 पदे उपलब्ध आहेत. ही भरती प्रक्रिया विविध श्रेणीतील उमेदवारांसाठी बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी आहे.

पात्रता आणि वयोमर्यादा –

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कनिष्ठ सहयोगी पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वय 20 ते 28 वर्षांदरम्यान असावे. त्यामध्ये वयोमर्यादेची गणना 1 एप्रिल 2024 पासून करण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांनी आपली पात्रता आणि वयोमर्यादा तपासून अर्ज करणे आवश्यक आहे.

परीक्षा दोन टप्प्यांत होणार –

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरती प्रक्रियेत परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे. प्राथमिक परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये, तर मुख्य परीक्षा मार्च किंवा एप्रिल 2025 मध्ये आयोजित केली जाईल. मुख्य परीक्षेनंतर उमेदवारांना स्थानिक भाषेतील भाषा प्राविण्य चाचणी द्यावी लागेल, ज्यामध्ये स्थानिक भाषेतील कौशल्य सिद्ध करणे बंधनकारक असणार आहे . अर्ज शुल्काच्या बाबतीत, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी 750 रु तर SC, ST आणि PWD श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज –

उमेदवारांना SBI च्या अधिकृत वेबसाइटवर sbi.co.in जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख बघून लवकर अर्ज करावा. तुमच्यासाठी हि भरती प्रक्रिया चांगला पर्याय ठरू शकते.

कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी अभिनव प्रयोग

मानसी जोशी

हवामान बदल आणि निसर्गाच्या बदलत्या चक्राचा शेतीवर परिणाम होत असतानाही महाराष्ट्रातील काही संस्था, तसेच शेतकरी मात्र त्यावर मात करून वैविध्यपूर्ण प्रयोग करताना दिसत आहेत. लोकसहभागातून, तसेच वैयक्तिक पातळीवरील प्रयत्नातून शेती वाचवण्यासाठी, त्याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करत आहे. त्यांच्या या कामातून विपरीत परिस्थितीतही शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होत आहे. अशाच काही संस्था तसेच लोकांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सोयासंजीवनी


सध्या निवृत्त झालेले वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. बी.पी. पाटील हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सोया संजीवनी नावाचा प्रकल्प राबवत आहेत. त्यांनी सोयाबीनच्या विविध वाणांचा अभ्यास करून शेतकऱ्यांसाठी खास नैसर्गिक पध्दतीने फवारणी करणारी द्रव्याची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाला पुण्याच्या IRDAI या संस्थेने आर्थिक सहाय्य केले आहे. यामध्ये १५० शेतकरी सहभागी झाले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उत्पादन २ ते ४ क्विंटलने वाढले.

धुळे जिल्ह्याचा कायापालट करणारा अवलिया


नुकताच राज्य शासनाने धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावातील चैत्राम पवार यांना वनभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. त्यांनी जंगल, जल, जमीन, जनावर आणि जन या पंचसूत्रीवर आधारित जनजागृती मोहीम हाती घेऊन आपल्या गावाचा कायापालट केला. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी वनखात्याच्या ओसाड जमिनीचे हिरवाईत रुपांतर केले. वनवासी कल्याण आश्रमासोबत त्यांनी देशातील शाळांमध्ये जाऊन वन संवर्धनासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण केली आहे.

युवा परिवर्तनचे उल्लेखनीय काम –


युवा परिवर्तन या सामाजिक संस्थेतर्फे महिला तसेच गरजू मुलांना स्किल ट्रेनिंग कोर्स शिकवले जातात. महाराष्ट्रातील पालघर, गडचिरोली या जिल्ह्यात स्किल ट्रेनिंग देत असताना त्यांनी वाडा तालुक्यातील ५० गावांमध्ये पावसाचे पाणी जमिनीत कसे मुरवावे, याचबरोबर सौरउर्जेचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. पालघरमधील सोनाळे गावात वाहणाऱ्या नदीला पावसात चांगले पाणी असायचे. मात्र, उन्हाळ्यात हीच नदी कोरडी झाल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागायचे. गुरांना तसेच बाकीच्या इतर कामांना पाणी मिळायचे नाही. यावर उपाय म्हणून तीन महिन्यापूर्वी गावकऱ्यांच्या श्रमदानातून नदीवर बांध बांधून पाणी अडवले. तसेच गावकऱ्यांना पाणी कसे वाचवायचे याबद्दलही सांगितले. यातून पावसाळ्यात हे छोटे तलाव भरून गेले. या भागातील भूजल पातळीही यातून वाढली.

कांद्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण; बळीराजा चिंतेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही महिन्यापासून कांद्याचे दर गगनाला भिडले होते. पण या 15 दिवसांत कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण दिसून आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत. याआधी कांद्याला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी बक्कळ नफा मिळवला होता. पण या घसरणीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. हि परिस्थिती निर्माण होण्यामागे काही कारणे आहेत ते आज आपण पाहणार आहोत.

कांद्याच्या दरात मोठी घसरण –

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत सध्या कांद्याला सरासरी 1900 रुपये दर मिळत आहे, तर जास्तीत जास्त दर 2800 रुपयांवर स्थिरावला आहे. तसेच काही आठवड्यांपूर्वी कांद्याचे दर 5000 ते 6000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. किरकोळ बाजारात कांदा 60 ते 80 रुपये प्रतिकिलो विकला जात होता. पण अचानक दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.

कांद्याचे दर कमी होण्याची कारणे –

कांद्याचे दर अचानक घसरण्याची अनेक कारणे समोर आली आहेत. त्यामध्ये देशांतर्गत बाजारात वाढलेली कांद्याची मोठ्या प्रमाणातील आवक हे एक महत्वाचे कारण आहे. त्याचसोबत केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले 20% निर्यात शुल्कदेखील मोठा अडथळा ठरत आहे. निर्यात अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील मागणीचा फायदा मिळत नाही. त्यामुळे याचा परिमाण कांद्याच्या दरावर दिसून येत आहे.

शेतकऱ्यांची मागणी –

शेतकरी संघटनांनी कांद्यावरील निर्यात शुल्क तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. यामुळे कांद्याला परदेशी बाजारपेठ मिळून दर सुधारतील, नाहीतर शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. यासाठी सरकारने निर्यात शुल्काचा फेरविचार करून कांद्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.