Sunday, December 7, 2025
Home Blog Page 3728

कराड तालुक्यातील युवकाची 25 लाखांची फसवणूक : वडिलांच्या विम्याची रक्कम देण्याचे अमिषाने

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

तुमच्या वडीलांच्या नावाची विमा पॉलीसी आहे, ती सोडविण्यासाठी पैसे भरावे लागतील, असे सांगून अवघ्या चार महिन्यात रेठरे खुर्द येथील युवकाला तब्बल 25 लाख 59 हजार 47 रूपांयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काल रात्री उशिरा तालुका पोलिसात त्याबाबतचा गुन्हा नोंद झाला आहे. अजीत सुभाष पवार (वय 29, रा. रेठरे खुर्द) यांची फसवणूक झाली आहे. त्याला फोनवरून विवेक चौधरी, अरविंद मिश्रा आणि विजेंद्र आझाद (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी फसवणूक केल्याचे युवकाने म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः अजीत पवार यास पहिल्यांदा विवेक चौधरी यांचा कॉल आला. फेब्रुवारीमद्ये आलेल्या कॉलमध्ये विविक यास तुमच्या वडीलांच्या नावाने एका मोठ्या कंपनीत विमा पॉलीसी आहे. ती सोडविल्यास तुम्हाला मोठी रक्कम मिळणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला काही रक्कम भारावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर टप्प्या टप्प्याने अरिवंद मिश्रा व विजेंद्र आझाद यांनाही कॉल करून पवार यास त्याची माहिती दिली. काही रक्कम भरण्यास सांगितले. 5 फेब्रुवारी ते 5 मे 2021 या चार महिन्यात अजीत पवारने थोडी थोडी करत तब्बल 25 लाख 59 हजारांची रक्कम ते तिघेही सांगतील त्या खात्यात भरली.

त्यानंतर मात्र त्यां तिघांनाही त्याच्याशी संपर्क ठेवला नाही. टाळाटाळ होवू लागली. फोनही लागत नसल्याची खात्री झाली. त्यामुळे अजीत पवार याची आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्वरीत काल पोलिस ठाणे गाठून तेथे फिर्याद दिली. रात्री उशिरा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. फौजदार अशोक भापकर तपास करत आहेत. त्या प्रकरमात बोगस नावांचा वापर करून अजीत पवार यांची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे.

पोलिसांचा दणका : सातारा जिल्ह्यातील 5 टोळ्यातील 15 जण एकाचवेळी तडीपार

crime

सातारा | सातारा शहरासह जिल्ह्यातील फलटण, उंब्रज, शिरवळमधील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये पोलिसांनी धडाका करत एकाचवेळी 15 जणांना तडीपार केले आहे. स्थानिक पोलिसांच्या प्रस्ताव सत्रामुळे व कारवाईच्या दंडूक्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिस अधिकारी अण्णासाहेब मांजरे, बी. के. किंद्रे, अजय गोरड, उमेश हजारे यांनी प्रस्ताव तयार करुन ते पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे पाठवले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी संशयितांवर तडीपारची कारवाई केली.

सातारा शहरातील दुचाकी चोरीप्रकरणी प्रल्हाद ऊर्फ परल्या रमेश पवार (वय 19, रा. केसरकर पेठ), विकास मुरलीधर मुळे (20, रा. पावर हाऊस झोपडपट्टी, मंगळवार पेठ) या टोळीला सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

फलटण शहरात बेकायदा गायी, म्हैस या जनावारांची कत्तल करणे तसेच बेकायदा वाहतूक करून त्याची विक्री केल्याप्रकरणी तय्यब आदम कुरेशी (36), हुसेन बालाजी कुरेशी (47), जमील मेहबूब कुरेशी (42), सद्दाम हसीन कुरेशी (27), अरशद जुबेर कुरेशी (25), अमजद नजीर कुरेशी (41, सर्व रा. फलटण शहर) या टोळीला पूर्ण सातारा जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, भोर तालुक्यांतून 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे. दरम्यान, फलटण शहरात गर्दी, मारामारी, बेकायदा शस्त्रे बाळगणे, हातभट्टी दारूनिर्मिती प्रकरणी सनी माणिक जाधव (26), गणेश महादेवराव तेलखडे (37, दोघे रा. मलठण ता. फलटण) या टोळीला 1 वर्षासाठी सातारा जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, भोर यामधून तडीपार करण्यात आले आहे.

उंब्रज पोलिसांनी जबरी चोरी व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राकेश ऊर्फ मुन्ना जालिंदर घाडगे (32, रा. कदममळा, उंब्रज), शंकर उर्फनाना लक्ष्मण शितोळे (वय 29, रा. आंधारवाडी (ता. कराड), सोन्या उर्फ अनिकेत आदिक चव्हाण (वय 20, रा. आंधारवाडी) या टोळीला 1 वर्षासाठी सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे.

शिरवळमध्ये गर्दी करून मारामारी व उद्योजकांमध्ये दहशत तयार करणाऱ्या संजय तुकाराम ढमाळ (वय 53), योगेश दादासाहेब ढमाळ (वय 28, दोघे रा. केसुर्डी ता. खंडाळा) या टोळीला 1 वर्षासाठी सातारा जिल्हा व पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. स्थानिक पोलिस अधिकारी यांनी संशयितांना वेळोवेळी सुधारण्याची संधी दिली. मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती. उलट सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे ही कारवाई करण्यात आले.

BREAKING NEWS : खंडाळा येथे सहा वाहनांच्या विचित्र भीषण अपघात 3 ठार, व्हॅगनारचा चक्काचूर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुणे – बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ जवळ धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकने उडवलेल्या चारचाकी वाहनांतील 3 ठार झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झालेले असून वाहनांची रांग लागलेली होती. अपघातात 2 जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

सातारा येथून पुण्याकडे निघालेल्या 6 वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात दूधाचा ट्रक, स्काॅर्पिअो, मालट्रक, व्हॅगनार आणि अन्य दोन वाहनांचा अपघात झाला आहे. अपघातानंतर वाहतूक विस्कळित झालेली होती. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. रात्री उशिरा झालेल्या अपघातामुळे अंधारात एकच गोंधळ उडाला होता. अपघातानंतर घटनास्थळी जखमी वाहनांतली अनेकजण भेदारलेल्या स्थितीत होते.

घटनास्थळी खंडाळा पोलिस दाखल झालेले असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अपघातात 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धनगरवाडी येथील स्थानिकांनी जखमींना रूग्णालयात हलविण्यसाठी मदत केली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून वाहतूक सेवा रस्त्यांवरून सुरळीत केली होती. अपघातात व्हॅगनार कारचा चक्काचूर झालेला होता. या गाडीतील मृतांना बाहेर काढताना चारचाकी गाडीचा पत्रा तोडावा लागला.

अमित शहा यांच्या भेटीबद्दल पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्रात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीबद्दल महाराष्ट्रात मात्र अनेक तर्क वितर्क लढवले गेले. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली असेल? याबद्दल दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा केली गेली. अखेर शहा यांच्या भेटीबद्दल शरद पवार यांनी कारण सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेअध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीबद्दल पवारांनी माध्यमांना सांगितले की, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमवेत आज नवी दिल्लीत एक संक्षिप्त बैठक घेतली आणि एनएफसीएसएफचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे यांनी साखर सहकारी क्षेत्रासमोरील समस्यांवर चर्चा केली.

सहकारमंत्री शहा यांच्या भेटीवेळी त्यांच्याकडे महत्वाची मागणी केली असल्याची माहिती पवार यांनी दिली. यावेळी पवार यांनी सांगितले की, एमएसपी आणि साखर कारखान्यांच्या आवारात इथेनॉल उत्पादन युनिट उभारण्यासाठी परवानगी यासारख्या दोन सर्वात उदयोन्मुख आणि गंभीर समस्या आम्ही त्याच्या निदर्शनास आणल्या. आम्हाला आशा आहे की सहकार मंत्री या समस्यांवर अनुकूलपणे विचार करतील आणि लवकर सोडवतील.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी गेल्या काही दिवसात, अल्पकाळात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. शरद पवार यांनी अमित शहा यांच्यापूर्वी प्रथम पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. दोघांमध्ये जवळपास 57 मिनिटे चर्चा झाली होती.

सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक बी. डी. पाटील (सर) यांचे निधन

कराड | कराड तालुक्यातील तांबवे येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब दादासो पाटील ऊर्फ बापू यांचे वयाच्या 78 व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन झाले. परिसरात व शैक्षणिक क्षेत्रात त्यांना बी. डी. पाटील सर म्हणून परिचित होत.

तांबवे येथील स्वातंत्र्य सैनिक अण्णा बाळा पाटील विद्यालयात त्यांनी 32 वर्षे सेवा बजावली. त्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून 20 वर्षे कार्यकाल पार पाडला. यशवंत एज्युकेशन सोसायटीचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. शिवाजीराजे नागरी पतसंस्थेचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी काम करत होते.

बी. डी. पाटील सर यांचा सामाजिक, राजकीय क्षेत्रात सहभाग असे. सुनील पाटील यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुना,नातवंडे, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी दि. 5 रोजी सकाळी तांबवे येथे होणार आहे.

शरद पवार यांच्या भेटीबद्दल लालू प्रसाद यादव म्हणाले की, पवारांबद्दल संसद अजून…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्रात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली आहे. तसेच राजदचे नेते लालू प्रसार यादव यांचीही भेट घेत चर्चा केली. यावर यादव यांनी माहिती दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. त्यांच्या बद्दल सध्या संसद शांत वाटत आहे,” असं यादव म्हणाले.

यावेळी लालू प्रसाद यादव म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व मुलायम सिंह यादव असे आम्ही तिघे खुप वर्ष अनेक मुद्द्यांसाठी राजकीय लढा दिला आहे. मध्यंतरी पवार यांची तब्बेत बरी नव्हती. मी त्यांना भेटण्यासाठी आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. शरद पवारांशिवाय संसद शांत वाटत आहे. सध्या पवार यांची तब्बेत उत्तम आहे. आम्ही भेटलो तेव्हा खूप चर्चाही केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी गेल्या काही दिवसात, अल्पकाळात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. पवार हे 17 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते. त्यानंतर वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. जवळपास 57 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली होती. राजधानी दिल्लीत साऊथ ब्लॉकमधल्या पंतप्रधान कार्यालयात दोघांची भेट झाली होती.

खुशखबर ! पेट्रोल 5 रुपयांनी होऊ शकेल स्वस्त, कच्च्या तेलाच्या किमतीत झाली मोठी घट; तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

Petrol Diesel Price

नवी दिल्ली । चीनमधील कमकुवत आर्थिक वाढ, कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे आणि ओपेक+ उत्पादन वाढीच्या चिंतांमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरही दिसून येईल. आता असे मानले जात आहे की, येत्या काही दिवसात पेट्रोलचे दर 5 रुपयांनी स्वस्त होऊ शकतील. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या घसरणीचा थेट लाभ भारतालाही मिळू शकेल. सध्या देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे विकले जात आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून तेलाचे दर वाढलेले नाहीत.

MCX वर, ऑगस्टमध्ये डिलिव्हरीसाठी क्रूड 73 रुपये किंवा 1.32 टक्क्यांनी कमी होऊन 5,444 रुपये प्रति बॅरलवर 6,313 लॉटच्या व्यवसायाची उलाढाल झाली. सप्टेंबर डिलिव्हरी 69 किंवा 1.26 टक्क्यांनी घसरून 5,415 रुपये प्रति बॅरल झाली आहे.

तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या?
वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड 1.18 टक्क्यांनी घसरून 73.08 डॉलर प्रति बॅरल, तर लंडनस्थित आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.99 टक्के घसरून 74.66 डॉलर प्रति बॅरलवर आले. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, “तेलाच्या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या ग्राहकामध्ये कारखान्यांची कामे कमी होणे, चीनच्या आर्थिक रिकव्हरीच्या चिंतांमुळे सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. याशिवाय अमेरिका आणि चीनसह इतर देशांनीही तेलाच्या किमती कमी केल्या. जगाच्या इतर भागातही कोरोनाची वाढती प्रकरणे स्पष्टपणे दिसतात. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवरही दबाव आला आहे.

किंमती 5 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतील
कच्च्या तेलाचे दर 75 ते 72 डॉलर प्रति बॅरलसह कमी व्यापारावर राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, तज्ञांचा असा विश्वास आहे की, कच्च्या तेलाचे उत्पादन वाढल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 65 डॉलर्स पर्यंत खाली येऊ शकतात आणि असे झाल्यास पेट्रोलचे दर खाली येतील. हे शक्य आहे की, यामुळे तेलाच्या किंमतीत 5 रुपयांची कपात होऊ शकते.

प्रथमेश मल्ल्या, एव्हीपी रिसर्च नॉन-एग्री कमोडिटीज अँड करन्सीज, एंजेल ब्रोकिंग लिमिटेड म्हणाले की,”जागतिक तेलाच्या मागणीत सातत्यपूर्ण वाढ आणि येत्या आठवड्यात अमेरिकन डॉलरची घसरण यावर क्रूड तेलाच्या किमतींना समर्थन देत राहू शकतात. ओपेकच्या तेलाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे चीनच्या औद्योगिक क्षेत्रात मंद वाढ तेलाच्या किमतींवर परिणाम करू शकते.”

कराड जनता बॅकेच्या कर्मचाऱ्यांचे 15 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण, अवसायकाच्या मनमानी कारभारा विरोधात

Karad Janta Bank

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड जनता सहकारी बॅंकेचे कर्मचारी 15 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. बँकेचे अवसायिक मनोहर माळी यांचा मनमानी कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या बोगस कर्जाच्या प्रकरणाच्या तपासात होणारी टाळाटाळ थांबवून न्याय मिळावा, यासाठी कोरोनाचे नियम पाळून तहसिलदार कार्यालयासमोर कर्मचारी बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

कराड जनता बँकेच्या 2015 पासूनच्या संचालक मंडळाने मनमानी करुन सेवकांची वार्षिक वेतनवाढ रोखली होती. मात्र ती अवसायक मनोहर माळी यांनी मनमानी करूनच काही सेवकांनाच फरकासह दिली आहे, ती सरसकट मिळाली पाहिजे. सेवकांच्या 5 लाखांच्या आतील ठेवी परत मिळण्यासाठी योग्य ते अर्ज भरुन दिले आहेत. विमा कायद्यातंर्गत त्याला मंजुरी आहे, मात्र अवसायक मनमानी करुन त्या ठेवी परत देत नाहीत. त्या ठेवी परत मिळाव्यात. सेवकांचे हक्क रजेचे पगार अवसायकांनी काही ठराविक सेवकांना दिले आहेत. ते सर्वांनाच द्यावेत. सेवकांकडे कर्ज फेडल्याचे ना हरकत दाखले आहेत. तरीही अवसायक त्यांच्याकडून मनमानी वसुली करत आहेत. नोटीसा पाठवत आहेत. वास्तिक त्याबाबत फौजदारी न्यायालयात दावा दाखल आहे. त्याच्या तपासाचे आदेश देत न्यायालयाने अहवाल मागवला आहे. मात्र पोलिस तपासही करत नाहीत व अहवाल देत नाहीत. त्यामुळे त्यात स्वतंत्र गुन्हा नोंद करुन अहवाल द्यावा.

न्यायालयात फिर्याद देण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडेही चौकशीची मागणी केली होती. त्याची दखल घेतली गेली नाही. न्यायालयात दाखल फिर्यादीत तत्कालीन संचालक मंडळासह बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावावर 4 कोटी 62 लाख 87 हजार रूपये दबाव टाकून उचलले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल व्हावा, त्या सगळ्याचीच सखोल चौकशी व्हावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. फिर्यादीनुसार पोलिसांना कर्मचाऱ्यांच्या कर्जप्रकरणात तपासाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही होत नाही. त्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागतो आहे. त्या सगळ्यात शासनाने लक्ष घालावे आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा यासाठी उपोषणाशिवाय पर्याय नाही. उपोषणात जनता बँकेच्या स्वेच्छा निवृत्तीसह राजीनामा दिलेल्या व निवृत्त कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पिडित कर्मचाऱ्यांच्या वतीने 15 ऑगस्ट पासून येथील तहसीलदार कार्यालयसमोर बेमुदत उपोषण होणार आहे. त्यावेळी कोवीडचे नियम पाळून कर्मचाऱ्यांतर्फे पाच व्यक्ती सामाजिक अंतर ठेवून उपोषणास बसणार आहेत.

खरंच… केरळमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली ? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या

corona antijen test

कोची केरळमध्ये पुन्हा एकदा कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातील रोजच्या 50 टक्के केसेस केरळमध्ये नोंदवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत, महामारी विशेषज्ञ आणि तज्ञांचे मत आहे की,” केरळमधील तिसऱ्या लाटेची ही चाहूल असू शकते. मात्र, सरकारकडून अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.” तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,”केरळमध्ये, जेथे जून-जुलैमध्ये दुसऱ्या लाटेची प्रकरणे कमी झाल्यानंतर 12,000-14,000 प्रकरणे दररोज येत होती, गेल्या काही दिवसांत त्याची संख्या 20,000 वरून 22,000 पर्यंत वाढली आहे. राज्यात पॉझिटिव्ह प्रकरणांचे प्रमाण वाढून 12 टक्के झाले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्ट नुसार, महामारी विशेषज्ञ डॉ.रमन कुट्टी म्हणाले की,”कोरोना प्रकरणांमध्ये झपाट्याने झालेली वाढ हे दर्शवते की, केरळमध्ये तिसरी लाट सुरू झाली आहे आणि आपल्याला त्याबाबत सावध राहावे लागेल. येथे मोठ्या संख्येने लोकं संक्रमित होऊ शकतात आणि कोविडच्या नवीन लाटांचा सामना करण्यासाठी सरकारने दीर्घकालीन रणनीती आखली पाहिजे. केरळमध्ये आठवड्यात प्रकरणांमध्ये वाढ 0.60 टक्के आहे, तर राष्ट्रीय स्तरावर 0.13 टक्के आहे.”

कोरोनाच्या अनेक लाटा येतील
केरळ सरकारचे माजी एपिडेमियोलॉजिस्ट डॉ ए सुकुमारन म्हणाले की,”अशा कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनच्या अनेक लाटा आहेत, केरळमध्ये अशा अनेक लाटा असतील जिथे ते कमी होण्याआधीच केस अधिक वेगाने वाढू लागतील.” ते म्हणाले की,”स्पॅनिश फ्लूच्या काळातही, प्रकरणे चार लाटांनंतर खाली आली होती. मात्र कोविडच्या विविध व्हेरिएन्टसमुळे, त्याच्या लाटा जास्त असू शकतील.”

पहिल्या लाटेदरम्यान, केरळमध्ये कोरोनाची प्रकरणे बराच काळ कमी होती आणि त्यानंतर एप्रिलमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाली, त्यानंतर संक्रमणाची दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेतही, राज्यात सात आठवड्यांपर्यंत प्रकरणांमध्ये घट झाली होती परंतु आता ती झपाट्याने वाढत आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, केरळची 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या अजूनही संवेदनाक्षम आहे आणि आतापर्यंत केवळ 17 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

केरळमधील जीनोम सिक्वेंसींगमधून जे समोर आले आहे ते म्हणजे कोविडच्या डेल्टा व्हेरिएंट्सची सर्वाधिक संख्या केरळमध्ये आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, केरळमधील 95 टक्के प्रकरणे या प्रकारातील आहेत.

कोरोनाबाबत केंद्र सरकारचा केरळला सल्ला, तज्ञांच्या टीमला राज्यात अनेक त्रुटी आढळल्या

Corona Test

नवी दिल्ली । केरळमध्ये कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता, तेथे पाठवलेल्या 6 सदस्यांची टीम परत आली आहे आणि त्याचा रिपोर्ट त्यांनी केंद्राला सादर केला आहे. या टीमला केरळमध्ये ग्राउंड लेव्हलवर अनेक कमतरता आढळल्या, त्यानंतर त्यांनी कोरोना केस नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारला काही सूचना केल्या. या टीमला असे आढळले की, केरळमध्ये एक्टिव्ह सर्विलांस योग्यरित्या केला जात नाही.” त्यानंतर तज्ञांच्या या टीमने एक्टिव्ह सर्विलांस ठेवणे वाढवण्याचे सुचवले. सह आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

केंद्रीय टीमला असेही आढळले की,” केरळ सरकारने कोरोनाच्या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे कडक कारवाई केली होती, मात्र याचा ग्राउंड लेव्हलवर कोणताही परिणाम झालेला नाही.” आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याची सूचनाही या टीमने केली आहे. यासह, त्यांनी कोरोना संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख त्वरित करण्याच्या गरजेवर भर दिला.

या टीमने हे देखील पाहिले की, राज्यात होम आयसोलेशन संबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन केले जात नाही. राज्य सरकारने स्थापन केलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना पेशंटला कॉमोर्बिडिटी म्हणजेच इतर कोणत्याही आजाराने अलग ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, केंद्रीय टीमने लसीकरण वाढविण्यावर आणि कंटेनमेंट झोन तयार करण्यावरही भर दिला.

विशेष म्हणजे केरळमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. देशभरात येणाऱ्या एकूण प्रकरणांपैकी पन्नास टक्के प्रकरणे एकट्या केरळमध्येच आहेत, त्यानंतर केंद्र सरकारने एक टीम तयार करून केरळला पाठवली.