Thursday, January 1, 2026
Home Blog Page 337

Indian Railways Ticket Booking : भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; तात्काळ तिकीट नियमांमध्ये महत्वाचा बदल

Indian Railways Ticket Booking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक रेल्वेने प्रवास करतात त्यांच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तात्काळ तिकीट बुकिंगच्या (Indian Railways Ticket Booking) वेळेत बदल केला आहे. त्यामध्ये आता एसी विभागातील तिकिटाचे बुकींग सकाळी 10 वाजता सुरू होईल, तर नॉन-एसी विभागातील तिकीट सकाळी 11 वाजता बुक करता येणार आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे तात्काळ तिकीट बुकिंग प्रॉसेस जास्त सोपी होणार आहे. यामुळे हा निर्णय प्रवाशांना अधिक फायदेशीर ठरणार आहे.

प्रवाशांसाठी फायदेशीर – Indian Railways Ticket Booking

ज्या लोकांना अचानक तिकीट हवे असेल , त्यांच्यासाठी या निर्णय उपयुक्त ठरणार आहे. नवीन वेळापत्रकामुळे बुकिंग व्यवस्थापन अधिक सुव्यवस्थित होणार आहे. एसी आणि नॉन-एसी कोचसाठी वेगवेगळ्या वेळा ठेवल्यामुळे सर्व्हरवरील ताण कमी होईल आणि बुकिंग व्यवस्था जलद होण्यास मदत मिळेल.

बुकिंग कसे करावे –

तात्काळ तिकीट बुक (Indian Railways Ticket Booking) करण्यासाठी, सर्वप्रथम आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा. जर तुमचं अकाउंट नसेल, तर तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करावे लागेल. त्यानंतर Plan My Journey पर्यायावर क्लिक करून प्रवासाची माहिती भरा. यामध्ये मार्ग, तारीख आणि विभाग निवडून, तात्काळ बुकिंगचा पर्याय निवडा. प्रवाशांचे नाव, वय, लिंग आणि इतर आवश्यक माहिती भरून, पुढे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे तिकीटाचे पैसे भरा. बुकिंग पूर्ण झाल्यानंतर तिकीटाची माहिती एसएमएस आणि ईमेलद्वारे मिळेल. पण तात्काळ बुकिंगच्या तिकीटावर रिफंड मिळवता येणार नाही, त्यामुळे तुम्ही प्रवासासाठी तिकिटाचे ठरवलेले वेळेवर नियोजन करा.

बुकिंगसाठी पूर्व तयारी करणे गरजेचे –

अनके प्रवाशी कोणत्याना ना कोणत्या कारणासाठी तात्काळ सेवेचा वापर करतात. पण काही क्षणातच बुकिंग प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसते. त्यामुळे कित्येकदा आपले बुकिंग रद्द होते. जर तुम्हाला तुमचे तिकीट कन्फर्म करायचं असेल , तर त्यासाठी तुम्ही पूर्व तयारी करणे गरजेचे असते. त्यामध्ये सर्वप्रथम तुमच्या फोनचे इंटरनेट स्पीड चांगले आहे का हे चेक करा , त्यानंतर तात्काळ तिकीट बूक करण्याआधीच लॉगीन करा. बुकिंगसाठी लागणारी सर्व माहिती तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. हि माहिती न चुकता टाकून आपली प्रोसिजर पूर्ण करा . यामुळे तुम्हाला आधीपेक्षा सहज आणि झटपट तात्काळ तिकीट मिळवण्यास मदत मिळेल .

महाकुंभ 2025 ; प्रयागराज विमानतळावरून 23 शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू होणार

Mahakumbh Melava

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2025 च्या महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराजमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. यामध्ये प्रमुख म्हणजे प्रयागराज विमानतळाचा विस्तार महत्वाचा ठरणार आहे. केंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी अलीकडेच विमानतळाचा दौरा करून महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत . त्यामध्ये त्यांनी सांगितले कि , यात्रेकरूंना प्रयागराजपर्यंत सहज पोहोचवण्यासाठी तब्बल 23 शहरांसाठी थेट उड्डाण सेवा सुरू केली जाणार आहे. या बातमीमुळे अनेक प्रवाशांना आनंदाची बातमी मिळाली आहे.

23 शहरांसाठी थेट उड्डाणे

महाकुंभ काळात यात्रेकरूंना प्रयागराजपर्यंत सहज पोहोचवण्यासाठी 23 शहरांसाठी थेट उड्डाण सेवा सुरू केली जाणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, लखनऊ, हैदराबाद, चेन्नई, पटना, नागपूर आणि अयोध्या यांसारख्या शहरांचा समावेश आहे. सध्या प्रयागराज विमानतळावर इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट, आणि ट्रुजेट सारख्या विमान कंपन्यांची उड्डाणे चालू आहेत.

नवीन टर्मिनल इमारतीचे बांधकाम

विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे, जे डिसेंबर 2024 पर्यंत सुरु होईल. या टर्मिनलमध्ये एकाच वेळी 850 प्रवाशांची सोय होणार आहे. कोहरे आणि रात्रीच्या वेळी उड्डाणे नीट चालण्यासाठी CAT-2 लाइटिंग तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. तसेच महाकुंभ काळात प्रवाशांना मदत करण्यासाठी विमानतळावर मे आय हेल्प यू डेस्क उभारण्यात येणार आहे. येथे विविध भाषांतील कर्मचारी प्रवाशांना महाकुंभ क्षेत्र, घाट, आणि इतर सुविधांची माहिती देणार आहेत.

विमानतळाच्या विस्तारासाठी निधी

प्रयागराज विमानतळाच्या विस्तारासाठी 175 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. या विस्तारामुळे महाकुंभसाठी लाखो देश-विदेशातील श्रद्धाळूंना सुविधा मिळणार आहेत. तसेच महाकुंभ 2025 च्या आध्यात्मिक आणि भव्यतेला समृद्ध करण्यासाठी शिवालय पार्क तयार करण्यात येत आहे. 14 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारले जाणारे हे पार्क भारतीय संस्कृती, मंदिरांचे महत्त्व आणि पुराणकालीन दिव्यतेचे दर्शन घडवणार आहे.

IT सेक्टरसाठी 2025 सुवर्णकाळ; रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ

Job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांत IT सेक्टरमधील नोकऱ्यांमध्ये मोठी घट दिसून येत आहे. पण आता या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. NLB Services या टॅलेंट सोल्यूशन्स कंपनीच्या अहवालानुसार, 2024 च्या दुसऱ्या सहामाहीपासून सुरू झालेली सकारात्मकता 2025 पर्यंत अधिक गती घेईल आणि IT क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील , असे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच 2025 या नवीन वर्षात नोकऱ्यांची भरभराट दिसून येणार आहे.

2025 मध्ये रोजगाराची मोठी भरती –

अहवालानुसार 2025 मध्ये IT क्षेत्रात 15 ते 20 % नव्या नोकऱ्या निर्माण होतील. त्यामध्ये प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) यांसारख्या तंत्रज्ञान कौशल्यांसाठी 30 ते 35 टक्क्यांपर्यंत मागणी वाढणार आहे. त्यामुळे लोकांना अनेक रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगितले आहे.

AI सह मशीन लर्निंगचा सुवर्णकाळ –

गेल्या दोन वर्षांत AI, मशीन लर्निंग आणि क्लाऊड टेक्नॉलॉजीज या क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे एकीकडे नोकऱ्यांवर संकटाची भीती व्यक्त केली जात असताना दुसरीकडे नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. अनेकांच्या मते, AI आणि मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असलेल्या लोकांची मागणी मोठ्याप्रमाणात वाढणार आहे.

फ्रेशर्ससाठी फायदा –

2025 हे वर्ष फ्रेशर्ससाठी खूप चांगले ठरेल असे मानले जात आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या अवलंबामुळे नवीन कौशल्ये असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होईल. कंपन्या केवळ भरतीच नाही तर स्किल डेव्हलपमेंटवरही भर देत आहेत. भारत हा IT क्षेत्रातील जागतिक आघाडीचा देश असून व्हाईट कॉलर जॉब्समध्ये भारताचे वर्चस्व आहे. काही कारणामुळे IT क्षेत्रात मंदी आली होती. पण, 2025 पर्यंत परिस्थिती सुधारेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेला पुन्हा गती; योजनेत किती महिला अपात्र ठरणार?

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणूका झाल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला पुन्हा गती मिळालेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये थोडा विलंब झाला होता, पण राज्य सरकारने नवीन जबाबदारी स्वीकारली असून , या स्थगित अर्जाची छाननी पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे योजनेला किती महिला पात्र तसेच अपात्र आहेत, याची पडताळणी केली जात आहे.

पुण्यातील पात्र तसेच अपात्र अर्ज

पुणे जिल्ह्यात 20 लाख 84 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत 21 लाख 11 हजार 363 अर्ज मंजूर झाले असून बाकी अर्जांची छाननी सुरू आहे. तसेच आतापर्यंत 9 हजार 814 अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरले आहेत. काही अर्जामध्ये कागदपत्रांचा अभाव, तर काहींनी नियमांचे पालन केलेले नाही, अशा अर्जाचा समावेश आहे. याचसोबत 5 हजार 814 अर्ज किरकोळ कारणासाठी काही काळ नाकारण्यात आले आहेत. म्हणजेच पुणे शहरात 6 लाख 82 हजार 55 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 6 लाख 67 हजार 40 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, तर 3 हजार 494 अर्ज अपात्र ठरले आहेत.

हवेली तालुक्यात सर्वाधिक अर्ज

हवेली तालुक्यात सर्वाधिक अर्ज नोंदवले गेले आहेत. 4 लाख 19 हजार 859 अर्जांपैकी 4 लाख 15 हजार 510 अर्ज मंजूर झाले आहेत. तिथे अर्जदार महिलांचा प्रतिसाद लक्षात घेता, विशेष प्रक्रिया राबवली जात आहे.

उर्वरित अर्जांची छाननी सुरू

अजून 12 हजार अर्जाची छाननी प्रलंबित असून ती लवकरच पूर्ण होईल. या योजनेत महिलांना आर्थिक मदत तसेच विविध कल्याणकारी सुविधा मिळतील, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

पुढील टप्प्यांविषयी लवकरच घोषणा

पुणे जिल्ह्यातील अर्जदार महिलांना त्यांच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास सुधारित कागदपत्रे सादर करून अर्जदारांना योजनेचा लाभ मिळवता येईल. राज्य सरकार लाडकी बहिण योजनेच्या पुढील टप्प्यांविषयी लवकरच घोषणा करेल. यामुळे महाराष्ट्रातील महिलांना अधिक सुलभ आणि प्रभावी कल्याणकारी सुविधा मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; महाकुंभ मेळाव्यासाठी 13000 विशेष गाड्या सोडणार

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाकुंभ मेळाव्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विशेष घोषणा केलेली आहे. महाकुंभसाठी भारतीय रेल्वे तब्बल 13000 विशेष गाड्या सुरु ठेवणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये 3000 महाकुंभ स्पेशल गाड्यांचा समावेश असेल. प्रयागराज येथे येणाऱ्या यात्रेकरूंना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वेने जबरदस्त तयारी केली आहे. 13 जानेवारीला सुरु होणाऱ्या कुंभमेळात यात्रेकरूंना चांगला अनुभव येणार आहे.

महाकुंभमेळा

महाकुंभमेळा 13 जानेवारीपासून सुरू होईल आणि 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी समाप्त होईल. यामध्ये वाराणसीहून प्रयागराजपर्यंत रेल्वे प्रवास करताना, अश्विनी वैष्णव यांनी महाकुंभसाठी सुरू असलेल्या रेल्वेच्या तयारींचा आढावा घेतला. महाकुंभ दरम्यान सुमारे 1.5 ते 2 कोटी यात्रेकरू प्रयागराजला जाण्याचा अंदाज घेतला. तसेच त्यांनी उत्तर ते मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे, आणि उत्तर ते पूर्व रेल्वे विभागांतील अनेक स्टेशनांची पाहणी करून हा निर्णय घेतलेला आहे.

प्रमुख स्टेशनांवर सुधारणा

प्रयागराजमधील प्रमुख स्टेशनांवर सुधारणा करण्यात आल्या असून, यात्रेकरूंसाठी होल्डिंग एरिया तयार करण्यात आले आहेत. या होल्डिंग एरियामध्ये यात्रेकरू आरामात बसू शकतात. तिकीट वितरणासाठी कलर कोडिंगचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे योग्य प्लॅटफॉर्मवर पोहोचणे सोपे होणार आहे. तसेच महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये मोबाइल अनरिजर्व्ह्ड तिकीटिंग सिस्टम (UTS) सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक फायदा होणार आहे.

5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक

गेल्या दोन वर्षांत भारतीय रेल्वेने महाकुंभ मेळ्याच्या तयारीसाठी 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीत विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचा समावेश आहे. त्यात प्रयागराज-वाराणसी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, फाफामऊ-जंघई सेक्शनचा विस्तार, आणि झांसी, प्रयागराज, नैनी व छिवकी स्टेशनांवर नवीन प्रवेशद्वारे तयार करण्याचे काम समाविष्ट आहे. तसेच 23 होल्डिंग एरिया आणि 48 नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती केली गेली आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी 21 नवीन पूल आणि 554 तिकीट खिडक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

विविध सुविधा

रेल्वेने कंट्रोल रूम्स, सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टम आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून रिअल टाइम मॉनिटरिंगची सुविधा उपलब्ध करून देत, सुरक्षितता आणि सुविधा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व उपाययोजनांनी महाकुंभ मेळ्याच्या काळात रेल्वे सेवा अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि आरामदायक बनवली आहे.

Redmi स्मार्टफोनचा धमाका ; Redmi Note 14 सीरिज तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध

Redmi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्मार्टफोन बाजारात बजेट सेगमेंटमध्ये उत्कृष्ट स्मार्टफोन ऑफर करणाऱ्या कंपन्यांमध्ये रेडमीने आपली नवीन Redmi Note 14 सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये तीन मॉडेल्स असून, त्यात Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ चा समावेश होतो. हे फोन ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत.

Redmi Note 14

रेडमी नोट 14 हा या सीरिजचा पहिला स्मार्टफोन असून त्यात 6.67 इंचाचा FHD+ डिस्प्ले (120Hz रिफ्रेश रेट) दिला आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 अल्ट्रा प्रोसेसरवर आधारित हा फोन उत्तम कामगिरी करतो. ट्रिपल कॅमेरा सेटअपसह 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे, तर 20MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच 5110mAh क्षमतेची बॅटरी 45W फास्ट चार्जिंगसह आहे.

Redmi Note 14 Pro

हा मॉडेल 6.67 इंचाचा 3D कर्व्हड AMOLED डिस्प्ले (120Hz रिफ्रेश रेट) आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 अल्ट्रा प्रोसेसरसह येतो. कॅमेरामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 20MP सेल्फी कॅमेरा आहे. तसेच यामध्ये 5500mAh क्षमतेची बॅटरी 45W चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 14 Pro+ (5G)

सीरिजमधील सर्वात प्रीमियम मॉडेलमध्ये 6.67 इंचाचा 3D कर्व्हड AMOLED डिस्प्ले (120Hz) दिला असून स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 प्रोसेसरवर आधारित आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 50MP पोर्ट्रेट कॅमेरा, आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. 6200mAh क्षमतेची बॅटरी 90W फास्ट चार्जिंगसह दिली आहे.

किंमत

Redmi Note 14 सीरिजच्या स्मार्टफोनची किंमत विविध कॉन्फिगरेशनसह उपलब्ध आहे. Redmi Note 14 ची किंमत 18999 (6GB+128GB),19999 रुपये (8GB+128GB), आणि 21999 रुपये (8GB+256GB) आहे. Redmi Note 14 Pro साठी, किंमत 24999 (8GB+128GB) आणि 26999 (8GB+256GB) अशी आहे. त्याचप्रमाणे Redmi Note 14 Pro+ (5G) च्या विविध मॉडेल्ससाठी किंमत 30999 (8GB+128GB), 32999 (8GB+256GB), आणि 35999 (12GB+512GB) आहे. तसेच हे स्मार्टफोन तीन रंगामध्ये उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; LIC ची गोल्डन ज्युबली शिष्यवृत्ती योजना सुरु

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे विद्यार्थी पैशाअभावी शिक्षण पूर्ण करू शकत नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एलआयसीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी गोल्डन ज्युबली शिष्यवृत्ती योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाईल. ज्यांच्याकडे कौशल्य असूनही आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणासाठी अडथळे येतात, त्यांच्यासाठी हि योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2024 आहे.

योजना दोन गटात

ही योजना दोन गटांमध्ये विभागली आहे. पहिल्या विभागात जनरल शिष्यवृत्ती येत असून , त्यामध्ये वैद्यकीय (MBBS/BDS) आणि अभियांत्रिकी (B.E/B.Tech) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याचबरोबर दुसऱ्या विभागात व्यावसायिक अभ्यासक्रम आणि सरकारी महाविद्यालयातून आयटीआय डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यात समावेश असेल. म्हणजेच दहावीच्या पुढे आयटीआय किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा करणाऱ्या मुलींसाठी वेगळी शिष्यवृत्ती उपलब्ध असणार आहे.

पात्रता

या योजनेत पात्रतेनुसार विद्यार्थी दहावीमध्ये किमान 60% गुण किंवा त्यासोबत CGPA मिळवलेले असणे आवश्यक असून , बारावी तसेच डिप्लोमा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 मध्ये कोणत्याही अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला आहे असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. या सर्व अटींसोबत अर्जदाराचे कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेच्या आत असावे.

विशेष शिष्यवृत्त्या उपलब्ध

विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात येतात, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रवासास मदत मिळते. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्त्या उपलब्ध आहेत. वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 40000 रुपये दिले जातात, तर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती 30000 रुपये प्रतिवर्ष आहे. आयटीआय किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 20000 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय मुलींसाठी एक विशेष शिष्यवृत्ती आहे. ज्यांत दोन वर्षांसाठी 15000 रुपये दिले जातात, आणि प्रत्येक हप्त्याला 7500 रुपये दिले जातात. या शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चात मदत करतात.

शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी योजना

विद्यार्थ्यांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. एलआयसी गोल्डन ज्युबली शिष्यवृत्ती योजना ही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्यामुळे अनेक आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वप्न साकार होण्यास मदत मिळणार आहे.

Bussiness Idea | गृहिणी घरबसल्या करू शकतात ‘हा’ व्यवसाय; महिन्याला होईल भरपूर कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे जात आहेत. महिला त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य मिळवत आहेत. घर संभाळून देखील अनेक पद्धतीने कुटुंबातील महिला देखील नवीन गोष्टी करत आहेत. अशातच आज आम्ही महिलांसाठी घरगुती अशा काही बिजनेस आयडिया घेऊन आलेलो आहोत. ज्या घर बसून चांगला बिजनेस करू शकतात. आणि महिन्याला चांगली कमाई देखील करू शकता. यासाठी त्यांना कुठे बाहेर जाण्याची आवश्यकता देखील लागणार आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा देखील वाचेल.

शिवणकाम | Bussiness Idea

कपडे ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक मोठी गरज आहे. खास करून महिला या प्रत्येक सीझनसाठी वेगवेगळे कपडे घेत असतात. अशातच जर महिलांनी घरबसल्या शिवणकाम करू लागल्या तर तुमचा चांगला फायदा होईल. आजकाल शिवणकामाचे चांगले पैसे देखील मिळतात. तसेच तुम्ही तुमची कला देखील सादर करू शकता. नवनवीन कपडे शिवून तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील विक्रीसाठी ठेवू शकत. यामुळे घर बसल्या तुम्हाला इन्कम चालू होईल.

बेकरीचे पदार्थ

आजकाल मार्केटमध्ये आणि मोठमोठ्या प्रमाणात पदार्थांमध्ये विक्री केली जाते. त्यामुळे अनेक लोकांना हे घरगुती पदार्थ विकत घ्यायला खूप आवडतात. त्यामुळे अनेक लोक सहसा घरी बनवलेले पदार्थ विकत घेत असतात. अशा जर तुम्ही बेकरी पदार्थ घरी तयार केले, तर त्यातून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही चीज केक यांसारखे पदार्थ बनवू शकतात. तसेच instagram किंवा facebook वरून जर तुम्ही चांगली मार्केटिंग केली, तर तुमच्यापर्यंत ग्राहक देखील मिळतील आणि महिन्याला तुमचे चांगली कमाई देखील होईल.

सोशल मीडिया | Bussiness Idea

आज काल आणि लोक युट्युब वरून चांगल्या प्रमाणात पैसे कमावत आहेत. जर तुमच्याकडे एखादे चांगले एक कौशल्य असेल, तर तुम्ही त्याचे व्हिडिओज बनवून ते युट्युबवर सादर करू शकता. youtube च्या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याला इन्कम चालू होईल. यासाठी घरामध्ये तुम्हाला सेटअप तयार करावा लागेल. आणि व्हिडिओ शूट करावे लागतील.

मेस

शहरामध्ये गावाकडून अनेक लोकगीत तसेच विद्यार्थी कामासाठी आणि शिक्षणासाठी येतात. अशावेळी त्यांच्या जेवनाचा प्रश्न असतो. अनेक लोक हे मेस लावतात. जर तुम्ही घरगुती पद्धतीने मेस चालू केली, तर तुमचा चांगला बिजनेस होईल. तुमचे कॉन्टॅक्ट वाढतील आणि हळूहळू तुमच्याकडे खूप जास्त ग्राहक जमा होईल. आणि तुम्ही घरगुती डब्यांचा बिजनेस मोठ्या प्रमाणात चालवू शकता. यातून तुम्हाला चांगले पैसे देखील मिळतील.

घरातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्डवर कसे जोडायचे? वापरा ही पद्धत

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी विविध योजना केल्या आहेत. त्यातील रेशन कार्ड योजना ही खूप लोकप्रिय योजना आहे. भारतातील जवळपास सगळ्याच कुटुंबांकडे रेशन कार्ड असते. या रेशन कार्डवर कुटुंबातील सगळ्या सदस्यांची नावे असतात. आणि या सदस्यांच्या नावावरच आपल्याला अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. रेशन कार्डच्या मदतीने तुम्हाला मोफत रेशन मिळते. यामध्ये तुम्हाला सरकार मार्फत गहू, तांदूळ, तेल, डाळ यांसारखे जीवनावश्यक वस्तू मिळतात. त्यामुळे रेशन कार्डमध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे नाव असणे खूप गरजेचे असते. अगदी नवजात बालक असेल किंवा नवविवाहित स्त्री असेल तरी रेशन कार्डमध्ये त्या व्यक्तीचे नाव जोडणे गरजेचे असते. आता नवीन सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये कसे जोडायचे?हे आज आपण जाणून घेणार आहोत.

ऑनलाईन पद्धतीने करा काम?

तुम्हाला जर तुमच्या रेशन कार्डवर कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडायचे असेल, तर यासाठी आधीपासून तयार केलेले रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. तसेच जर तुम्हाला नवीन मुलाचे नाव जोडायचे असेल, तर त्यासाठी त्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र तसेच पालकाच्या आधार कार्ड गरजेचे असते. जर एखादी नवविवाहित महिला असेल, तर तिचे आधार कार्ड, विवाह प्रमाणपत्र आणि तिच्या पालकांचे रेशन कार्ड आवश्यक असते.

या सगळ्याच्या मदतीने तुम्ही रेशन कार्ड वर कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडू शकता. यासाठी अत्यंत सोप्पी प्रोसेस आहे. यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही. तुम्हाला राज्याच्या अन्नपुरवठ्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. आणि तिथे तुम्ही रेशन कार्डमध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी अर्ज करू शकता.

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्याची प्रोसेस

  • सगळ्यात आधी तुम्हाला राज्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लॉगिन आयडी तयार करा आणि लॉगिन करा.
  • या वेबसाईटवर तुम्हाला नवीन सदस्य जोडण्याचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल.
  • त्या फॉर्ममध्ये नवीन सदस्याचे नाव आणि इतर डिटेल्स धरा.
  • तसेच आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करा.
  • सगळं झाल्यावर तुमचा फॉर्म सबमिट करा.
  • तुमचा फॉर्म सबबिट केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
  • त्यानंतर ह्या या फॉर्मला ट्रॅक करण्यासाठी तुम्ही फार रजिस्ट्रेशन नंबर वापरू शकता.
  • तुमचा फॉर्म आणि सगळ्या कागदपत्राची छाननी केली जाईल.
  • सगळे माहिती जर बरोबर असेल तर नवीन सदस्याचे नाव तुमच्या रेशन कार्डस वर जोडले जाईल.

मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या ‘या’ 13 नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकार विजयी झालेले आहे. आणि यातील भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर या अजूनही फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याची सगळेजण वाट पाहत आहेत. लवकरच हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. आणि या दिवशी दिवाळी अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती महायुतीच्या नेत्यांनी सांगितलेले आहे. या मंत्रिमंडळात शिवसेनेचे 13 नेते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

या राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेचे काही मागील मंत्री आणि नवीन मंत्र्यांसाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांच्या नावाबद्दल दिल्लीमध्ये चर्चा देखील करण्यात आलेली आहे. यामध्ये हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेनेला यावर्षी 13 मंत्री पद मिळणार असल्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच आहेत. यामध्ये शिंदे गटातील गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. तर भरत गोगवले यांचा आता फडणीस सरकारच्या मंत्रिमंडळात गोगावले यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

दिल्लीत चर्चा झालेल्या मंत्र्याची नावे

दिल्लीत जी चर्चा करण्यात आली त्यात गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, आशिष जैस्वाल या मंत्र्यांचा समावेश होता.