Thursday, January 1, 2026
Home Blog Page 332

Stars we lost in 2024 | 2024 मध्ये सिनेसृष्टीवर कोसळली शोककळा; या कलाकारांचे झाले निधन

Stars we lost in 2024 | 2024 हे वर्ष संपायला अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या वर्षात बॉलीवूड मध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. अनेक कलाकारांचे निधन देखील झाले आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन समस्त प्रेक्षकांनी हळहळ व्यक्त केली आहे. आता आपण 2024 मध्ये कोणते कलाकार मृत्यू पावले आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

अतुल परचुरे

ज्येष्ठ मराठी आणि हिंदी चित्रपट, टीव्ही आणि रंगमंच अभिनेते अतुल परचुरे यांचे १४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईत वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे हे अभिनेते दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. 1985 च्या खिचडी या मराठी चित्रपटातून बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर 1993 मध्ये बेदर्डी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. फिर भी दिल है हिंदुस्तानी (2000), तुमसा नहीं देखा (2004), येकीन (2004) यांचा समावेश आहे. 2005), क्यों की… (2005), कलयुग (2005), फिर हेरा फेरी (2006), आवारापन (2007), ऑल द बेस्ट (2009), खट्टा मीठा (2010), ब्बुद्धा… होगा तेरा बाप (2011), जुडवा 2 (2017) आणि लिगर (2022) इत्यादी. द कपिल शर्मा शो’ आणि मराठी चित्रपट अलीबाबा आणि चाळीशीतले चोर (2024).

स्टॅड झाकीर हुसेन

भारतीय तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी १५ डिसेंबर २०२४ रोजी सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे अखेरचा श्वास घेतला. इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळे गुंतागुंत निर्माण होईपर्यंत ते काही काळ अस्वस्थ होते. 1951 मध्ये मुंबईत जन्मलेले उस्ताद झाकीर हुसेन वयाच्या 3 व्या वर्षी त्यांचे वडील आणि तबलावादक उस्ताद अल्लाहराखा खान यांच्यानंतर टेबलावर आले. त्यांनी संगीतकार, तालवादक, संगीत निर्माता, पार्श्वगायक, गीतकार आणि अभिनेता अशा अनेक हॅट्स घातल्या. ते पद्मश्री (1988), पद्मभूषण (2002), पद्मविभूषण (2023), आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1990) यासह अनेक लोकप्रिय आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांचे प्राप्तकर्ता होते. संगीतकार म्हणून त्यांचे काही उल्लेखनीय बॉलीवूड चित्रपट होते – मिस्टर अँड मिसेस अय्यर, द परफेक्ट मर्डर, मुहाफिज, अग्नि वर्षा, परजानिया, एव्हरीबडी सेज आय एम फाइन आणि साझ ज्यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी अँटोनिया मिनेकोला आणि मुली, अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी असा परिवार आहे.

सुहानी भटनागर

आमिर खान स्टारर दंगल (2016) मध्ये तरुण बबिता फोगटची भूमिका साकारणारी बालकलाकार सुहानी भटनागर यांचे 16 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 19 व्या वर्षी AIIMS, नवी दिल्ली येथे निधन झाले. तिच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, सुहानी डर्माटोमायोसिटिस या दुर्मिळ दाहक रोगाने ग्रस्त होती ज्यामुळे त्वचेवर पुरळ आणि स्नायू कमकुवत होतात. तिने नितेश तिवारीच्या दंगलमध्ये महावीर फोगटच्या (आमिर खानने साकारलेल्या) चार ऑन-स्क्रीन मुलींपैकी एकाची भूमिका केली होती, तर सान्या मल्होत्राने मोठी झालेली आवृत्ती साकारली होती.

उस्ताद रशीद खान

प्रख्यात संगीतकार उस्ताद रशीद खान यांचे वयाच्या ५५ ​​व्या वर्षी ०९ जानेवारी २०२४ रोजी कोलकाता येथील रुग्णालयात निधन झाले. रामपूर-सहस्वान घराण्याचे शास्त्रीय गायक आणि २०२२ मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणारे, प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त होते. आणि अखेरचा श्वास घेण्यापूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील बदायुन येथे जन्मलेले उस्ताद रशीद खान हे उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे पुतणे होते आणि त्यांनी त्यांचे नातू उस्ताद निसार हुसैन खान यांच्याकडून सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले. मंटो, इश्केरिया, शादी में जरूर आना, हेट स्टोरी 2, इसाक, राज 3, मौसम, माय नेम इज खान, जब वी मेट आणि किसना यांसारख्या चित्रपटांमधील त्यांची काही सुप्रसिद्ध गाणी होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

Top 5 Gadgets launches in 2024 | 2024 मध्ये तंत्रज्ञानात झाली मोठी प्रगत; लॉन्च झाले हे गॅजेट्स

Top 5 Gadgets launches in 2024

Top 5 Gadgets launches in 2024 | 2024 या वर्षांमध्ये अनेक नवनवीन गोष्टी घडलेल्या आहेत. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात देखील अनेक मोठ्या प्रगती झालेली आहे. टेक्नॉलॉजीमध्ये अनेक नवनवीन गॅजेट्स 2024 मध्ये लॉन्च झालेले आहेत. ते गॅजेट्स त्यांच्या वैशिष्ट्यमुळे आणि लुकमुळे 2024 मध्ये चर्चेत राहिलेले आहेत. तसेच मानवासाठी देखील खूप चांगला फायदा झालेला आहे. आता आपण 2024 मध्ये लॉन्च झालेल्या अशाच काही हटके गॅजेटबद्दल जाणून घेणार आहोत.

पारदर्शक टीव्ही | Top 5 Gadgets launches in 2024

2024 मध्ये टीव्हीच्या विश्वामध्ये खूप मोठ्या बदल झालेला आहे. आपण अगदी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पासून ते एलईडी पर्यंतचा टीव्ही पाहिलेला आहे. परंतु 2024 मध्ये एलजी कंपनीने चक्क बाजारामध्ये पारदर्शक टीव्ही आणलेला आहे. या टीव्हीमध्ये एक आपारदर्शक लेयर आहे. रिमोटचा वापर करून ती लेवल हटवली जाते. तेव्हा ती टीव्ही पूर्णपणे पारदर्शक होते. या टीव्हीमध्ये एलजीचा अल्फा 11 एआय प्रोसेसर देखील आहे. यामध्ये पिक्चर क्वालिटी देखील चांगली दिसते. तसेच ब्लॅक आणि ट्रान्सपरंटमध्ये तुम्ही सहज यामध्ये स्वीच करू शकता.

ट्रिपल फोल्डिंग स्मार्टफोन

2024 मध्ये अनेक नवनवीन मोबाईल फोन लॉन्च झालेले आहेत. प्रत्येक मोबाईल हा त्याच्या हटके लूकमुळे आणि वैशिष्ट्यामुळे चर्चेत आलेला आहे. परंतु या वर्षी चिनी कंपनीने एक वेगळाच फोन लॉन्च केलेला आहे. यामध्ये तीन वेळा फोल्ड होणारा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलेला आहे. हा स्मार्टफोन उघडल्यानंतर एका टेबलेट सारखा मोठा होतो. यामध्ये जवळपास 10.2 इंचाची स्क्रीन आहे. तसेच ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देखील आहे. त्याचप्रमाणे या फोनमध्ये 16 जीबी रॅम आणि वन टीबीपर्यंत स्टोरेज देखील आहे. यामध्ये 6.4 in चा सेकंडरी डिस्प्ले देण्यात आलेला आहे.

स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन

2024 मध्ये जगातील सगळ्यात पातळ आणि हलका फुलका लेबल स्मार्टफोन तयार करण्यात आलेला आहे. या फोनमध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत. स्पेसिफिकेशन देखील देण्यात आलेला आहे. सॅमसंगचा हा लोकप्रिय फोल्डेबल फोन गॅलेक्सी झेड फोर 6 पेक्षा देखील पातळ आहे गॅलेक्सी झेड फोर 6 ची जाडी 12.1 मिनी एवढी आहे. परंतु या मॅजिक फोनची जाडी फक्त 9.2 एवढी आहे. तसेच या नव्या पोर्टेबल फोनचे वजन देखील 226 ग्रॅम एवढे आहे.

Orion स्मार्ट वॉच

यावर्षी मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आतापर्यंतचा सगळ्यात स्मार्ट चष्मा लॉन्च केलेला आहे. यामध्ये जगातील सर्वात प्रगत स्मार्ट ग्लास वापरण्यात आल्या असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. याला कोणत्याही प्रकारच्या तारा जोडलेल्या नाहीत. तसेच त्याचे वजन देखील केवळ 200 ग्रॅम पेक्षा ही कमी आहे. कंपनीने पूर्ण होलोग्राफिकेट रियालिटी चष्मा तयार केलेला आहे. हा चष्मा आवाजाद्वारे नियंत्रित केला जातो. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे देखील इंटेग्रेशन देण्यात आलेले आहे.

Casio रिंग साइज वॉच

2024 मध्ये लोकप्रिय डिजिटल वॉच निर्मित कंपनी कॅसिओने पहिले रिंग आकाराचे घड्याळ लाँच केलेले आहे. या रिंगमध्ये अर्ध केसिओ डिझाईन करण्यात आलेले आहे. आणि एक छोटी स्क्रीन देखील दिसते. यामध्ये तुम्हाला संपूर्ण वेळ दिसते. एक इंच पेक्षा कमी आकाराची ही रिंग आहे. या रिंग मध्ये 7 सेगमेंटची एलईडी स्क्रीन दिसते. तसेच 3 फिजिकल बटन देखील आहेत. यामध्ये स्टॉपवॉचचे वैशिष्ट्य देखील आहे.

महत्वाची बातमी!! या उपशिक्षकांना मिळणार जुनी पेन्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य शासनाने 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देणे थांबवले होते . पण आता सरकारने यांच्यासाठी नवीन पेंशन लागू केली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे जुन्या पेंशनपासून वंचित राहिलेल्या 149 उपशिक्षकांना अखेर जुनी पेन्शन लागू झाली आहे. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून , या निर्णयामुळे वंचित शिक्षकांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. यामुळे शिक्षकांना म्हातारपणासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय –

राज्यभरातील हजारो शिक्षक या निर्णयामुळे त्रस्त होते. शिक्षक संघटनांनी आणि शिक्षक आमदारांनी वारंवार याविषयी आवाज उठवला. न्यायालयातही या प्रकरणावर सुनावण्या झाल्या. शिक्षक संघटनांच्या सातत्यपूर्ण मागण्यांनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकरणात सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता जे या पेंशनपासून वंचित होते त्यांना हि पेंशन मिळणार आहे.

जुनी पेंशन लागू –

शालेय शिक्षण विभागाने सर्व जिल्हा परिषदेना आदेश दिला की, 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या, परंतु नंतर नियुक्ती झालेल्या शिक्षकांची माहिती गोळा करून त्यांना जुनी पेंशन लागू करावी. सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने या अनुषंगाने आंतरजिल्हा बदली झालेल्या आणि नियुक्ती प्रक्रियेत सहभागी झालेल्या शिक्षकांची तपशीलवार माहिती मागवून , या निर्णय घेण्यात आला आहे.

149 उपशिक्षकांना अखेर जुनी पेन्शन लागू –

या पेंशनमध्ये तालुकानिहाय माहिती गोळा करून 149 शिक्षकांचा प्रस्ताव प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासमोर ठेवण्यात आला. त्यांनी त्याला मंजुरी दिली असून या शिक्षकांना जुनी पेंशन लागू झाली आहे. यामध्ये मंगळवेढा 8 , बार्शी 8, सांगोला 20 , पंढरपूर 26 ,मोहोळ 29 , उत्तर सोलापूर 16 , माढा 5 ,माळशिरस 6 ,अक्कलकोट 5 या सर्वाना याचा लाभ मिळणार आहे.

शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण –

या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण 2005 नंतर नियुक्त झालेल्या दोन ते अडीच हजार शिक्षकांना अजूनही जुनी पेन्शन योजना लागू झालेली नाही. त्यामुळे शिक्षक संघटनांनी या बाबतही मागणी पुढे नेली आहे. जिल्हा परिषदेतर्फे मंजुरी मिळाल्याने लाभार्थी शिक्षकांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळणार आहे . शिक्षकांच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळेच हा निर्णय घेता आला, हे या घटनेचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

काय आहे विवाह विमा? अशाप्रकारे घेता येतो फायदा

Wedding insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोकांचा आरोग्य विमा किंवा इतर अनेक प्रकारचा विमा उतरवत असतात. या विम्याचे आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे. ही आर्थिक दृष्टिकोनातून तयार केलेली एक चांगली संकल्पना आहे. जीवनामध्ये कधी कुठली गोष्ट घडेल, हे सांगता येत नाही. अशा वेळी आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भविष्याचा विचार करून विमा घेणे खूप महत्त्वाचा असतो.

आजपर्यंत आपण आरोग्य विमा, पीक विमा यांसारखे विमाचे प्रकार पाहिलेले आहेत. परंतु तुम्ही कधी विवाह बद्दल ऐकले आहे का? हा देखील एक विम्याचा प्रकार आहे. सध्या अनेक लोक या विम्याचा उपभोग घेत आहे. आपल्या भारतामध्ये पाहायला गेले, तर सर्वाधिक खर्च हा लग्नामध्ये होत असतो. अनेक वेळा आई वडील त्यांच्या आयुष्यभराची पुंजी मुलांच्या लग्नासाठी खर्च करतात. परंतु कधी कधी अचानक अशा गोष्टी होतात की, लग्न सोहळा यांसारख्या गोष्टी रद्द होतात. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

अशावेळी तुम्ही काढलेला विवाह विमा तुमच्या उपयोगाला येईल आर्थिक दृष्टिकोनातून हा अत्यंत सुरक्षित आहे. आता हा विवाह विमाची संकलपणा काय आहे? त्याचे स्वरूप कसे आहे? त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना कशाप्रकारे होतो? याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

विवाह विमा अत्यंत फायदेशीर विमा आहे. जर कोणत्याही कारणामुळे तुमचे लग्न रद्द झाले किंवा लग्नासाठी आणलेले दागिने चोरीला गेले किंवा एखादी कोणतीही आपत्ती आली तर तुम्ही या विवाह विमाच्या माध्यमातून त्याची भरपाई घेऊ शकता. जर तुम्ही 25000 रुपये आणि जीएसटी इतका प्रीमियर हप्ता भरला, तर तुम्हाला जवळपास 20 लाखांपर्यंतचे कव्हरेज मिळते. आता या विवाह विम्याचे अनेक प्रकार आहेत ते आपण जाणून घेऊया.

लग्न सोहळा रद्द होणे किंवा पुढे ढकलणे

एखाद्या वेळेस कोणतीही नैसर्गिक आपत्ती येते. अशावेळी आग लागते, किंवा वादळ, भूकंप यांसारखी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली, इतर विवाह सोहळा रद्द करावा लागतो. किंवा स्थगित करावा लागतो. अशा वेळी हा विवाह विमा उपयोगी ठरतो.

लायबिलिटी

जर एखाद्याला दुखापत झाली किंवा तुमच्या संपत्तीचे काही नुकसान झाले, तर ते कवर करण्यासाठी विवाह विमा महत्त्वाचा ठरतो.

वेंडर कडून झालेले नुकसान

यामध्ये लग्नपत्रिकांचा खर्च, केटरर्स, लग्नाचा हॉल, सजावट बँडवाल्यांना आगाव रक्कम देणे, हॉटेल, ट्रॅव्हल तिकीट साठी रिझर्व यांचा समावेश होतो.

दागिने चोरी जाणे

लग्नामध्ये जर दागिन्यांची तुम्ही भरपूर खरेदी केली असेल, परंतु एखाद्या वेळेस लग्नात दागिने चोरीला गेले किंवा हरवले तर या विम्यातून तुम्ही ती रक्कम कव्हर करू शकता.

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तयार केली काळ्या द्राक्षांचे वाण; वाचा सविस्तर

Grapes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोक हे अत्याधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहेत. पारंपरिक पद्धतीचा अवलंब न करता ते अत्याधुनिक तंत्रांचा वापर करतात. आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते योग्य पद्धतीने शेती करू शकता. आजकाल तरुण पिढी देखील शेतीमध्ये उतरत आहे. आणि ते शेतीत नवनवीन प्रयोग करायला लागलेले आहेत. यातून त्यांना अगदी सोप्या पद्धतीने शेती करता येते. आणि चांगला नफा देखील होत आहे.

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता शेतीच्या व्यवसायात प्रगती व्हायला लागलेली आहे. अशातच आता इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या तज्ञांच्या सहाय्याने काळ्या द्राक्षांची वाणांची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.

इंदापूर तालुक्यातील काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाने द्राक्ष शेतीमध्ये ही एक नवीन प्रगती केलेली आहे. त्यांनी स्वतः काळ्या द्राक्षाची वाणाची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांकडून देखील द्राक्षांच्या या वाणाला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. इंदापूर तालुक्यात सगळ्यात जास्त द्राक्षांची लागवड केली जाते. या तालुक्यातील द्राक्ष अत्यंत महाग द्राक्ष म्हणून ओळखली जातात. येथील द्राक्षाला जवळपास प्रति किलोला 135 ते 170 रुपये एवढा दर मिळतो.

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे काळ्या द्राक्षांची नवीन वाण निर्माण केलेली आहे. त्याचा फायदा सगळ्यांनाच होत आहे. ही द्राक्ष लागवड केल्यानंतर अत्यंत कमी वेळात तयार होतात. शेतकऱ्यांनीन उत्कृष्ट आकार आणि चांगली चव असलेली द्राक्षांचे वाणविकसित केलेले आहे. शेतकऱ्यांनी उत्परिवर्तन या पद्धतीचा वापर करून ही द्राक्षांची वाण विकसित केलेली आहे.

आता रेशन कार्डसोबत बाळगण्याची गरज नाही; अशाप्रकारे तयार करा डिजिटल कार्ड

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारने देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. त्यातील रेशन कार्ड योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना कमी दरात किंवा अगदी मोफत देखील रेशन दिले जाते. अनेक वेळा गडबडीत आपण रेशन कार्ड घरी विसरतो. त्यामुळे आपल्याला रेशन मिळत नाही. परंतु यासाठी एक नवीन प्रणाली विकसित झालेली आहे. आता तुम्ही तुमचे रेशन कार्ड बाळगण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील हे काम करू शकता. सरकारने मेरा राशन 2.0 हे मोबाईल ॲप लॉन्च केलेले आहे . ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्डचा वापर करू शकता.

मेरा राशन 2.0 एप्लीकेशन तुम्हाला डिजिटल रेशन कार्डचा पर्याय देखील देणार आहे. त्यामुळे तुम्हाला दरवेळेस रेशन कार्ड सोबत घेऊन जायचे नाही. तुम्ही तुमचे डिजिटल रेशन कार्ड काढू शकता. यामुळे तुमचे काम होईल. तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल, तर ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बनवू शकता. आता ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड बनवण्यासाठी कोणत्या पात्र लागतात. हे आपण जाणून घेऊया.

मेरा रेशन 2.0 ॲप

  • मेरा रेशन 2.0 हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करू शकता.
  • इन्स्टॉल झाल्यानंतर त्यावर तुम्ही तुमचा आधार क्रमांक,मोबाईल नंबर या सगळ्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी भरा
  • त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो ओटीपी एंटर करा.
  • मग तुम्हाला शिधापत्रिकेची डिजिटल प्रत मिळेल.

शिधापत्रिकेसाठी आवश्यकता

  • शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न हे 5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
  • कुटुंबाकडे कार किंवा इतर चार चाकी वाहन नसावे.
  • पेन्शन मिळत असेल तर ती 10 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी

दिल्ली विमानतळाने इतिहास रचला ; 150 स्थळांना जोडणारे देशातील पहिले विमानतळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विमानतळाने एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. थाई एअरएशिया एक्सने दिल्ली आणि बँकॉक-डॉन मुआंग (डीएमके) यांच्यात थेट विमानसेवा सुरू केली असून, यामुळे दिल्लीचे इंदिरा गांधी विमानतळ जगभरातील 150 स्थळांना जोडणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीचा ठराव 12 डिसेंबर रोजी थेट उड्डाणांच्या उद्घाटनाच्या वेळी झाला . सध्या हे उड्डाण आठवड्यात दोन वेळा एअरबस A330 विमानांसह चालवले जात आहे. तसेच 2025 च्या जानेवारी मध्यापर्यंत हे उड्डाण आठवड्यात चार वेळा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड –

थाई एअरएशिया एक्सची ही नवीन सेवा एअरबस ए330 विमानांच्या सहाय्याने आठवड्यातून दोन वेळा चालवली जाणार आहे . जानेवारी 2025 पर्यंत या सेवेला आठवड्यातून चार वेळा चालवण्याची योजना आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (DIAL) सांगितले की, मागील काही वर्षांत दिल्ली विमानतळाने नोम पेन्ह, बाली डेनपसार, कॅलगरी, मॉन्ट्रियल, वॅंकूव्हर, वॉशिंग्टन डलेस, शिकागो ओहारे, आणि टोकियो हनेडा यांसारख्या 20 हून अधिक खास आंतरराष्ट्रीय स्थळांना जोडले आहे. तसेच गेल्या दहा वर्षांत दिल्ली विमानतळाने ट्रान्स्फर प्रवाशांमध्ये 100% वाढ नोंदवली आहे. त्यामुळे हा दक्षिण आशियातील एक महत्त्वाचा ट्रान्झिट हब बनला आहे.

56% उड्डाणे दिल्लीहून –

भारताच्या 88% लांब पल्ल्याच्या ठिकाणांशी दिल्ली विमानतळ जोडलेले आहे. भारतातून होणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या साप्ताहिक उड्डाणांपैकी 56% उड्डाणे दिल्लीहून होतात. भारतातून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जाणाऱ्या जवळपास 50% प्रवासी दिल्ली विमानतळाचा प्रवेशद्वार पर्याय निवडतात. तसेच दरवर्षी सुमारे 40 लाख देशांतर्गत प्रवाशांना आंतरराष्ट्रीय स्थळांना सहज कनेक्शन मिळवून देणारे दिल्ली विमानतळ भारतीय विमान कंपन्यांच्या वाइड-बॉडी विमानांच्या वाढत्या सेवांमुळे एक सुपर-कनेक्टर हब होण्यासाठी सज्ज आहे.

प्रवाशांसाठी पसंतीचे केंद्र बनण्याचा निर्धार –

दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे सीईओ विदेह कुमार जयपुरियार म्हणाले कि ,150 स्थानकांशी जोडले जाणे ही आमच्या जागतिक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठीच्या वचनबद्धतेचे इंडिकेटर आहे. आम्हाला भारताला विमाननाच्या एका नव्या युगात घेऊन जाण्याचा अभिमान आहे आणि जागतिक प्रवाशांसाठी पसंतीचे केंद्र बनण्याचा आमचा निर्धार आहे. दिल्ली विमानतळाची अत्याधुनिक सुविधा, प्रवासी-केंद्रित सेवासुविधा आणि प्रभावी ट्रान्स्फर प्रक्रिया यामुळे तो विमानन क्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध करणारा मानदंड ठरला आहे.

ही आहे पीक विम्याचा अर्ज करण्याची शेवटची तारीख; जाणून घ्या सविस्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आज आलेलो आहोत. ती म्हणजे आता शेतकऱ्यांना पीएम पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरावा लागतो. ती अर्ज भरण्याची तारीख वाढविण्यात आलेली आहे. आता शेतकऱ्यांना 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे. आणि आर्थिक सुरक्षा मिळावी. यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

शेतकऱ्यांनी जर त्यांच्या पिकांचा हा पिक विमा काढला, जर कोणत्याही प्रकारची आपत्ती व दुष्काळ आला तर पिकांचे नुकसान झाल्यावर त्यांना आर्थिक भरपाई मिळते. रब्बी हंगामासाठी हरभरा, गहू, जवस, मसूर आणि मोहरी ही पिके पिक विमामध्ये समाविष्ट आहेत.

अर्ज कसा कराल?

तुम्हाला जर पीक मिळण्यासाठी बँकेच्या शाखेतून अर्ज करायचा असेल, तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन शकता आणि अर्ज करू शकता. किंवा अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता.

कागदपत्रे

या पीएम पीक विमा नोंदणीसाठी तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो कॉपी आणि जमिनी संबंधित कागदपत्र असणे गरजेचे आहे. त्यानंतरच तुम्हाला पीक विम्यासाठी अर्ज करता येईल.सरकारची प्रधानमंत्री फसल वीमा योजना ही एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक लोकांना फायदा झालेला आहे. जर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली आणि तुमच्या पिका प्रधानमंत्री फसल विमा योजना ही एक कल्याणकारी योजना आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी जास्तीत जास्त दोन टक्के, रब्बी आणि तेलबिया पिकांसाठी दीड टक्के आणि व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी पाच टक्के वार्षिक प्रीमियम भरावा लागतो. उर्वरित प्रीमियमची रक्कम केंद्र आणि राज्य सरकारांनी समान प्रमाणात विभागली जाते.

मांजर प्रेमींनो सावधान; मांजरींमधून वेगाने पसरतोय बर्ड फ्ल्यू

Bird Flue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्हालाही मांजर पाळण्याची आवड असेल तर सावधान. कारण पाळीव मांजरींमुळे बर्ड फ्लू पसरू शकतो असा इशारा एका नवीन अभ्यासाने दिला आहे. त्याचा परिणाम अमेरिकेतील पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या अडीच वर्षांपासून पाहायला मिळत आहे. टेलर आणि फ्रान्सिस मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे म्हटले आहे की मांजरींमधील एक किंवा दोन उत्परिवर्तनांमुळे विषाणूचा ताण माणसापर्यंत सहज पोहोचण्यास मदत होते. आम्ही तुम्हाला सांगूया की एव्हीयन इन्फ्लूएंझाचा प्राणघातक ताण, ज्याला अनेकदा H5N1 म्हणून ओळखले जाते, 100 दशलक्षाहून अधिक पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण आहे. मात्र, तो माणसांमध्ये सहजासहजी पसरत नाही, तर त्याबाबत सतर्क राहायला हवे.

या वर्षी एप्रिलमध्ये, साउथ डकोटामधील एका घरात 10 मांजरींचा मृत्यू झाल्यानंतर, संशोधकांनी मृतदेहांचे विश्लेषण केल्यानंतर त्यांच्यामध्ये श्वसन आणि मज्जातंतूशी संबंधित समस्या आढळल्या. मांजरींमध्ये आढळणारा विषाणू सुमारे 80 किमी दूर असलेल्या डेअरी फार्मवरील प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या विषाणूसारखाच होता. मांजरींच्या मृतदेहाजवळ पक्ष्यांची पिसे आढळून आली, ज्यावरून असे दिसून येते की त्यांनी जंगली पक्षी खाल्ले असावेत, ज्याने शेतातून विषाणू आणला होता.

मांजरींना बर्ड फ्लूचा धोका जास्त असतो का?

अभ्यासात असे आढळून आले की, इतर प्राण्यांच्या तुलनेत मांजरींमध्ये दोन रिसेप्टर्स असतात, ज्याद्वारे बर्ड फ्लूचे विषाणू आणि हंगामी फ्लू त्यांच्यात सहज प्रवेश करू शकतात. फ्लूचा हंगाम जसजसा वाढत जातो तसतशी मांजरींना एकाच वेळी H5N1 आणि हंगामी फ्लू विषाणूंची लागण होण्याची चिंता वाढत आहे. मांजरी माणसांच्या आसपास राहत असल्याने ते बर्ड फ्लू पसरवू शकतात.

मांजरींपासून मानवांमध्ये विषाणू कसा पसरतो?

अभ्यासातून असे दिसून आले आहे की संक्रमित मांजरींमध्ये प्रणालीगत संक्रमण वाढते. ते श्वसन आणि पाचक प्रणालींद्वारे विषाणू पसरवतात, ज्यामुळे आमच्या किंवा तुमच्या संपर्कात येण्याचे अनेक मार्ग तयार होतात. मांजरींमुळे H5N1 विषाणू मानवांमध्ये पसरल्याचा कोणताही पुरावा नसला तरी शास्त्रज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कारण असे झाले तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.

वर्ष 2024 मध्ये भारतीय रेल्वेने साध्य केल्या ‘या’ 5 गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 हे वर्ष भारतीय रेल्वेसाठी ऐतिहासिक ठरले असून, या वर्षात अनेक महत्त्वाच्या सुधारणा आणि प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहेत . याच वर्षी रेल्वेचे सुधारणा विधेयक 2024 महत्वाचे ठरले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच झोनला अधिक स्वायत्तता देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. या ऐतिहासिक टप्प्यामध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंक प्रकल्प पूर्ण होणे, वंदे भारत ट्रेनच्या नव्या मार्गांचा शुभारंभ, आणि रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण या महत्त्वाच्या बाबीनी हे वर्ष गाजवले आहे. रेल्वेच्या या कामगिरीचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. तर चला जाणून घेऊयात 2024 मधील रेल्वेच्या महत्वाच्या कामगिरी बदल अधिक माहिती.

2024 मध्ये रेल्वेची कामगिरी –

भारतीय रेल्वेने 2024 मध्ये 7188 किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण केले, जे 2022-23 च्या तुलनेत मोठी वाढ आहे. तसेच यामध्ये दिवसाला सरासरी 14.5 किमी ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात आले. याचसोबत भारतात 2024 मध्ये पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक बांधला गेला. हा 11 किलोमीटर लांबीचा सुविधा आहे, ज्यात IIT मद्रासच्या चेनईतील थैयूर उपनगरातील डिस्कव्हरी कॅम्पसमध्ये 410 मीटर लांबीचा चाचणी ट्रॅक आहे. हा उपक्रम मद्रासच्या अविष्कर हायपरलूप टीम, IIT आणि संस्थेत वाढवलेले एक स्टार्टअप TuTr यांचा संयुक्त प्रयत्न आहे.

उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंक –

हे रेल्वेसाठी एक महत्वाचे ठरले असून , उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंकच्या अंतिम ट्रॅक कामाची पूर्तता करण्यात आली आहे. हा एक महत्त्वाचा निर्णय आहे, जो जम्मू आणि काश्मीरच्या विविध ठिकाणांना देशाच्या इतर भागांशी रेल्वे जोडणारा आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंक प्रकल्प (USBRL) चा पहिला टप्पा, जो 118 किलोमीटर लांबीच्या काझीगुंड-बारामुला विभागावर आधारित आहे, ऑक्टोबर 2009 मध्ये काँग्रेस-नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात त्याचे उद्घाटन करण्यात आले होते.

उधमपूर-कात्रा विभाग उद्घाटन –

पुढील टप्प्यांमध्ये 2013 च्या जूनमध्ये 18 किलोमीटर लांबीचा बानीहाल-काझीगुंड विभाग आणि 2014 च्या जुलैमध्ये 25 किलोमीटर लांबीचा उधमपूर-कात्रा विभाग उद्घाटन करण्यात आले . फेब्रुवारीमध्ये, उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पाच्या बानीहाल-कात्रा विभागातील बानीहाल ते खारी ते सांगलदान विभागावर पहिली विद्युतीय रेल्वे चाचणी धावण सुरू करण्यात आली. ही चाचणी बानीहाल आणि सांगलदान रेल्वे स्थानकांदरम्यान 40 किलोमीटर ट्रॅक आणि सुरंगांवर यशस्वीपणे पार पडली, जी रामबन जिल्ह्यात आहे.

ऐतिहासिक टप्प्यांचे कौतुक –

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 2024 मध्ये गाठलेल्या या ऐतिहासिक टप्प्यांचे कौतुक केले आहे. रेल्वेचे विद्युतीकरण, आधुनिक पूल, आणि वंदे भारत गाड्यांचा विस्तार यामुळे भारतीय रेल्वे आधुनिक, सुरक्षित आणि कार्यक्षम बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे.