Tuesday, December 9, 2025
Home Blog Page 3714

शिक्षण व्यवस्थेत समन्वयाचा अभाव; निकाल उशिरा लागल्याने सीईटी नोंदणीची संधी हुकली

SSC student

औरंगाबाद | अकरावी प्रवेशासाठी शास्त्र आणि सीईटी परीक्षा जाहीर केली आहे. यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया 2 ऑगस्ट पर्यंत होती. सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी जाहीर झाल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी प्रक्रिया राहिली आहे. आता अर्ज नोंदणीची मुदत संपल्याने अडचण निर्माण झाली आहे. शासनाने प्रवेशासाठी प्रथम प्राधान्य सीईटी दिलेल्यांना असेल असे म्हटल्याने सीबीएससीच्या विद्यार्थ्यांचा विचार व्हावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नववीच्या गुणांच्या आधारे मूल्यमापन करत दहावीचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय देण्यात आला होता. इतर वेळी परीक्षा घेऊन उत्तरपत्रिका तपासणी सोपे होते. मूल्यांकनाच्या आधारे निकालात उशीर झाला होता. आईसीएससी नंतर राज्य मंडळाची आणि तीन ऑगस्ट रोजी सीबीएससी बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात आले. अकरावी प्रवेशाची घेण्यात येणारी सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी होणार असल्याने त्यासाठी अर्ज नोंदणी करिता विद्यार्थ्यांना 2 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

अर्ज नोंदणीसाठी देण्यात आलेले संकेतस्थळ तांत्रिक अडचणीमुळे बंद ठेवण्यात आल्यानंतर ही मुदत वाढ करण्यात आली नाही. नियोजित नोंदणीची मुदत आता संपली आहे. या सर्व प्रकारात सीबीएसईच्या अनेक विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतीक्षेत अर्ज नोंदणी न केल्याने सीईटीची संधी हुकल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Gold Price : सोन्याचे दर सतत घसरत आहेत, आज सोने किती स्वस्त झाले जाणून घ्या

नवी दिल्ली सोने-चांदीचे भाव आज, शुक्रवार, 06 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा खाली आले आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX), ऑक्टोबरच्या डिलिव्हरीसाठीचे सोने 0.26 टक्क्यांनी घसरून 47,480 रुपयांवर आले. यासह, चांदीमध्येही मोठी घसरण दिसून आली आहे.

आज सोने कोणत्या दराने विकले जात आहे जाणून घ्या
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोने 0.26 टक्क्यांनी घसरून 47,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

आज चांदीची किंमत
जर आपण चांदीबद्दल बोललो तर आज त्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. आज 1 किलो चांदीची किंमत 0.41 टक्के घसरल्यानंतर 66,720 रुपयांवर आली आहे.

सोने 90,000 रुपयांची पातळी ओलांडू शकते
कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरणाच्या गतीमध्ये वाढ झाल्यामुळे जगभरात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. दरम्यान, 25 कोटी क्वाड्रिगा इग्निओ फंड हाताळणारे डिएगो पॅरिला म्हणतात की,” पुढील 3-5 वर्षात सोन्याचे भाव दुप्पट होतील. या दरम्यान, सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमत 3000 ते 5000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. जर आपण भारताच्या दृष्टिकोनातून डिएगोचा अंदाज समजून घेतला तर पुढील 5 वर्षात सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 90,000 रुपयांची पातळी ओलांडू शकतात.”

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर यासाठी सरकारने एक App बनवले आहे. ‘BIS Care app’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App द्वारे, आपण केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता. या मध्ये जर मालाचा लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळला तर ग्राहक त्याबद्दल लगेच तक्रार करू शकतो. या App द्वारे ग्राहकाला तक्रार नोंदवण्याची माहितीही लगेच मिळेल.

…तर पवारांची लोंबतेगिरी करणाऱ्या राऊतांवर ही वेळच आली नसती; राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सामना अग्रलेखातून भाजप आणि केंद्र सरकार वर टीका केली आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार नसल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही असे नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील म्हणत असले तरी सर्वोच्च न्यायालयानेच आरक्षण हा केंद्राचा अधिकार आहे असं म्हंटल्यानंतर राणे आणि चंद्रकांत पाटील यांना कोर्टाचा हा निकाल मान्य आहे का असा सवाल करत टोला लगावला होता.

यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला. पवारांची लोंबतेगिरी करणाऱ्या राऊतांनी जशी सत्तेसाठी लोंबतेगिरी केली.. तीच जर मराठा आरक्षणासाठी केली तर.. आजचा अग्रलेख लिहायची वेळच आली नसती!! अस ट्विट नितेश राणे यांनी केले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते-

चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अनेकदा असे म्हणणे पडले की, ‘मराठा आरक्षणाचा तिढा फक्त भारतीय जनता पक्षच सोडवू शकतो. महाराष्ट्रात त्यांचे सरकार नसल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. राज्य सरकारचीच आरक्षणाबाबत अनास्था आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयानेच आरक्षण हा केंद्राचा अधिकार आहे. राज्यांचा तो अधिकार नाही असे बजावले. प्रश्न इतकाच आहे की, केंद्राने आज जो निकाल दिला तो चंद्रकांत पाटील, राणे वगैरे पुढारयांना मान्य आहे काय? असा सवाल करत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.

Petrol Price : पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर, आज किती महाग झाले ते जाणून घ्या

नवी दिल्ली सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 107.83 रुपये आणि डिझेल 97.45 रुपये प्रति लीटर आहे. गेल्या एक आठवड्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण

चीनमधील कमकुवत आर्थिक वाढ, कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे आणि ओपेक+ उत्पादन वाढीच्या चिंतांमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर दिसून येतो. आता असे मानले जात आहे की येत्या काही दिवसात पेट्रोलचे दर 5 रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. सध्या देशभरात अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे विकले जात आहे.

MCX वर, ऑगस्टसाठी कच्च्या तेलाची डिलिव्हरी 73 रुपये किंवा 1.32 टक्क्यांनी कमी होऊन 5,444 रुपये प्रति बॅरलवर 6,313 लॉटसह झाली. सप्टेंबर डिलिव्हरी 69 किंवा 1.26 टक्क्यांनी घसरून 5,415 रुपये प्रति बॅरल झाली आहे. मे महिन्यापासून तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. 42 दिवसांत पेट्रोल 11.52 रुपयांनी महाग झाले आहे. याशिवाय सोमवार, 12 जुलै रोजी डिझेलच्या किंमतीत किंचित मंदी आली. त्याचवेळी 15 जुलै रोजी डिझेलच्या किमतीत वाढ झाली.

 

आपल्या शहरात पेट्रोल डिझेल कितीला विकले जात आहे ते पहा
>> दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये तर डिझेल प्रति लिटर 89.87 रुपये आहे.
>> मुंबईत पेट्रोल 107.83 रुपये तर डिझेल प्रति लिटर 97.45 रुपये आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 102.49 रुपये तर डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर आहे.

>> बेंगलुरु मधील पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लिटर आहे.

>> लखनऊ – पेट्रोल 98.69 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लिटर आहे.
>> पाटणा – पेट्रोल 104.57 रुपये आणि डिझेल 95.51 रुपये प्रति लिटर आहे.
>> भोपाळ – पेट्रोल 110.20 रुपये तर डिझेल 98.67 रुपये प्रति लिटर आहे.
>> जयपूर – पेट्रोल 108.71 रुपये तर डिझेल 99.02 रुपये प्रति लिटर आहे.
>> गुरुग्राम – पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आता आपण एसएमएसद्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची राज्य सरकारवर टीका

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुणे मेट्रो, कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांच्यानंतर आज भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी
पुण्यामधील पॉजिटिव्हीटी रेशो हा 4 टक्केपेक्षा ही खाली असताना राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचे सांगत राज्य सरकारने अशा प्रकारे दुजाभाव करणे हे रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण आहे, अशी टीका केली आहे.

भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर दररोज टीका केली जात आहे दरम्यान भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुणे येथील पॉजिटिव्हीटी रेशो वरून राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, पुण्यामध्ये गेले महिनाभर पॉजिटिव्हीटी रेशो हा 4 टक्के पेक्षा ही खाली असताना देखील केवळ भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची भावना पुणेकरांमध्ये निर्माण होत आहे. राज्य सरकारने अशा प्रकारे दुजाभाव करणे हे रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण आहे.”

पुणे येथील पॉजिटिव्हीटी रेशोवरून काल अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर आज भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत आता राज्य सरकारकडून पुणे येथील पॉजिटिव्हीटी रेशोबाबत काय भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकार चालवताय की दाऊदची गँग?; भाजपची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र | भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरून भाष्य करताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तिघाडी मिळून, सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय? अशा शब्दात शेलारांनी ठाकरे सरकारवर जळजळीत टीका केली. आशिष शेलार यांनी एकामागून एक ट्विट करत अनिल देशमुख प्रकरण, राज्यपालांचा महाराष्ट्रभर दौरे आणि आमदारांचे निलंबन अशा विविध मुद्द्यावरून सरकारवर टीका केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील गुन्ह्याच्या तपासाप्रकरणी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करण्याबाबतच सरकारकडून सहकार्य केले जात नाही. उलट सहाय्यक पोलीस आयुक्ताकडून आमच्या अधिकाऱ्यांना धमकावले जात असल्याचा आरोप सीबीआयने गुरुवारी उच्च न्यायालयात केला. . यावरून शेलार यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

राज्यपाल आणि विरोधीपक्ष नेते अडचणीत असलेल्या जनतेला भेटायला गेले, तर सरकारच्या पोटात कळ येते. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप असलेल्या पोलीस बदल्या भ्रष्टाचार प्रकरणातील कागदपत्रे सीबीआयला राज्य सरकार देत नाही.न्यायालयाचे आदेशही मानत नाहीत.” असे शेलारांनी म्हटले आहे.

तसेच राज्यपाल आणि महाविकास आघाडीमध्ये होत असलेल्या वादावरून देखील शेलारांनी निशाणा साधला तसेच पावसाळी अधिवेशनात भाजप आमदारांच्या निलंबनावरून देखील त्यांनी सरकारवर टीका केली. सरकार विरोधात लिहिले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडला…मंत्र्यांना प्रश्न विचारले तर ठाण्याच्या करमुसे सारख्यांना जीव जाईपर्यंत मारले तसेच आमदारांनी विधानसभेत ओबीसी विषयावर खडा सवाल केला तर आमदांना निलंबित केले असे ट्विट आशिष शेलार यांनी केलं

अनिल देशमुख प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्तांनीच चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकावले..राज्यात फक्त आणि फक्त काय”द्यायचे” राज्य आहे का?तिघाडी मिळून, सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय? असा जळजळीत सवाल करत त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

शाॅट सर्किटचा धोका : मेढा पोस्ट ॲाफीसमध्ये वस्तूंना हात लावताच बसतो शाॅक

मेढा | जावली तालुक्यातील मुख्य ठिकाण म्हणुन ओळख असलेल्या मेढा शहरातील पोस्ट कार्यालयाची इमारतीत पाणी गळती होत आहे. या गळतीमुळे विद्युत उपकरणांवर पावसाचे पाणी साचत असल्याने शॅार्ट सर्किटचा धोका निर्माण झाला आहे. मेढा पोस्ट ॲाफिसमधील कर्मचारी जीव मुठीत घेवून पाण्याच्या ओलाव्यात असुरक्षित काम करत असल्याच धोकादायक चित्र मेढा पोस्ट कार्यालयात पाहायला मिळत आहे. तसेच कर्मचारी व येणाऱ्या नागरिकांना वस्तूंना हात लावताच शाॅकचा अनुभव मिळत आहे. तेव्हा याकडे संबधित कधी लक्ष देणार असा सवालही केला जात आहे.

मेढा पोस्ट कार्यालयातील कागदपत्रे देखील भिजत आहेत. गत १० वर्षापासून मेढ्याच्या मुख्य चैाकातील धनावडे मार्केटमध्ये कार्यालय आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पोस्ट कार्यालयात पावसाच्या पाण्याची गळती ठिकठीकाणी होत आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या टेबल व खुर्ची याच्यासह कार्यालयीन कम्प्युटरवर सुद्धा पाण्याच्या गळतीत भिजलेले आहेत. इलेक्ट्राॅनिक्स व इलेक्ट्रीक वस्तू हाताळताना कर्मचाऱ्यांना शाॅक बसत असून त्यांचा फटका सर्वसामान्य नागरीकांना सुद्धा शॅाकचा अनुभव आला आहे.

मेढा पोस्ट कार्यालयाची सध्याची जागा बदलण्याकरीता जिल्हा कार्यालयाकडून जागा शोधण्याचे काम सुरु आहे. मात्र त्याला अद्याप यश आले नाही. तेव्हा पोस्ट कार्यालयात एखाद्याचा जीव गेल्यावरच उपाययोजना होणार का ? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरीकांच्याकडून होत आहे.

आरक्षणाच्या मुद्यावर संकुचित आणि राजकीय विचार करण्याची मानसिकता सोडून द्या; अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोला

ashok chavan fadanvis

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र | मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत महत्त्वाचा बनला असून केंद्र सरकारनं 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. पण मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना अधिकार देतानाच ५० टक्के आरक्षण मर्यादाही शिथिल करावी, अशी मागणी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली होती. परंतु, ही मागणी संविधानाच्या मुलभूत चौकटीत बसत नसल्याचे विधान फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांमध्ये केले आहे. त्याला चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संविधानात आरक्षणाची मर्यादा नमूद नाही. ५० टक्के आरक्षण मर्यादा ही न्यायालयांच्या विविध निवाड्यातून समोर आली आहे. आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारला घटनात्मक तरतूद करणे शक्य आहे. तर मग तोच न्याय मराठा आरक्षणाला देण्याची मागणी संविधानाच्या चौकटीबाहेरची कशी असू शकते? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला.

मराठा आरक्षण देण्याची भाजपची प्रामाणिक इच्छा असेल तर हे अजिबात अशक्य नाही. देवेंद्र फडणवीस किमान एकदा या विषयावर नरेंद्र मोदींशी चर्चा करण्याचे धाडस दाखवतील का? असेही आव्हान चव्हाण यांनी दिले. भाजपची सत्ता नाही म्हणून राज्यात असंतोष निर्माण करण्याऐवजी फडणवीस यांनी मराठा आरक्षण सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यातून आरक्षणाचा मार्ग सुकर झाला तर त्याचे पूर्ण श्रेयही त्यांनीच घ्यावे. पण मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संकुचित आणि राजकीय विचार करण्याची मानसिकता सोडून द्यावी, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.

सर्वोच्च न्यायालय मोदी सरकारच्या खिशात ; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारवर शेतकरी आंदोलन, ‘पेगॅसस’ अशा मुद्द्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल केंद्र सरकारवर निशाणा साधल्यानंतर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयावरून राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ” सर्वोच्च न्यायालय मोदी सरकारच्या खिशात असल्याचे राऊतांनी यावेळी म्हंटले.

दिल्ली येथे आज विरोधी पक्षांनी बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी आशावाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, गेल्या आठवडाभरापासून विरोधी पक्षांकडून शेतकरी आंदोलन, ‘पेगॅसस’ या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, मोदी सरकार काहीही एकूण घेत नाही. आता या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयातच जाणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे कि ‘पेगॅसस’ हा विषय गंभीर असेल तर चौकशी करणे गरजेचे आहे.

मात्र, हे सरकार विरोधकांप्रमाणे सर्वोच्च न्यायलयाचेही ऐकत नसल्याचे दिसते. संसद, न्यायालय, प्रशासन आणि माध्यमे कोणाच्याही संदर्भात या मोदी सरकारची भूमिका ही प्रामाणिकपणाची नाही. जर सर्वोच्च न्यायालयाचे सरकार ऐकायला तयार नसेल तर, सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे या भूमिकेत मोदी सरकार आहे, अशी टीका राऊतांनी यावेळी केली.

हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणा; रवी राणांचे संजय राऊतांना आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अपक्ष आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. कोणावरही टीका करून प्रसिद्धी मिळवण्याची सवय संजय राऊत यांना झाली असून त्यांनी हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणून दाखवावे. असे आव्हान रवी राणा यांनी राऊतांना दिले आहे.

महाराष्ट्रासह विदर्भात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांच्यावर टीका करीत आहे. तसेच अमरावतीच्या मेळघाट परिसरात गेल्या ३ महिन्यात ४९ बालमृत्यू झाले. याकडे मुख्यमंत्री लक्ष देत नसून त्यांनी विदर्भ दौरा केला नाही अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ही टीका केली.

मुसळधार पावसामुळे विदर्भाचं मोठं नुकसान झालं. अमरावतीत देखील पावसामुळे अनेकांची घरे पडली. शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं. अनेक शेतकरी वाहून गेले, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी विदर्भाचा दौरा केला नाही, अशी खंत रवी राणा यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत तुमच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात घेऊन या, असं आव्हान देखील त्यांनी संजय राऊतांना दिलं आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणावे आणि मगच टीका करावी अशा शब्दांत रवी राणा यांनी हल्लाबोल केला.