Tuesday, December 9, 2025
Home Blog Page 3715

दर कमी-जास्त होतोय : सातारा जिल्ह्यात नवे 566 कोरोना बाधित तर पाॅझिटीव्ह रेट 5.75 टक्के

Satara corona patient

सातारा | सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 566 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 376 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 9 हजार 839 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 5.75 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 703 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 23 हजार 124 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 9 हजार 304 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 393 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 16 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

गुरूवारी रात्री आलेल्या कमी पाॅझिटीव्ह रेटमुळे जिल्हा अनलाॅककडे वाटचाल करत आहे. कराड तालुक्यात प्रशासन कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे. मात्र तरीही बाधित वाढत असल्याने डोकेदुखी वाढत आहे.

50 टक्क्यांच्या मर्यादेवर 102 वी घटनादुरुस्ती निरुपयोगी ; शिवसेनेचा केंद्र सरकार वर हल्लाबोल

raut and modi

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र | मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत महत्त्वाचा बनला असून केंद्र सरकारनं 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु 50 टक्के आरक्षणाची तरतूद असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण व 102 वी घटनादुरुस्ती वगैरे करण्याची जबाबदारी केंद्रावर टाकली. महाराष्ट्र विधानसभेने याबाबत केलेला कायदा मान्य केला नाही. त्यामुळे आता केंद्र सरकार काय करतेय याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. आता मराठा समाजाला मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मंजूर केला आहे. या केंद्रीय निर्णयाचे स्वागत करावे की गुंता जास्त वाढवून त्या गुंत्यास मराठा आरक्षणाचा विषय गुप्तेवून ठेवल्याबद्दल निषेध करायचा? असा सवाल शिवसेनेने केला.

कोल्हापूरचे संभाजी छत्रपती यांनी देशाचे कायदा, न्याय मंत्री किरण रिजीजू यांची भेट घेतली व नव्या प्रस्तावासंदर्भात चर्चा केली. या चर्चेचे फोटो स्वतः छत्रपती संभाजी राजे यांनी प्रसिद्ध केले आहेत. याचा अर्थ असा घ्यावा का की, केंद्राने घेतलेल्या निर्णयाशी छत्रपती संभाजी हे सहमत आहेत? पण केंद्र सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे सरळ टोलवाटोलवी आहे असे मराठा समाजाचे प्रमुख चळवळया नेत्यांचे ठाम मत आहे.

स्वतः श्री. अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या टोलवाटोलवीवर हल्ला केला आहे. सरकार दिशाभूल करीत आहे. 102 व्या घटनादुरुस्तीचे स्वागतच आहे, पण त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही, असे श्री. चव्हाण म्हणत आहेत. याचे कारण असे की, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय अर्धवट आहे. आरक्षण मिळण्यासाठी 50 टक्क्यांची मर्यादा जाणे गरजेचे आहे. 50 टक्के आरक्षणाची तरतूद असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. म्हणजे केंद्र सरकारने 102 व्या घटनादुरुस्तीचा निर्णय घेतला, पण 50 टक्क्यांच्या बेडय़ा कायम आहेत. 50 टक्क्यांच्या मर्यादिवर 102 वी घटनादुरुस्ती निरुपयोगी आहे.

आरक्षणाच्या मुद्दयावर स्वतः मुख्यमंत्री ठाकरे हे दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांना भेटले आहेत. 50 टक्के आरक्षणाची बेडी तोडल्याशिवाय घटनादुरुस्ती आणि राज्यांना अधिकार देऊन उपयोग नाही, असे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले होते. तरीही केंद्राने तोच उलटासुलटा निर्णय घेऊन राज्य व मराठा समाजाची कोंडी केली.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलाच आहे. आज तो शांत असला तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. सध्या जे लोक भाजपमध्ये बसून या आंदोलनातील खदखद वाढवत आहेत त्यांना तरी सरकारचा हा अर्धवट निर्णय पटला आहे काय? चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अनेकदा असे म्हणणे पडले की, ‘मराठा आरक्षणाचा तिढा फक्त भारतीय जनता पक्षच सोडवू शकतो. महाराष्ट्रात त्यांचे सरकार नसल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. राज्य सरकारचीच आरक्षणाबाबत अनास्था आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयानेच आरक्षण हा केंद्राचा अधिकार आहे. राज्यांचा तो अधिकार नाही असे बजावले. प्रश्न इतकाच आहे की, केंद्राने आज जो निकाल दिला तो चंद्रकांत पाटील, राणे वगैरे पुढारयांना मान्य आहे काय? असा सवाल करत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.

मराठा आरक्षणाची कोंडी फुटावी अशी केंद्राकडून अपेक्षा असताना त्यांनी राज्यांना व मराठा समाजास कात्रजचा घाट दाखवला आहे. मराठा समाजाला कोणत्या वर्गातून आरक्षण द्यायचे यावरच वाद होता व तो वाद केंद्राने कायम ठेवला आहे. इंद्रा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा घटली आहे. त्यामुळे आरक्षणाचे अधिकार राज्यांना राहिलेले नाहीत, हे केंद्राला माहीत नव्हते काय? केंद्राने असे का केले? घटनादुरुस्ती करताना 50 टक्के मर्यादा शिथिल करून राज्यांना अधिकार द्यावेच लागतील. नाहीतर आजच्या निर्णयाचा उपयोग नाही म्हणजे नाहीच!

महिला हाॅकीत थरार : भारताचे कांस्यपदकाचे स्वप्न अधुरे, ब्रिटनचा 4-3 ने विजय

टोकोयो |  तीनवेळा ऑलिम्पिक विजेत्या ब्रिटनसोबत भारताच्या महिला संघाचा सामना झाला. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील संघ ग्रेट ब्रिटनशी जोरदार भिडला. पहिल्यांदाच महिला हॉकी संघाजवळ पदक मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. कांस्य पदकाच्या या सामन्यात भारत-ब्रिटनमध्ये ‘थरार’ पाहायला मिळाला, मात्र शेवटच्या काही वेळात ब्रिटनने केलेल्या दोन गोलमुळे 4-3 असा सामना भारताने गमावला.

ब्रिटनने 2 ऱ्या आणि 10 व्या मिनिटाला सलग दोन पेनल्टी काॅर्नर मिळाले होते, मात्र भारतीय महिलांनी अतियश चांगला खेळ करत गोल करू दिला नाही. पहिला क्वार्टरमध्ये 15 मिनटाच्या खेळात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. ब्रिटेनला पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन संधी मिळाल्या पण भारतची गोलकीपर सविता पुनियाने दोन्ही वेळी शानदार बचाव केला. पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटेनचा संघाचा खेळ वरचढ ठरलेला होता.

ब्रिटनने दूसऱ्या क्वार्टरची शानदार सुरुवात केली आहे. सामन्याच्या 16 व्या मिनटाला ब्रिटनने पहिला गोल केला. इली रायरने फील्ड गोल केला. त्यामुळे भारत 0-1 ने सध्या पिछाडीवर आहे. ब्रिटनने 24 व्या मिनिटांला दूसरा गोल रिवर्स शॉटद्वारे साराह रोबोस्टनने केला. या गोलमुळे ब्रिटेन 2-0 ने सामन्यात आघाडीवर होते. गुरजीत कौरने टीम इंडियाचं सामन्यात पुनरागमन करुन दिलं आहे. तिने दोन शानदार गोल केले आहेत. गुरजीतने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केले. गुरजीतने 2 मिनिटांच्या आतमध्ये हे दोन्ही गोल केले. तिने पहिला गोल 25 व्या मिनिटाला केला तर दूसरा गोल 26 व्या मिनिटाला केला. या गोलबरोबरच भारताने ब्रिटेनशी 2-2 अशी बरोबरी केली.

पहिल्या क्वार्टरनंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचा शानदार खेळ केलेला पाहायला मिळाला. पहिल्यांदा गुरजीत कौरने 3 मिनिटांत 2 करुन भारताचं सामन्यात पुनरागमन करुन दिलं. लगोलग भारताने आणखी एक गोल करत 3-2 ने आघाडी मिळविली होती.

तिसऱ्या क्वार्टरची आक्रमक सुरुवात करत ब्रिटनकडून तिसरा गोल केला गेला. ब्रिटनच्या वेबने 35 व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला भारताशी बरोबरी करण्याची संधी दिली. यानंतर भारतला पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतु गुरजीत कौरला गोल करण्यात अपयश आलं. त्यामुळे 35 व्या मिनिटांला भारत- ब्रिटन या दोन्ही संघाचा स्कोअर 3-3 असा बरोबरीत होता. परंतु काही वेळातच चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला ब्रिटनने चौथा गोल केला. ब्रिटन 4-3 ने विजय मिळवला. मात्र कांस्य पदकाच्या सामन्यात भारत-ब्रिटनमध्ये ‘थरार’ पाहायला मिळाला.

तहसिलदार अमरदीप वाकडे यांची नियमबाह्य बदली रद्द करावी : रयत क्रांती संघटनेची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या बदलीचे आदेश झाले आहेत. मात्र ही बदली अन्यायकारक असून नियमबाह्य असून त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. अद्याप सहा महिने बाकी असताना झालेली बदली रद्द करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात तहसीलदार वाकडे यांनी कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन खूप चांगले काम केले आहे. कोरोना काळात शासनाच्या निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबर रुग्णालय व कोरोना सेंटर सुरू करून रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यात यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. नुकत्याच उद्भवलेल्या महापुराची परिस्थिती त्यांनी योग्य पद्धतीने हाताळली. नदीकाठावरील हजारो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. त्यांना आवश्यक सेवा पुरविल्या.

उपेक्षित, गरीब, गरजूंना रेशन कार्ड व त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कराडकर यांच्या वतीने आम्ही निवेदन देत असून तहसीलदार वाकडे यांची अन्यायकारक बदली रद्द करावी. दरम्यान शेतकरी नेते सचिन नलवडे व शेतकऱ्यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांची अन्यायकारक बदली रद्द व्हावी, या मागणीचे निवेदन दिले आहे.

Dream XI स्पोर्ट्स गेम का जुगार? सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निकाल

suprim court

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ड्रीम इलेव्हन नावाच्या स्पोर्ट्स गेमवर बंदी घालण्याच्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आज महत्वाचा निर्णय सुनावला आहे. या अगोदर राजस्थान हायकोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने ड्रीम 11 वर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती आरएफ नरिमन आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

ड्रीम 11 हा एक ऑनलाईन फॅन्टसी स्पोर्ट्स गेम आहे, यामध्ये लाईव्ह मॅच सुरू व्हायच्या आधी फॅन्टसी स्पोर्ट्स टीम बनवता येते, तसंच चाहत्यांना स्पर्धांमध्येही भाग घेता येतो. मॅच संपल्यानंतर चाहत्याने निवडलेल्या खेळाडूंना सर्वाधिक पॉईंट्स मिळाले, तर त्याला पुरस्कार म्हणून रोख रक्कम देण्यात येते. या विरोधात चंद्रेश सांखला नावाच्या एका व्यक्तीने राजस्थान हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याने आपल्या याचिकेत ड्रीम 11 च्या नावाने लोकांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप केला होता.

यावर राजस्थान हाय कोर्टाने ही याचिका फेटाळत पंजाब-हरियाणा आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला. ड्रीम 11 जुगार आणि सट्टेबाजी नसल्याचं मत हायकोर्टाने मांडलं होतं. पंजाब ऍण्ड हरियाणा हायकोर्टाने ड्रीम 11 वर बंदीची याचिका फेटाळली होती. ‘ड्रीम 11 सारख्या ऑनलाईन खेळात वापरकर्त्यांना पुरस्कार व्यायाम, चांगलं ज्ञान, निर्णय आणि लक्ष यामुळे मिळतात. हा कौशल्याचा खेळ आहे,’ असं निरिक्षण पंजाब ऍण्ड हरियाणा हायकोर्टाने नोंदवलं होते. तसेच मुंबई हायकोर्टानेही हा खेळ कौशल्याचा असून एखाद्या विशिष्ट टीमच्या विजय किंवा पराभवावर अवलंबून नाही, असं मत नोंदवले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या खूनाने खळबळ; ग्रामपंचायत सदस्य म्हणुन पाहत होता काम

कोरेगाव । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या खूनाने एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिक्ह्यातील गोगावलेवाडी, ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून दोन दिवसांपूर्वी खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयातील शालेय आरोग्य तपासणी मोहिमेच्या खाजगी वाहनावरील चालक मंगेश गणपत जाधव वय ३५, याचा कुमठे गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यानजिक शिवार रस्त्यावर निर्घुणपणे खून करण्यात आला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, मंगेश जाधव हा गोगावलेवाडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता असून, सातारा जिल्हा नाथ समाजाचा पदाधिकारी होता. ग्रामपंचायत निवडणुकीत तो विजयी झाला होता. सक्रीय सदस्य म्हणून तो ग्रामपंचायतीत दैनंदिन कामकाज पाहत होता.

रुग्णालयामार्फत संपूर्ण तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण मोहीम राबविणाऱ्या पथकाच्या खाजगी टाटा सुमो वाहनावर चालक म्हणून काम गेल्या एक वर्षापासून काम करत होता. बुधवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास तो कोरेगाव येथे कामावर जाण्यासाठी गोगावलेवाडी येथून निघाला. तसे तो घरात सांगून गेला होता. सायंकाळी तो घरी परत आला नाही, म्हणून आई व पत्नी काळजीत होत्या.

नेहमी वेळेत घरी परतणारा, आज उशिरापर्यंत घरी कसा आला नाही, ही बाब खटकली. त्यामुळे त्यांनी मंगेश याच्या दोन्ही मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही क्रमांक स्वीच ऑफ येत होते. त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र त्यांनी देखील मंगेश आमच्याकडे आला नाही, असे सांगितले. त्यामुळे घरातील लोकांमध्ये काळजी वाढली.

गुरुवार दि. ५ ऑगस्ट रोजी आई शोभा हा गावातील शेजारीच असलेल्या यश बेबले याला बरोबर घेऊन सकाळी ७.३० च्या सुमारास कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात गेल्या, तेथे सुमो वाहनाचे मालक व अन्य कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी ५ वाजेपर्यंत मंगेश हा रुग्णालयातच होता, तेथून तो कोठे गेला, हे माहीत नाही, असे सांगितले. त्यानंतर त्या कोरेगाव पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता झाला असल्याची तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या.

त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडील माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांना धोम डाव्या कालव्यानजिक शिवाराच्या रस्त्यावर नेले. तेथे रस्त्याकडेला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला युवकाची माहिती दिली व त्याचा चेहरा दाखविला, तो मंगेश असल्याचे आई शोभा जाधव यांनी ओळखले. अज्ञात व्यक्तीने मंगेश याचा खून केला असल्याचे पोलिसांना आढळून आले.

त्यानंतर शोभा गणपत जाधव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व पोलीस नाईक अमोल सपकाळ तपास करत आहेत.

तालिबानने दिले मैत्रीचे संकेत, म्हणाले,” भारताकडे पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून पाहत नाही”

काबूल । अफगाणिस्तानात दहशत निर्माण करणाऱ्या तालिबानने भारताशी मैत्रीचे संकेत दिले आहेत. तालिबानने म्हटले आहे की, ते भारताला पाकिस्तानच्या नजरेतून पाहत नाही. अफगाणिस्तानमध्ये भारतासह कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रकल्पांना कोणताही धोका नाही. मात्र, तालिबानने यासाठी एक अटही घातली आहे. दहशतवादी संघटनेचे म्हणणे आहे की, जर भारताने अश्रफ घनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गोळीबाराला पाठिंबा देणे बंद केले तर त्यांच्या प्रकल्पांना काही इजा होणार नाही.”

असे पहिल्यांदाच घडले आहे कि,तालिबानने भारताशी शांततेबाबत बोलणी केली आहे. ‘दी ट्रिब्यून’ ने आपल्या रिपोर्टमधील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘तालिबान शिष्टमंडळ इराण, रशिया आणि चीन सारख्या देशांशी चर्चा करत आहे आणि काही प्रमाणात असेच प्रस्ताव सादर करत आहे.’

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद हे संघटनेचे संदेश आंतरराष्ट्रीय माध्यमांपर्यंत पोहोचवतात. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे, ‘आम्ही कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रकल्पांबाबत धमकी देत ​​नाही किंवा विरोध करत नाही. आम्ही अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक करणाऱ्या देशांच्या बाजूने आहोत. आम्ही काही दिवसांपूर्वीच चीनला भेट दिली. चीनकडून आमच्या मुख्य मागण्यांपैकी एक म्हणजे त्यांनी अफगाणिस्तानबरोबर व्यापार आणि गुंतवणुकीत सहकार्य केले.’

भारताशी चांगले संबंध ठेवण्याची इच्छा आहे
मुलाखतीत जबीउल्लाहने तालिबान भारताच्या पाकिस्तानच्या प्रिझमद्वारे पाहत असल्याचे नाकारले. जबीउल्लाह म्हणाले की,” तालिबानला या क्षेत्रातील एक महत्त्वाचा देश म्हणून भारताशी चांगले संबंध हवे आहेत.”

अमेरिकन सैन्य माघारी आल्यापासून तालिबान अफगाणिस्तानमध्ये दहशत निर्माण करत आहे. त्याने देशातील अनेक महत्त्वाची क्षेत्रे काबीज केली आहेत. तालिबानच्या वाढत्या पावलांमुळे भारत देखील चिंतित आहे, कारण त्याने अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

PSI होण्याचे स्वप्न राहिले अधुरे, विद्यार्थ्याचे हृदयविकाराने निधन

Police

जालना : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या मृत विद्यार्थ्याचे नाव अशोक सोनाजी घुले असे आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील आंबा या ठिकाणी बुधवारी दुपारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

अशोकचे पोलिस उपनिरीक्षक व्हायचे स्वप्न होते. मात्र त्याचे स्वप्न अपुरेच राहिले आहे. हे स्वप्न वास्तवात येण्यापूर्वीच तो जग सोडून गेला आहे. आंबाचे सोनाजी घुले यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांच्या दोन मुलांपैकी अशोक हा गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद येथे एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होता.

काही दिवसांवर परीक्षा आली होती. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही परीक्षा रद्द होईल का? याची चिंता अशोकला सतावत होती. तो काही दिवसांपूर्वीच आंबा या आपल्या गावी आला होता. बुधवारी वडिलांना शेतात मदत करण्यासाठी तो गेला होता. दुपारी त्याच्या छातीत अचानक वेदना होऊ लागल्या. त्यानंतर तो एका झाडाखाली बसला. तिकडेच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गणेश मंदिराची तोडफोड, भारताच्या नाराजीमुळे पाकिस्तान बॅकफूटवर; दिले चौकशीचे आदेश

imran khan

इस्लामाबाद । भारताने गणेश मंदिर पाडण्याबाबत कडकपणा दाखवल्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने या विषयावर ट्विट केले आहे. त्याने म्हटले आहे कि,” भोंगच्या गणेश मंदिरावरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. मी पंजाब पोलिस महानिरीक्षकांना सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश आधीच दिले आहेत. तसेच पोलिसांच्या निष्काळजीपणावरही कडक कारवाई झाली पाहिजे. सरकारकडून मंदिराची पुनर्बांधणीही केली जाईल.”

यापूर्वी भारताने या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गुरुवारी एका गणेश मंदिराच्या तोडफोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताने या घटनेबाबत आपली भूमिका कठोर केली आहे आणि पाकिस्तान उच्चायुक्ताच्या प्रभारींना बोलावून याबाबतीत नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की,”पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समुदायाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर होत असलेल्या हल्ल्यांबाबत भारताने पाकिस्तानी राजनायकाकडे गंभीर चिंता व्यक्त केली.”

Attack On Ganesh Temple: Latest News, Photos and Videos on Attack On Ganesh  Temple - ABP Live

तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
मंदिर तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, काही लोकं लाठ्या आणि काठ्या घेऊन मंदिरात प्रवेश करत आहेत आणि मूर्ती तोडत आहेत. या लोकांनी मंदिराच्या इतर ठिकाणांचेही नुकसान केले आहे. या घटनेनंतर परिसरातील पोलिसांनी मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले तैनात केली आहेत.

इम्रान खानच्या पक्षाचे हिंदू खासदार रमेश वंकवानी यांनी भोंग शरीफच्या गणेश मंदिरातील तोडफोड आणि हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, “दोषींना अटक करून कठोर शिक्षा केली पाहिजे.”

SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! उद्या बँकेच्या ‘या’ सर्व्हिस 3 तास बंद राहणार; त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या 44 कोटी खातेधारकांसाठी महत्वाची माहिती जारी केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना ट्विट करून अलर्ट केले आहे आणि त्यांना त्यांच्या गरजेनुसार बँकिंगशी संबंधित कामे आधीच करण्याचे आवाहन केले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही महत्वाची माहिती जारी केली आहे आणि म्हटले आहे की आज आणि उद्या बँकेच्या काही महत्वाच्या सर्व्हिस बंद राहतील.

खरं तर, SBI ने ट्विटरवर म्हटले आहे की, सिस्टमच्या देखभालीमुळे बँकेच्या काही सेवा 6 आणि 7 ऑगस्टला बंद राहतील. या सर्व्हिस मध्ये इंटरनेट बँकिंग, Yono, Yono Lite आणि UPI सर्व्हिस समाविष्ट असतील. 6 आणि 7 ऑगस्टच्या रात्री 10:45 ते 1.15 (150 मिनिटे) रात्री या सर्व्हिस उपलब्ध होणार नाहीत, असे SBI ने एका ट्विटद्वारे सांगितले.

SBI ने दिलेल्या माहितीनुसार, याचे कारण असे आहे की,” बँक आज आपले UPI प्लॅटफॉर्म अपग्रेड करेल, जेणेकरून ग्राहकांचा अनुभव सुधारता येईल. या दरम्यान, UPI सर्व्हिस ग्राहकांसाठी बंद केली जाईल.

यापूर्वीही ही सर्व्हिस बंद होती
SBI पहिल्यांदाच कोणतीही सर्व्हिस बंद करत आहे असे नाही. याआधीही 16 आणि 17 जुलै रोजी बँकेने रात्री 10:45 ते दुपारी 1.15 पर्यंत या सर्व्हिस बंद केल्या होत्या.