Thursday, January 1, 2026
Home Blog Page 331

2024 मधील 5 सर्वात वादग्रस्त चित्रपट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपट सुष्टीमध्ये मनोरंजनासोबतच काही महत्वाचे विषय चर्चेत आले आहेत. या चर्चेच्या विषयामुळे अनेक चित्रपट जबरदस्त गाजले , तर काही गाजले नाहीत. तसेच अनेक चित्रपट काही कारणास्तव वादाचा जाळ्यात सापडले. यामागे बरीच कारणे असून, काही चित्रपटांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात केला, त्यामुळे अनेक लोक नाराज झाले . तर काहींनी सत्यकथांना इतके बदलले की त्या कथांमधील वास्तविक व्यक्तींना वगळल्यासारखे वाटले. त्यामुळे तुम्हाला जर असे चित्रपट माहित नसतील तर आज आम्ही तुम्हाला 2024 मधील सर्वात वादग्रस्त चित्रपटांची माहिती सांगणार आहोत.

लेट नाईट विथ द डेव्हिल –

या चित्रपटात एआय-जनरेटेड आर्टचा (generated visuals) वापर मोठ्याप्रमाणात केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे . चित्रपटाच्या निर्मितीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर हा हॉलीवूडमधील कामगारांच्या भविष्यावर परिणाम करू शकतो, अशी टीका अनेकांनी केली आहे. तसेच एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केलेल्या दृश्यांवर लोकांनी आक्षेप घेतला. यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच निर्माता आणि कलाकारांना स्पष्टिकरण द्यावे लागले.

सिव्हिल वॉर –

निवडणुकीच्या वर्षात असा अतिक्रमण करणारा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या गरजेबद्दल चर्चा सुरू झाली. या चित्रपटामुळे लोकांना लोकांविरुद्ध हिंसाचार करण्यास प्रेरित करू शकते आणि विषारी राजकीय वातावरणात सिव्हिल वॉर ही संकल्पना अप्रिय मानली जाऊ शकते अशी चिंता व्यक्त केली गेली. तसेच हा चित्रपट अमेरिकेवर भाष्य करण्यासाठी नव्हता, तर आधुनिक जगातील लोकांमधील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या दुराव्यावर होता अशी टीका केली गेली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले .

मॅडम वेब –

सोनी पिक्चर्सच्या या सुपरहिरो चित्रपटावर आधीच टीका होत होती. त्यातच मुख्य अभिनेत्री डकोटा जॉन्सनच्या मुलाखतींतील विवादास्पद विधानांनी चित्रपटावर वाद वाढवला. या कॉमिक बुक चित्रपटाच्या संवादांवरून वाद निर्माण झाले. तर खराब पटकथा आणि फॅन-सर्विस यामुळे चित्रपटाला टिकेचा सामना करावा लागला.

कुंग फू पांडा 4 –

या ॲनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवले, पण त्याचवेळी ड्रीमवर्क्स ॲनिमेशन स्टुडिओने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, ज्यामुळे प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये संताप पसरला. यामुळे चित्रपट निर्मिती क्षेत्रातील अन्यायावर जोरदार टीका झाली .

आर्थर द किंग –

मायकेल लाइट आणि आर्थर कुत्र्याच्या सत्यकथेत इक्वाडोरची पार्श्वभूमी बदलून डोमिनिकन रिपब्लिक दाखवल्याने वाद निर्माण झाला. इक्वाडोरच्या नागरिकांनी या बदलावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हे चित्रपट त्यांच्या वादग्रस्त निर्णयांमुळे 2024 मधील चर्चेचा विषय ठरले.

पुणेकरांसाठी खुशखबर !! बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानकाला मंजुरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात बरीच वर्दळ असून ,यामुळे लोकांना वाहतूक कोंडीच्या समस्यला सामोरे जावे लागते. हि समस्या सोडवण्यासाठी स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित मेट्रो मार्गासंबंधात एक बातमी समोर आली आहे. या महत्वाच्या मार्गावर आता बालाजीनगर येथे भारती विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ एक नवीन स्थानक तयार होणार आल्याचे सांगण्यात आले आहे. या विस्तारित मेट्रो मार्गाची लांबी 5.65 किलोमीटर असून, सुरुवातीला मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज अशी तीन स्थानके प्रस्तावित होती. पण लोकप्रतिनिधी व स्थानिकांच्या मागणीनुसार बालाजीनगर येथे हे चौथे स्थानक समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या वाहतूक कोंडीच्या समस्या दूर होणार आहेत.

विविध स्थानकांमधील निश्चित अंतर जाहीर –

महा मेट्रोने पुणे शहरातील विविध स्थानकांमधील निश्चित अंतर जाहीर केले आहे. स्वारगेट स्थानकापासून मार्केट यार्ड पर्यंतचे अंतर 1.31 किलोमीटर आहे. त्यानंतर मार्केट यार्ड ते पद्मावती स्थानकातील अंतर 2.11 किलोमीटर आहे. पद्मावती ते बालाजीनगर स्थानकाच्या दरम्यानचे अंतर 1.23 किलोमीटर आहे. आणि शेवटी बालाजीनगर ते कात्रज स्थानकापर्यंतचे अंतर 1 किलोमीटर आहे. या मेट्रो मार्गाने शहरातील प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे.

मेट्रो मार्गासाठी किती खर्च –

या विस्तारित मेट्रो मार्गासाठी अंदाजे 2954 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण नव्याने स्थापित बालाजीनगर स्थानकाचा खर्च यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. या स्थानकाच्या खर्चाचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रवास अधिक वेगवान होणार –

स्वारगेट-कात्रज हा मेट्रो मार्ग पूर्णपणे भूमिगत असणार आहे. सध्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण सुरू असून, प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास अधिक वेगवान होणार आहे . स्थानिक नागरिकांनी या मेट्रो प्रकल्पाचे स्वागत केले असून, त्याचा परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. तसेच महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, स्थानकांमधील अंतरानुसार दर निश्चित केले जातील. या मार्गामुळे स्वारगेट ते कात्रज दरम्यानचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.

Top researchers in 2024 | 2024 मध्ये ‘या’ शास्त्रज्ञांनी केली मोठी कामगिरी; विविध क्षेत्रात केले संशोधन

Top researchers in 2024

Top researchers in 2024 | 2024 या वर्षात भारत वैज्ञानिक संशोधन आणि नवकल्पनांचे पॉवरहाऊस म्हणून उदयास आले आहे. 2024 ची स्टॅनफोर्ड/एलसेव्हियर टॉप 2% यादी विविध क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञांच्या उल्लेखनीय योगदानाचे प्रदर्शन करते. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या जगातील टॉप 2% शास्त्रज्ञांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या शास्त्रज्ञानी या वर्षात योगदान दिले आणि हे आज आपण जाणून घेणार आहोत.

हरीश गर्ग

डॉ. हरीश गर्ग यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इमेज प्रोसेसिंगमधील कामामुळे त्यांना भारताच्या तांत्रिक क्रांतीमध्ये आघाडीवर ठेवण्यात आले आहे. त्यांचे संशोधन विविध क्षेत्रातील एआय ऍप्लिकेशन्सच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

अशोक पांडे

डॉ. अशोक पांडे यांनी बायोटेक्नॉलॉजीमध्ये, विशेषतः बायोप्रोसेस अभियांत्रिकी आणि औद्योगिक जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध उद्योगांसाठी शाश्वत उपाय विकसित करण्यात त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे.

रफत सिद्दिकी

प्रोफेसर रफत सिद्दीकी यांचे शाश्वत बांधकाम साहित्य आणि बांधकामातील कचरा व्यवस्थापनातील संशोधन पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींना पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे.

परवेझ अहमद

डॉ. परवेझ अहमद यांचे वनस्पती जीवशास्त्रातील कार्य, विशेषत: पर्यावरणीय ताणांना वनस्पतींचे प्रतिसाद समजून घेणे, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर लवचिक पिके विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

इम्रान अली

प्रोफेसर इम्रान अली यांचे विश्लेषणात्मक रसायनशास्त्रातील योगदान, विशेषत: पर्यावरणीय विश्लेषणासाठी नवीन पद्धती विकसित करण्यात, प्रदूषण निरीक्षण आणि नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण परिणाम आहेत.

रविपुडी व्यंकट राव

डॉ. रविपुडी व्यंकट राव यांचे प्रगत उत्पादन प्रक्रिया आणि ऑप्टिमायझेशन तंत्रातील संशोधन औद्योगिक कार्यक्षमता आणि उत्पादन गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे.

गौतम आर. देसीराजू

क्रिस्टल अभियांत्रिकीतील प्रणेते प्राध्यापक गौतम आर. देसीराजू यांनी सुप्रामोलेक्युलर केमिस्ट्री आणि मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

विनोद के. गुप्ता

क्रिस्टल अभियांत्रिकीतील प्रणेते प्राध्यापक गौतम आर. देसीराजू यांनी सुप्रामोलेक्युलर केमिस्ट्री आणि मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

अविरल कुमार तिवारी

प्रोफेसर अविरल कुमार तिवारी यांचे अर्थशास्त्रातील संशोधन, ऊर्जा अर्थशास्त्र आणि वित्तीय बाजारांवर लक्ष केंद्रित करून, धोरणकर्ते आणि व्यावसायिक नेत्यांना मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते.

पी. सेंथिल कुमार

डॉ. पी. सेंथिल कुमार यांचे पर्यावरण विज्ञान, विशेषत: जल प्रक्रिया आणि कचरा व्यवस्थापनातील कार्य भारताच्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

Top 5 Hindi movies of 2024 | 2024 मध्ये या हिंदी चित्रपटांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य; जाणून घ्या यादी

Top 5 Hindi movies of 2024

Top 5 Hindi movies of 2024 | दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. बॉलीवूड असो की साऊथ सिनेसृष्टी, दोन्ही फिल्म इंडस्ट्रीने या वर्षात आतापर्यंत लोकांना अनेक उत्तम चित्रपट भेट दिले आहेत. काही चित्रपट असे होते ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि काही फ्लॉपही झाले. मात्र, हिट आणि फ्लॉपच्या या खेळात असे काही चित्रपट होते ज्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले.

महाराजा | Top 5 Hindi movies of 2024

या यादीतील पहिला चित्रपट म्हणजे ‘महाराजा’, जो आजकाल खूप चर्चेत आहे. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता चित्रपट OTT वर आले आहे.

लापता लेडीज

आमिर खान निर्मित ‘लापता लेडीज’ या चित्रपटालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात स्पर्श श्रीवास्तव आणि प्रतिभा रंता सारखे नवीन स्टार्स दिसले. या चित्रातील साधेपणाने लोकांची मने जिंकली. आमिरची माजी पत्नी किरण राव या चित्राची दिग्दर्शक आहे.

कल्की 2898 AD

नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 AD’ या चित्रपटाला लोकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण कमाईच्या बाबतीत इतिहास रचला. प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन स्टारर चित्रपटाने अवघ्या 15 दिवसांत जगभरात 1000 कोटींची कमाई केली.

    फायटर

    हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर या वर्षात चांगले बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केले. त्याचे कलेक्शन 212.15 कोटी रुपये होते.

    शैतान | Top 5 Hindi movies of 2024

    अजय देवगणचा शैतान हा चित्रपटही चांगली कमाई करण्यात यशस्वी ठरला होता. अजयच्या शैतानचे भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन 150 कोटी रुपये होते.

    तेरी बातों में ऐसा उलझा जिया

    तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीझ झाला. चित्रपटात रोबोट आणि मानवाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली. या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनन हे मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांना हा चित्रपट देखील खूप जास्त आवडला आहे.

    2024 या वर्षात ही 3 गाणी ठरली सुपरहिट

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गाण्याच्या प्रभावामुळेच चित्रपट पाहण्याचा उत्साह वाढत असतो . त्यामुळे असं म्हणता येईल कि , 2024 वर्ष लोकांसाठी अतिशय संगीतमय ठरले आहे. याच वर्षात बऱ्याच बॉलिवूड गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेक गाण्यांनी तर लोकांच्या मनाला भुरळ घातली असून , ज्याच्या त्याच्या तोंडावर या गाण्यांची चर्चा होताना दिसत आहे. या बॉलिवूडच्या टॉप हिट गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव टाकण्यासोबतच सोशल मीडियावर जोरदार चर्चेची ठरली आहेत . तर चला 2024 या वर्षात प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणाऱ्या गाण्याची माहिती पाहुयात.

    तौबा तौबा –

    बॅड न्यूज या हिंदी चित्रपटातील हे सुपर हिट गाणं , करण औजला यांनी लिहिले आणि गायले आहे. हे या वर्षातील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक बनले आहे.
    या गाण्यात विकी कौशल यांचे एनर्जेटिक डान्स मूव्ह्ज आणि त्रिप्ती डिमरी यांची अदा यामुळे याला जास्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच बिलबोर्ड इंडिया आणि यूके आशियाई चार्टवर हे पहिल्या क्रमांकावर पोहोचले. त्याचसोबत त्याने कॅनडियन हॉट 100 बिलबोर्डवर 25 व्या क्रमांकावर पदार्पण केले आहे. हे गाणं रिलीजच्या काही दिवसांतच व्हिडिओ यूट्यूबवर 70 दशलक्षांहून अधिक वेळा पाहिलं गेले आहे. तसेच हे गाणं पंजाबी पारंपरिक शैलीचा आणि आधुनिक डान्स बीट्सचे सुंदर मिलन आहे, ज्यामुळे हे गाणं पार्टी अँथम म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

    सजनी रे –

    भारतातील ऑस्कर 2025 साठी निवडलेल्या लापता लेडीज या चित्रपटातील हे गाणं असून, अर्जित सिंग या गायकाने पुन्हा एकदा लोकांचे मन मोहून टाकले आहे. तसेच हे गाणं राम संपथ यांनी लिहले आहे. या गाण्याच्या बोलांमध्ये प्रियकराच्या दूरतेमुळे होणाऱ्या वेदना आणि दुःख व्यक्त केलं आहे. या गाण्याचे संगीत आणि भावनिक गायन यामुळे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. म्हणून या गाण्याला 2024 च्या टॉप गाण्यांमध्ये गणले जात आहे. तसेच हे गाणं हिंदी भाषेतील असून याने प्रेक्षकांच्या मनावर भावनिक भूरळ टाकली आहे.

    आयी नाई –

    आयी नाई गाणं 2024 साली आलेल्या स्त्री 2 चित्रपटातील एक सुपर हिट सॉंग असून , राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. त्यामुळे या गाण्यामध्ये वेगळीच धमाल दिसून येत आहे. तसेच पवण सिंग, सिमरन चौधरी, दिव्या कुमार आणि साचिन-जिगर यांच्या गाण्याने गाण्याला एक खास ऊर्जा दिली आहे, आणि साचिन-जिगर यांनी त्याच्या धूनवर जोरदार बीट्स दिल्या आहेत. त्याचसोबत हे गाणं नॉन-स्टॉप पार्टीसाठी फार भन्नाट आहे. या गाण्याची धून आणि रिदम फारच पकडणारी असून , ज्यामुळे ते नृत्य प्रेमींमध्ये लोकप्रिय झालं आहे.

    Poco M7 Pro 5G Launched | Poco ने लॉन्च केला परवडणारा स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

    Poco M7 Pro 5G Launched

    Poco M7 Pro 5G Launched | स्मार्टफोन कंपनी पोकोने आपला बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीने आज Poco M7 Pro 5G लॉन्च केला आहे. यासोबतच कंपनीने Poco C75 देखील लॉन्च केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स बजेट रेंजमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. यासोबतच यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स देखील आहेत. चला जाणून घेऊया स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल.

    Poco M7 Pro 5G तपशील

    Poco M7 Pro 5G मध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच, कंपनीने डिस्प्लेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षण दिले आहे. एवढेच नाही तर कंपनीच्या म्हणण्यानुसार या स्मार्टफोनला TUV ट्रिपल सर्टिफिकेशन आणि SGS आय केअर डिस्प्ले सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे. हा फोन MediaTek Dimension 7025 Ultra प्रोसेसरने सुसज्ज आहे. याशिवाय, यात 8GB पर्यंतची रॅम देखील देण्यात आली आहे.

    कॅमेरा सेटअप

    या स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने 50 मेगापिक्सेल Sony LYT-600 OIS प्राइमरी कॅमेरासह डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी डिव्हाइसमध्ये 20-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. यासोबतच फोनमध्ये मल्टी फ्रेम नॉईज रिडक्शन आणि फोर इन वन पिक्सेल ब्लरिंग फीचरही देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 300 टक्के सुपर व्हॉल्यूमसह सादर करण्यात आला आहे. त्याच वेळी, डॉल्बी ॲटमॉस, ड्युअल स्टीरिओ स्पीकर, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखी वैशिष्ट्ये देखील डिव्हाइसमध्ये दिसतील.

    किंमत

    Poco M7 Pro 5G च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर या फोनची सुरुवातीची किंमत 13999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटशिवाय, तुम्ही हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरूनही खरेदी करू शकता. फोनच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 13999 रुपये आहे. तर त्याच्या 8GB + 255GB व्हेरिएंटची किंमत 15999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

    कशामुळे होतो क्षयरोग? ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा

    Tb

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | क्षयरोग हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे जो अनेकदा फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो. हा सर्वात मोठा संसर्गजन्य किलर मानला जातो. क्षयरोगाने ग्रस्त लाखो लोक त्यांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल अनभिज्ञ असतात, मूकपणे सहन करतात आणि त्यांचे मौल्यवान जीवन गमावतात. श्लेष्मा किंवा रक्तासह सतत खोकला, थकवा, वजन कमी होणे, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप आणि थंडी ही टीबीची लक्षणे आहेत. जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलते तेव्हा क्षयरोग हवेतून पसरतो.

    क्षयरोगाची कारणे

    धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते आणि टीबीची शक्यता वाढते. उपचार न केल्यास, टीबीमुळे फुफ्फुसाच्या ऊतींना कायमचे डाग येऊ शकतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याव्यतिरिक्त, व्यक्तीला फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो, याचा अर्थ फुफ्फुस आणि छातीच्या भिंतीमध्ये द्रव जमा होऊ शकतो. ज्यामुळे छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. टीबी मणक्याच्या हाडांना संक्रमित करू शकतो, ज्यामुळे पाठदुखी होते आणि पाठीच्या कण्यावर दबाव येतो. विलंब न करता क्षयरोगाचे निदान करणे ही काळाची गरज आहे जेणेकरून त्वरित उपचार आणि परिणाम मिळू शकतील.

    क्षयरोगाचे उपचार

    क्षयरोगाचे लवकर निदान होणे हा रुग्णांसाठी आशेचा किरण आहे. हे संभाव्य संकटमय प्रवासाला आटोपशीर प्रवासात बदलते. जे जीव वाचवते आणि समुदायांना या प्राणघातक आजारापासून वाचवते. लक्षात ठेवा, क्षयरोगाच्या शर्यतीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, जर त्यांना खोकला आणि श्वास लागणे यांसारखी लक्षणे दिसली तर त्यांना तज्ञाचा सल्ला घ्यावा. टीबीचे निदान करण्यासाठी आणि वेळेवर व्यवस्थापन सुरू करण्यासाठी एएफबी स्मीअर, जीन एक्सपर्ट चाचणी, टीबी डीएनए पीसीआर, टीबी कल्चर आणि औषध संवेदनशीलता या इतर महत्त्वाच्या चाचण्या आहेत.

    टीबीमुळे शरीरावर होणारे परिणाम

    मॅनटॉक्स ट्यूबरक्युलिन स्किन टेस्ट (टीएसटी) आणि इंटरफेरॉन-गॅमा रिलीझ एसे (आयजीआरए), सीटी स्कॅन, एक्स-रे, थुंकी आणि फुफ्फुसातील द्रव या नावाची रक्त तपासणी हे इतर काही उपाय आहेत. त्वरीत निदान त्वरीत उपचारांना अनुमती देते, ज्यामुळे गंभीर गुंतागुंत आणि मृत्यूचा धोका कमी होतो. संसर्गजन्य प्रकरणे वेगळे करण्यासाठी आणि क्षयरोगाचा इतरांना प्रसार रोखण्यासाठी लवकर निदान फायदेशीर ठरेल.

    असुरक्षित लोकसंख्येमध्ये (जसे की एचआयव्ही रूग्ण) लवकर निदान जीवन वाचवणारे असू शकते कारण योग्य उपचार योजना बनवणे शक्य होईल. क्षयरोगाशी लढा देण्याच्या बाबतीत, अचूक निदान उपाय हे सकारात्मक उपचार परिणाम देण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. समुदायांमध्ये टीबीचा मूक प्रसार थांबवणे आणि शेवटी असंख्य जीव वाचवणे हे उद्दिष्ट आहे. सध्या, प्रगत निदान सुविधा केवळ एक रोग ओळखत नाहीत. आम्ही पुनर्प्राप्ती, लवचिकता आणि क्षयरोगमुक्त भविष्यासाठी मार्ग प्रशस्त करत आहोत. आता, रुग्णांना कोणताही संकोच न करता माहितीपूर्ण निवड करून क्षयरोगाशी लढण्यासाठी सक्षम केले जात आहे.

    Top verdicts of the year 2024 | घड्याळ चिन्ह अजितदादांना; 2024 वर्षातील सर्वात धक्कादायक राजकीय निकाल

    Top verdicts of the year 2024

    Top verdicts of the year 2024 | 2024 मध्ये अनेक मोठ्या घटना घडलेल्या आहेत. त्यातही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि घडामोडी घडलेल्या आहेत. ज्याचा परिणाम केवळ राजकारणावरच नाही तर सर्व सामान्य माणसांवर हे मोठ्या प्रमाणात झाला आहे. यातील सगळ्यात मोठी घटना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला दिले. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवारांनी १९९९ ला केली होती. मात्र त्यांच्या हयातीत हा पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नाव दिले आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पवारांना देण्यात आलं…

    निवडणूक आयोगाने या दोन पक्षांबाबत दिलेला निर्णय अत्यंत धक्कादायक होता. त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घड्याळ हे निवडणूक चिन्ह देखील अजित पवार गटाला देण्यात आलेल्या निवडणूक आयोगाने दिली. जुलै महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि अजित पवार यांच्यासह आमदारांनी राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. याआधी देखील शिवसेना पक्षाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या बाजूने निर्णय देत पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिले होते. त्यानंतर अजित पवार गटाला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि त्यांचे चिन्ह घड्याळ असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिले.

    त्यानंतर शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाचे नवे नाव आणि चिन्ह प्रस्ताव करावा लागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. निवडणूक आयोगाने याबाबत निकाल जाहीर केला. त्यावेळी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील हजर होते. निवडणूक आयोगाने या शिवसेनेच्या पक्षाबाबत एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. यामुळे हा निकाल लागला असावा, असे त्यांनी अनेकांना वाटले होते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत असे होणार नाही, असे अनेकांना वाटत होते. परंतु सगळ्यांचा हा अंदाज चुकला आणि निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिला. हा निकाल 2024 मधील अत्यंत धक्कादायक निकाल होता या निकालाने केवळ राजकीय पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली नाही, तर सर्वसामान्य लोकांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली.